Preview shortened URLs with Prevurl.com

[ MARATHI ].......

जर तुम्ही ट्वीटर, याहु ग्रुप्स किंवा गुगल ग्रुप्सचे सभासद असाल तर शॉर्टनड युआरएल (Shortened URL) हा प्रकार तुम्हाला नक्कीच माहीत असेल. मोठ्या वेबलिंक शेअर करताना होणारा त्रास वाचवण्यासाठी शॉर्टन्ड म्हणजेच छोट्या युआरएल फायद्याच्या ठरतात. उदाहरणार्थ http://tinyurl.com/2tx किंवा http://bit.ly/2NWAyr त्या लक्षात ठेवणे देखील फारसे कठीण नसते. ट्वीटरने तर सर्व ट्वीट्स १४० अक्षरात मावण्यासाठी छोट्या युआरएल्सचा फार चांगला वापर केला आहे.

मात्र अशा फायदेशीर असणार्‍या छोट्या युआरएल कधी कधी अतीशय धोकादायक ठरु शकतात. शॉर्टन्ड युआरएल मुळे लिंकचे मुळ स्थान कळत नाही आणि त्यावर क्लिक केल्याशिवाय आपण कुठे क्लिक केले (पुढे काय मांडुन ठेवले आहे ते !) ते देखील कळत नाही.

याहु किंवा गुगल ग्रुप्स मधुन नेहमी येणार्‍या इमेल्स मध्ये बर्‍याचदा शॉर्टन्ड लिंक्सचा वापर केलेला असतो. लिंकवर क्लिक केल्यावर एखादे भलतेच (!) पान उघडते, अशा वेळेस कोणी समोर असेल तर शरमेनं मेल्यासारखंच होतं.

साध्या वाटणार्‍या या लिंक्स कधी कधी व्हायरसने भरलेल्या साइट्सवर घेउन जातात आणि काही कळायच्या आतच व्हायरसने तुमच्या संगणकाचा ताबा घेतलेला असतो.

या सर्व त्रासदायक गोष्टींपासुन तुमचे संरक्षण करु शकेल अशा एका वेबसाईट बद्दल मी आज माहीती देणार आहे. या वेबसाईटचे नाव आहे prevurl.com. Prevurl म्हणजे प्रीव्ह्यु-युआरएल. प्रेव्हयुआरएल वापरुन कोणत्याही शॉर्टन्ड युआरएलचे मुळ रुप काय आहे ते पाहता येते एवढेच नव्हे तर युआरएल वर क्लिक न करता त्या पानाचा प्रीव्ह्यु पाहता येतो.


ही अतीशय सोपी वेबसाईट पुर्णतः मोफत आहे.

यापुढे कोणत्याही संशयास्पद वेबलिंकला क्लिक करण्याधी prevurl.com वर जाउन खात्री करुन घ्या आणि मग निश्चींतपणे इंटरनेट सर्फींगचा आनंद घ्या.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Preview shortened URLs with Prevurl.com Preview shortened URLs with Prevurl.com Reviewed by Salil Chaudhary on 09:11 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.