How to block an email sender in Gmail

बर्‍याच वेळा आपल्या जीमेलच्या इनबॉक्स मध्ये अनेक फॉरवर्डेड किंवा जंक मेल्स येत असतात. काही लोकांना तर आलेली प्रत्येक ईमेल फॉरवर्ड करण्याचा छंदच जडलेला असतो. आपण उगाचच कोणाचा इमेल बॉक्स भरतोय याची त्यांना काही फीकीर नसते. तर मित्रांनो एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच की मी आज तुम्हाला नको असलेल्या इमेल्स (किंवा नको असलेल्या व्यक्तीकडुन आलेल्या ईमेल्स !) इनबॉक्सपासुन दुर कशा ठेवायच्या ते सांगणार आहे.

होय, असे करणे शक्य आहे आणि सोपे देखील.

  1. ज्या ईमेल अ‍ॅड्रेसवरुन आलेल्या ईमेल्स नको असतील अशांपैकी एक ई-मेल ओपन करा.

  2. More Actions असे बटण दीसेल त्यावर क्लिक करा.

  3. आता Filter messages like this हा पर्याय निवडा.
  4. एवढे करुन झाल्यावर Next step या बटणावर क्लिक करा.

  5. पुढच्या स्टेपमध्ये अनेक चेकबॉक्स दीसतील, त्यापैकी Delete it चा पर्याय सीलेक्ट करा.
  6. आणि Create Filter या बटणावर क्लिक करा.

यापुढे त्या ईम्रेल पत्त्यावरुन आलेल्या सर्व ईमेल्स आपोआप डीलीट होतील.

टीप - जर ईमेल डीलीट करायच्या नसतील तर Skip the inbox व apply the label हे पर्याय एकत्र सीलेक्ट करा आणि अशा सर्व ईमेल्स साठी एक लेबल बनवा. असे केल्यास सर्व ईमेल्स ईनबॉक्स मध्ये न जाता आपोआप ते लेबल असलेल्या फोल्डर मधे जातील.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

How to block an email sender in Gmail How to block an email sender in Gmail Reviewed by Salil Chaudhary on 09:37 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.