Gmail Themes - Makeover of your inbox !


जीमेलचा निळा-पांढरा अवतार आताशा आपल्या बर्‍याच अंगवळणी पडला आहे. गुगल प्रमाणेच जीमेलही अगदी स्वच्छ आणि नेटनेटके आहे. मात्र जीमेलला "रंगीबेरंग" करण्याची सोय पण आहे बरं का. जीमेलमध्ये iGoogle प्रमाणेच रंगीबेरंगी थीम्स आहेत.

जीमेल थीम्स कशा वापराव्यात? -

  1. जीमेलमध्ये डाव्या बाजुला वर "Settings" टॅब आहे त्यावर क्लिक करा.
  2. "Settings" मध्ये डाव्या बाजुला सर्वात शेवटी "Themes" चा ऑप्शन दीसेल, त्यावर क्लिक करा.
  3. येथे अनेकविध थीम्स दीसतील. आपल्या आवडत्या थीमवर क्लिक करा.
  4. आता तुमचा ईन्-बॉक्स त्या थीमने सजलेला दीसेल.

पण फक्त एवढेच करुन थांबले तर ते गुगलकाका कसले? या थीम्सपैकी काही थीम्स Dynamic Themes आहेत. Dynamic Themes म्हणजे स्थानिक वेळ आणि हवामानानुसार या थीम्स आपोआप बदलतात.

उदाहरणार्थ -

जीमेलमध्ये एक थीम आहे "Beach" नावाची. ही थीम सीलेक्ट केल्यावर तुमच्या लोकेशनबद्दल (देश आणि शहर) माहीती विचारणारा एक डायलॉग बॉक्स समोर येतो. (जर गुगल प्रोफाइल मध्ये आधीच लोकेशनची माहीती दीली असेल तर मात्र हा डायलॉग बॉक्स दीसणार नाही). आणि त्यानंतर तुमच्या स्थानिक वेळेनुसार ही थीम बदलत जाते. "बीच" वरचा सुर्य आणि आकाश पहाटे, दुपारी आणि संध्याकाळी जागा आणि रंग बदलत जातात. आहे की नाही मजेशीर कल्पना !

तसे काही फार उपयुक्त फीचर नाही आहे हे पण तेवढीच जरा मजा जीमेल बरोबर !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Gmail Themes - Makeover of your inbox ! Gmail Themes - Makeover of your inbox ! Reviewed by Salil Chaudhary on 18:32 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.