आता "थेट-भेट" स्टार माझावर............. !

स्टार माझा तर्फे आयोजीत करण्यात आलेल्या "माझा ब्लॉग" स्पर्धेत "नेटभेट"ला उल्लेखनीय ब्लॉग म्हणुन निवडण्यात आले. प्रख्यात आयटी गुरु श्रीयुत अच्युत गोडबोले यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
(अच्युत गोडबोलेंसारख्या एका "Techie" अवलियाने आपला ब्लॉग वाचावा आणि त्यांना तो आवडावा हीच माझ्यासारख्या "Techie"साठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.)

"नेटभेट" हा ब्लॉग सुरु करुन अवघे आठ महीने झाले आहेत. या छोट्याशा कालावधीत वाचकांनी आणि रसिकांनी भरपुर प्रोत्साहन दीले, प्रेम दीले. नेटभेट चे आजचे यश हे सर्वस्वी नेटभेटच्या वाचकांचे आणि मायमराठीचे आहे.

हे सर्व शक्य झाले ते तुमच्या प्रोत्साहन, प्रतिक्रिया आणि प्रेमामुळेच. जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी मनाने महाराष्ट्रातच असणार्‍या नेटभेटच्या सर्व सर्व वाचकांचे शतशः धन्यवाद.

आणि हो, या बक्षीसामुळे आणखी एक गोष्ट चांगली झाली, माझ्या आईला कळले की आपला मुलगा उगाचच तासन्-तास कंप्युटर मध्ये तोंड खुपसुन का बसलेला असतो ते ! :-)

सर्व विजेत्यांची नावे इथे प्रसिध्द करत आहे.

प्रथम तिन विजेते -

Aniket Samudra _______ http://manatale.wordpress.com
Neeraja Patwardhan_____ http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
Dipak Shinde__________ http://bhunga.blogspot.com

उल्लेखनीय -

Hariprasad Bhalerao ____ www.chhota-don.blogspot.com
Devdatta Ganar _______ http://maajhianudini.blogspot.com/
Medha Sakpal______ www.medhasakpal.wordpress.com
Salil Chaudhary _____ www.netbhet.com
Pramod Dev _____ http://purvaanubhava.blogspot.com/
Raj Kumar Jain_____ http://rajkiranjain.blogspot.com
Minanath Dhaske ____ http://minanath.blogspot.com
Vijaysinh Holam _____ http://policenama.blogspot.com
deepak kulkarni _____ http://aschkaahitri.blogspot.com/
Anand Ghare _______ http://anandghan.blogspot.com

सर्व मराठी ब्लॉगर्सचे हार्दिक अभीनंदन !


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

आता "थेट-भेट" स्टार माझावर............. ! आता "थेट-भेट" स्टार माझावर............. ! Reviewed by Salil Chaudhary on 08:18 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.