ऑफलाइन भारतासाठी ऑनलाईन सेवा - Question Box!

[ ENGLISH/ MARATHI ].......


इंटरनेटवर जगातील सर्व ज्ञान लपले आहे यात शंका नाही. काहीही माहीती हवी असली तरी इंटरनेटवर ती मिळतेच. परंतु आज काही मोजकी शहरे सोडता भारतातील किती शहरांमध्ये/ गावांमध्ये इंटरनेट पोहोचलय? या अगाध ज्ञानापासुन भारतातील बहुतांशी जनता वंचीत राहीली आहे. यालाच "डीजीटल डीव्हाइड" असे म्हंटले जाते. जात्-पात, स्त्री-पुरुष, गरीब्-श्रीमंत या भेदभावांपासुन सतत लढणार्‍या आपल्या देशांत इंटरनेट किंवा संगणक वापरु शकणारे आणि न वापरणारे यांतील दरी खुप मोठी आहे्ई वाढती दरी म्हणजेच डीजीटल डीव्हाइड.

कधीच ऑनलाइन न येउ शकलेल्या लोकांसाठी (खरंतर "ऑनलाईन" हा शब्द पण त्यांना माहीत नसेल !) USA मधील Open Mind या समाजसेवी संस्थेने एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे आणि तो देखील महाराष्ट्रात. या उपक्रमाचे नाव आहे "Question box - प्रश्नोत्तरंग"इंटरनेटचं महाज्ञान सदैव ऑफलाइन असलेल्या एका मोठ्या वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम Question box करणार आहे. Question box म्हणजे सौरउर्जेवर चालणारा एक टेलीफोन आहे. या टेलीफोनवर कोणतेही आकडे नसुन फक्त एक हीरव्या रंगाचे बटण आहे. हे बटण दाबताच वापरकर्ता दुसर्‍या टोकाला एका ऑपरेटरशी संपर्क साधु शकतो. हा ऑपरेटर सतत ऑनलाईन असतो त्याचप्रमाणे ऑपरेटरकडे स्थायी माहीती असलेला एक डाटाबेस देखील असेल. Question box च्या माध्यमातुन वापरकर्ते कोणत्याही विषयाबद्दलचे त्यांचे प्रश्न विचारु शकतील आणि पलीकडील ऑपरेटर्स इंटरनेटवरुन उत्तरे शोधुन स्थानिक भाषेंमध्ये समजावुन सांगतील.

नागरीक महत्त्वाचे प्रश्न, सुचना, बातम्या विचारु शकतात, शेतकर्‍यांना बाजारभाव, हवामान यांचा अंदाज घेता येउ शकतो विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणीक अडचणी सोडवता येउ शकतात. या Question box ची उपयुक्तता खरंच वाखाणण्याजोगी आहे.

ही सुविधा पुर्णपणे मोफत असणार आहे. ही मोफत सुविधा गरीब आणि ग्रामीण जनतेला अतीशय महत्त्वाच्या माहीतीशी जोडु शकेल. माहीतीच्या युगाची खरी ताकद खर्‍या भारताला उमगु लागेल आणि खर्‍या अर्थाने भारत महासत्ता बनु शकेल.

अधिक माहीतीसाठी भेट द्या - http://www.questionbox.org/Question Box is Open Mind’s initiative to bring information to people the way they want to receive it. All Question Box projects are tailored to match the needs of the locations they operate in.

Question Box's backend software logs all call data and indexes operators previous queries and answers, allowing it to get smarter over time. It uses a specialized local databases or 'off-line internet' solution allowing it to work in any situation, whether it's on or offline, powered or using backup generators. The database is customized with information relevant to the location we happen to be working in at the time. Although, some answers are universal this makes sense, as most of the questions asked have to be understood in the context of their locale (ex. "What is the price of grain?" could be asked in Pune or in Kampala. Each require different answers.)

Question Box uses call boxes to connect people on the street to live Internet information service. Here, the Question Box is a simple telephone intercom which requires no literacy or computer skills. Users place a free call by pushing the green button. They connect to an Operator sitting in front of a computer with internet acess. Users ask the operator questions in their local language. The operator goes online and finds their answers, translating English results back into the local language. The physical Question Box units have gone through several design cycles. They now can run completely off the grid, using mobile phone and solar technologies.

For more information visit - http://www.questionbox.org/Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

ऑफलाइन भारतासाठी ऑनलाईन सेवा - Question Box! ऑफलाइन भारतासाठी ऑनलाईन सेवा - Question Box! Reviewed by Salil Chaudhary on 11:30 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.