मराठी ई-मासिक "नेटभेट - नोव्हेंबर २००९ "


मराठी भाषेतील साहीत्यकृती आणि मराठी माणसाचे साहित्यप्रेम या दोनही गोष्टींची महती सर्वश्रुत आहे. शेकडो मासिके, वर्तमानपत्रे आणि हजारो पुस्तकांमुळेच मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठीच्या याच वाचनसंस्कृतीला संगणकयुगातही पुढे नेण्याचा आमचा एक प्रयत्न म्हणुन जन्माला आले "नेटभेट ई-मासिक". मराठी ब्लॉगर्सनी या क्षेत्रात आपले पाय रोवायला सुरुवात केली असली तरी अजुनही मोठया वाचकसमुहापर्यंत पोचणे शक्य झालेले नाही. यावर उपाय म्हणुनच आम्ही सर्वोत्कृष्ट मराठी ब्लॉगर्सचे सर्वोत्कृष्ट लेख निवडून "नेटभेट ई-मासिका"द्वारे जगभरातील १,००,००० मराठी रसिक वाचकांपर्यंत ई-मेलद्वारे पोहोचवतो.

"नेटभेट' हे वाचकांना आणि मराठी ब्लॉगर्सना भेटण्याचे ठीकाण झाले आहे. या ठीकाणी आमच्या वाचकांना वेगवेगळ्या चांगल्या मराठी ब्लॉगर्सचे लेख वाचायला मिळतात व लेख आवडल्यास थेट त्या ब्लॉगरच्या ब्लॉगला भेट देता येते. एवढेच नव्हे तर वाचक हे मासिक डाउनलोड करुन आपल्या सवडीनुसार वाचु शकतात. वाचकांकडे लेखांचा एक चांगला संग्रहही जमा होतो. ब्लॉगर्सदेखील आपले उत्तम लेख येथे प्रकाशीत करुन एक लाख मराठी रसिकांपर्यंत पोहोचु शकतात. यामुळे ब्लॉगर्स जास्तीत जास्त वाचकांशी प्रभावीपणे संवाद साधु शकतात आणि त्यांनी दीलेल्या कमेंट्स, प्रशंसा, सुचवीलेल्या सुधारणा यांवर काम करुन आपला ब्लॉग जास्तीत जास्त प्रभावी बनवु शकतात.

नेटभेटच्या प्रत्येक अंकात आम्ही विविध विषयांवर आधारीत माहीतीपुर्ण लेखांचा समावेष करण्याचा प्रयत्न करत असतो.या अंकातही असे अनेक वेगवेगळ्या छटांचे लेख आम्ही आपल्यासाठी आणले आहेत. सदैव खिशात निपचीत पडुन राहणार्‍या रुमालाची कथा, कॉलेजजीवनात लावलेल्या आणि तेव्हाच असे करणे शक्य असलेल्या एका आगळ्यावेगळ्या पैजेची कथा, गजर वाजताच पळत सुटणारे गजराच्या घड्याळाची माहीती आणि सुरक्षीत ट्रेकींगसाठी एका "भटक्या" ट्रेकरने सांगीतलेल्या टीप्स असे गमतीदार तसेच माहीतीपुर्ण लेख वाचायला मिळतीलच त्याचबरोबर एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नाईक, पु.लंची सावली असलेल्या सुनिताबाई देशपांडे, एका पाळीव प्राण्याचं मनोगत (माझे फेवरेट), भातुकलीच्या खेळातुन उलगडणारी नाजुक नाती असे हृदयाला हळुवार स्पर्ष करुन जाणारे विषयही आहेत. संदीप गजाकस नामक एका तरुणाने चालु केलेला आगळावेगळा व्यवसाय हा एक प्रेरणादायी लेख आणि गुगलचा परीणामकारक वापर करण्यासाठीच्या काही टीप्स देखील आहेत आणि या सगळ्यांसोबत पुण्यातील "अभिरुची" व हैदराबादची सहल घडवुन आणणारे प्रवासवर्णनाचे लेखही आहेत.

दीवाळीच्या शुभ मुहुर्तावर "नेटभेट"चे पहीले-वहीले ई-मासिक आम्ही प्रकाशीत केले होते. त्यावेळी मनात बरेच विचार (काही चांगले, काही वाईट) एकाच वेळी गोंधळ घालत होते. पण रसिक वाचकांचा मिळालेला प्रतीसाद आणि या अंकाची स्वीकृती पाहुन आता आम्हाला पुर्ण विश्वास वाटु लागला आहे की रसिक वाचकांच्या आशीर्वादाने "नेटभेट" नक्कीच यशाचे शिखर गाठेल. आणि याचा प्रत्यय नुकत्याच स्टार माझा वाहीनीतर्फे घेण्यात आलेल्या "माझा ब्लॉग" या स्पर्धेत आला.

स्टार माझा तर्फे आयोजीत करण्यात आलेल्या "माझा ब्लॉग" स्पर्धेत "नेटभेट"ला उल्लेखनीय ब्लॉग म्हणुन निवडण्यात आले. प्रख्यात आयटी गुरु श्रीयुत अच्युत गोडबोले यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. (अच्युत गोडबोलेंसारख्या एका "Techie" अवलियाने आपला ब्लॉग वाचावा आणि त्यांना तो आवडावा हीच आमच्यासारख्या "Techie"साठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.)

नेटभेट" हा ब्लॉग सुरु करुन अवघे आठ महीने झाले आहेत. या छोट्याशा कालावधीत वाचकांनी आणि रसिकांनी भरपुर प्रोत्साहन दीले, प्रेम दीले. नेटभेट चे आजचे यश हे सर्वस्वी नेटभेटच्या वाचकांचे आणि मायमराठीचे आहे. असाच किंबहुना याहुन अधिक पाठींबा आणि प्रतीसाद "नेटभेट ई-मासिका"ला मिळेल एवढीच अपेक्षा !

जय हिंद ! जय महाराष्ट्र !
------------------------------------------------------------------------------------------------

नेटभेट ई-मासिक नोव्हेंबर २००९ चा अंक -

नेटभेट ई-मासिक ऑक्टोबर २००९
------------------------------------------------------------------------------------------------

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

मराठी ई-मासिक "नेटभेट - नोव्हेंबर २००९ " मराठी ई-मासिक "नेटभेट - नोव्हेंबर २००९ " Reviewed by Salil Chaudhary on 18:02 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.