"How to videos" directory - Wonderhowto.com

[ ENGLISH/ MARATHI ].......

असं म्हणतात, एक चित्र किंवा फोटो हजार शब्दांपेक्षा जास्त बोलकं असतं. भाषा/शब्द या मानवनिर्मीत गोष्टींपेक्षा देवाने मानवाला (आणि इतर सर्व प्राण्यांना) दीलेली दृष्टी आणि श्रवणकला निश्चीतच श्रेष्ठ आहेत. म्हणुनच टीव्हीवर ऐकलेलं गाणं हे दहावेळा वाचलेल्या कवीतेपेक्षा जास्त चांगलं लक्षात राहते.

इंटरनेटवरही एखाद्या विषयाची माहीती मिळवताना इतरत्र वाचण्यापेक्षा त्या विषयाशी संबंधीत व्हीडीओ युट्युबवर पहायला आपल्याला जास्त आवडतं. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेउन एक वेब साईट बनविण्यात आली आहे. या साईटचे नाव आहे wonderhowto.com (वंडरहाउटु.कॉम)हाऊटु व्हीडीओज म्हणजे विविध गोष्टी, कामे कशी करावीत याचे स्पष्टीकरण देणारे छोटेखानी व्हीडीओज. वंडरहाऊटु.कॉम मध्ये अशा प्रकारचे ९०००० हुन अधिक हाऊटु व्हीडीओज समाविष्ट आहेत. ही वेबसाईट म्हणजे अशा अनेक उपयुक्त व्हीडीओजची डीरेक्टरी किंवा सर्च इंजिन आहे. इंटरनेटवरच्या १९०० वेबसाइट्सवरील उपयुक्त व्हीडीओज वंडरहाउटु.कॉम मध्ये पहायला मिळतात.

इथे सर्व व्हीडीओज ३५ वेगवेगळ्या विषयांनुसार मांडलेले आहेत. एवढेच नव्हे तर ४२४ उपविषयांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. युट्युबप्रमाणेच या वेबसाईटवर व्हीडीओज सर्च करता येतात.

वंडरहाउटु.कॉम कम्युनीटी साईट आहे, म्हणजेच या साईटला भेट देणारे वाचक (इथे खरेतर प्रेक्षक म्हंटले पाहिजे !) विविध विषयांवर माहीती देणारे व्हीडीओज अपलोड करु शकतात.

आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही साईट पुर्णपणे मोफत आहे.

या चालत्याबोलत्या गुरुला अवश्य भेट द्या - http://www.wonderhowto.com/ आणि साईट कशी वाटली ते सांगायला विसरु नका !
WonderHowTo.com is a community-fueled, search engine and directory for Free How-To Video. With an index of more than 225,000 videos (October 2008), we provide the largest, most contemporary, and most diverse resource in this increasingly vibrant space.

As of launch, WonderHowTo provides content from more than 1900 specialized sites spanning 35 vertical categories and 424 sub-categories.

WonderHowTo provides an impressive directory of How-To Videos. It’s comprehensive, easy to use, and lets you have access to a bevy of videos without having to shop around.

Visit - http://www.wonderhowto.com/Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

"How to videos" directory - Wonderhowto.com "How to videos" directory - Wonderhowto.com Reviewed by Salil Chaudhary on 10:22 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.