Excel keyboard shortcuts - Part 4

वाचकहो आज मी तुम्हाला काही भन्नाट एक्सेल की बोर्ड शॉर्टकट्स सांगणार आहे. माझी खात्री आहे की हे शॉर्टकट्स तुम्ही शिकलात आणि सरावाने वापरु लागलात तर तुमचे सहकारी अचंबीत झाल्याखेरीज राहणार नाहीत. (मी दीलेला मंत्र लक्षात असुद्या - To excel in life, you must know excel )


 • एखाद्या सेलमध्ये ctrl + ; हा शॉर्टकट वापरुन आजची तारीख लिहिता येते. (:-p)
 • संपुर्ण वर्कशीट सीलेक्ट करण्यासाठी ctrl + A वापरतात हे तुम्हाला माहीत असेलच. पण हे माहीत आहे का -
  - रो (Row) सीलेक्ट करण्यासाठी shift + spacebar वापरावे.
  - कॉलम सीलेक्ट करण्यासाठी ctrl + spacebar वापरावे.
 • ओळ वाढविण्यासाठी (to add row) आधी रो सीलेक्ट करुन घ्यावी आणि त्यानंतर Ctrl + shift + + वापरावे.
 • स्तंभ वाढविण्यासाठी (to add coloumn ) आधी कॉलम सीलेक्ट करुन घ्यावा आणि त्यानंतर Ctrl + shift + + वापरावे.
 • ओळ लपविण्यासाठी (To hide a row) ctrl + 9 वापरावे.
 • व स्तंभ लपविण्यासाठी (To hide a coloumn) ctrl + 0 वापरावे.
 • लपवीलेली ओळ पुन्हा बाहेर काढण्यासाठी (To unhide a row) ctrl + shift + 9 वापरावे.
 • लपवीलेला कॉलम पुन्हा बाहेर काढण्यासाठी (To unhide a coloumn) ctrl + shift + 0 वापरावे.
 • दीलेल्या कॉलममधील सर्व संख्या अनुक्रमे लावायच्या असतील (To sort data) तर कॉलम आधी सीलेक्ट करावा आणि Alt + D + S (altDS म्हणजे Data Sort मधील आद्याक्षरे)
  दीलेल्या कॉलममध्ये फील्टर वापरायचा असेल तर डाटा सीलेक्ट करुन Alt + D + F + F (AltDFF म्हणजे Data Filter Autofilter)

एक्सेलचे हे भन्नाट शॉर्टकट्स कसे वाटले ते मला कमेंट्स मध्ये नक्की लिहुन पाठवा.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Excel keyboard shortcuts - Part 4 Excel keyboard shortcuts - Part 4 Reviewed by Salil Chaudhary on 10:19 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.