Google Project 10^100

[ MARATHI ].......


गेल्या महीन्यात २६ तारखेला म्हणजेच २६ सप्टेंबर २००९ रोजी गुगलचा ११ वा वाढदीवस होता. (वेळेअभावी नेटभेटवर याबद्दल लिहिता आले नाहे, क्षमस्व !) एवढ्या कमी वेळात जगातील सर्वात प्रभावशाली ब्रँड म्हणुन गुगलने नाव कमवीले आहे. इंटरनेटच्या माध्यमाद्वारे जगातील एकुण सर्व ज्ञान सर्वांनाच उपलब्ध करुन देणार्‍या गुगलने पृथ्वीतलावरील प्रत्येक मानवाला प्रभावीत केले आहे याबद्दल शंका नाही.

गेल्यावर्षी म्हणजे १० व्या वाढदीवसाला गुगलने एक अभिनव योजना जाहीर केली होती. या योजनेचे नाव होते प्रोजेक्ट Project 10^100 . या प्रोजेक्ट अंतर्गत गुगलने जगातील जास्तीत जास्त माणसांचे जीवनमान सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा आयडीआज मागवील्या होत्या. या आयडीयाज पैकी सर्वोत्कृष्ट ५ आयडीयाज निवडुन त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी गुगल १० मिलियन डॉलर्स इतका निधी (10^100 ) उपलब्ध करुन देणार आहे.


या आयडीयाज लहान असो वा मोठ्या, तंत्रज्ञानावर आधारीत असो वा अगदी साध्या स्वरुपाच्या असोत, गुगलची एकच अट होती की जास्तीत जास्त गरजुंना प्रभावीत करणारी कल्पनाच निवडल्या जातील. कल्पना सुचविण्यासाठी गुगलने काही मुख्य प्रकार दीले होते -

  • Community: How can we help connect people, build communities and protect unique cultures?

  • Opportunity: How can we help people better provide for themselves and their families?

  • Energy: How can we help move the world toward safe, clean, inexpensive energy?

  • Environment: How can we help promote a cleaner and more sustainable global ecosystem?

  • Health: How can we help individuals lead longer, healthier lives?

  • Education: How can we help more people get more access to better education?

  • Shelter: How can we help ensure that everyone has a safe place to live?

  • Everything else: Sometimes the best ideas don't fit into any category at all.


नुकताच गुगलने यापैकी १६ सर्वश्रेष्ठ कल्पना निवडुन वाचकांच्या मतांसाठी उपलब्ध केल्या आहेत. वाचकांची मते आणि गुगलच्या एक्सपर्ट्सचे एक पॅनल मिळुन यांपैकी ५ सर्वश्रेष्ठ कल्पना निवडणार आहेत. आणि पुढे गुगल या ५ कल्पना प्रत्यक्षात आणणार आहे.

या सर्व कल्पना आपण http://www.project10tothe100.com/vote.html येथे पाहु शकता तसेच तुम्हाला आवडलेल्या कल्पनेला आपले मतही देउ शकता.

गुगलने निवडलेल्या १६ सर्वश्रेष्ठ कल्पनांचे थोडक्यात विवरण -

१. Help social entrepreneurs drive change - (सोशल आंत्रेप्रेन्युअरशिप) समाजोपयोगी उद्योजगतेला चालना देणे. -

गावागावातील लहान उद्योजकांना ना नफा ना तोटा तत्त्वावर भांडवल उपलब्ध करुन देउन त्यांना एकुणच समाजास उपयोग होइल अशा उद्योगधंद्यांसाठी प्रेरीत करणे.

२. Make government more transparent - शासनव्यवहारात जास्तीत पारदर्शकता आणणे -

शासननिधीचा वापर कसा केला जातो याबद्दलची माहीती , वेगवेगळ्या कायदे व नियमांचे सवीस्तर व सोप्या भाषेत विवरण नागरीकांना उपलब्ध करुन देणे. निवडणुकीस उभ्या राहीलेल्या उमेदवारांनी केलेले काम आणि त्यांच्याबद्दलची माहीती मतदारांना उपलब्ध करुन देणे इत्यादी.

३. Provide quality education to African students - अफ्रीकेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देणे.

४. Create real-time natural crisis tracking system - भुकंप, त्सुनामी, वादळ, ज्वालामुखी, पुर अशा सर्व नैसर्गीक संकंटांची अगाउ सुचना देणारी यंत्रणा जगभर उभारणे. तसेच आपत्तीग्रस्त भागांमध्ये टेहाळणी आणि शोधकार्यासाठी मानवरहीत विमाने पुरवीणे.

५. Work toward socially conscious tax policies - इंकम टॅक्सऐवजी वॅट आकारणे, जनतेने समाजकार्यासाठी वापरलेल्या निधीसाठी टॅक्समध्ये सुट देणे.

६. Build better banking tools for everyone - मोबाइल बँकींगचा विस्तार, गावोगावी ईलेक्ट्रॉनीक बँकींगची सुविधा पुरवीणे आणि वर्ल्ड बँकेसारख्या एकाच बँकेच्या अधीपत्याखाली जगातील सर्व बँक्स आणुन समान बँकींग नियम व कायदे लागु करणे.

७. Collect and organize the world's urban data - एक अशी वेबसाईट बनवीणे ज्यामध्ये जगभरातील सर्व नागरीक आपापल्या भागांतील घडामोडी, तक्रारी, सुचना नोंदवु शकतात. त्याचप्रमाणे प्रमुख शहरांमध्ये चालु असलेल्या सर्व विकासकामांचा आढावा घेणे आणि तो या वेबसाईटवर उपलब्ध करुन देणे. काही मोक्याच्या जागांवर कॅमेरे लावुन शहरांची/नगरांची होणारी प्रगती फोटोंद्वारे नोंदवणे.

८. Encourage positive media depictions of engineers and scientists - विज्ञान व तंत्रज्ञान विषयांमधील सर्व ज्ञान एका मोठ्या ऑनलाईन लायब्ररीद्वारे एकत्र आणणे आणि मोफत सर्वांसाठी उपलब्ध करुन देणे.

९. Promote health monitoring and data analysis - ब्रेसलेटप्रमाणे हातावर बसणारे एक यंत्र जे व्यक्तीचे तापमान, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके मोजेल आणि हा सर्व डेटा आपोआप नेमुन दीलेल्या व्यक्तीकडे (डॉक्टर किंवा कुटुंबीय) पोहोचवेल, असे यंत्र बनवीणे व सर्वत्र उपलब्ध करुन देणे.

१०. Enhance science and engineering education - रोबोटीक्स विषयाला चालना देणे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संगणक, रोबोटीक्स लॅब्ज, ईंटरनेट उपलब्ध करुन देणे. गणित व विज्ञान या विषयांशी संबंधीत इलेक्ट्रॉनीक खेळ (गेम्स) बनवीणे.

११. Create real-world issue reporting system - जगातील कोणत्याही भागातील नागरीकांच्या सर्व तक्रारी वेळेवर संबंधीतांपर्यंत पोहोचवल्या जाव्यात यासाठी यंत्रणा उभारणे.

१२. Create genocide monitoring and alert system - तंत्रज्ञानाचा वापर करुन दहशतवाद/आतंकवादास खीळ घालणे. मोबाइल कॅमेरे, जीपीआरएस यांचा वापर करुन आतंकवादपीडीत नागरीकांना मदत करणे.

१३. Build real-time, user-reported news service - रीअल टाइम न्युज म्हणजेच जगात कोठेही कधीही घडलेली बातमी त्वरीत इंटरनेटच्या सहाय्याने जगभर पोहोचवणे. यासाठी घटनास्थळी हजर असणार्‍या व्यक्तींच्या मदतीने लगेचच बातमी सर्वत्र पोहोचवण्याचे तंत्रज्ञान विकसीत केले जाइल.

१४. Drive innovation in public transport - इलेक्ट्रीक रेलवे सीस्टम सर्वत्र उपलब्ध करुन देणे, सायकल चालवण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करणे, मीथेनॉल फ्युएल सेल्स किंवा हायड्रोजन वर चालणार्‍या इलेक्ट्रीकल सायकल्स बनविणे

१५. Make educational content available online for free - प्रत्येक शाळेय पुस्तक आणि माहीती इंटरनेटवर मोफत उपलब्ध करुन देणे, जगभरातील सर्वोत्कृष्ठ शाळांचे लेक्चर्स ऑनलाईन उपलब्ध करुन देणे.

१६. Create more efficient landmine removal programs - जगभरात ७० देशांमध्ये अद्याप ११० दशलक्ष जिवंत सुरुंग दडलेली आहेत. (हे वाचुन आश्चर्याचा धक्का बसला) आणि या सुरुंगांमुळे होणारी जीवीतहानी दरवर्षी सुमारे ५००० च्या घरात जाते. असे लपलेले सुरुंग शोधुन ते निकामी करण्यासाठी रोबोटीक माइन डीटेक्टर बनविणे.

गुगल यापैकी ५ सर्वश्रेष्ठ कल्पना निवडुन त्यावर काम करणार आहे. थोडक्यात गुगलकाका जगाचा उद्धार करायला तयार झाले आहेत. वरील सर्व कल्पना मुद्दाम मराठीत येथे लिहिल्या कारण आपण सर्वांनीच यांपैकी सर्वोत्कृष्ठ कल्पना निवडण्यासाठी आपले मत नोंदवावे अशी माझी इच्छा आहे. स्वतःची तुंबडी भरणार्‍या स्वार्थी नेत्यांना मतदान करण्यापेक्षा किंवा (खोट्या) रीअ‍ॅलीटी शोमधल्या सेलीब्रेटीजना मत देण्यापेक्षा गुगलने आरंभलेल्या या प्रकल्पात मत नोंदवणे केव्हाही चांगलेच !

भेट द्या - http://www.project10tothe100.com/index.htmlGet NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Google Project 10^100 Google Project 10^100 Reviewed by Salil Chaudhary on 08:08 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.