दृष्टीभ्रम

गेले काही दिवस "नेटभेट"मासिकाच्या कामात गुंतलो होतो त्यामुळे "इंटरनेट"ची मुशाफीरी करुन एखादी छानशी वेबसाईट वाचकांच्या भेटीला आणता आली नाही. मात्र ई-मासिकाच्या कामातुन मोकळा झालो आणि नेहमीच्या आवडत्या वेबसाईट्सवर एक फेरफटका मारायला घेतला. त्यापैकीच एका साईटवर मला आणखी एक छान साईट बघायला मिळाली आणि मी लगेचच "नेटभेटीयन्स" साठी लेख लिहायला घेतला.

ईमेल द्वारे अनेक फॉरवर्डेड मेसेजेसमध्ये बर्‍याच वेळा "Optical Illusions" म्हणजेच दृष्टीभ्रम करणार्‍या चित्रांचा समावेश असतो. ( दीलेल्या चित्रामध्ये एक चेहरा लपला आहे तो शोधा अशा प्रकारच्या. लक्षात आलं असेल तुमच्या). तर अशा दृष्टीभ्रम करणार्‍या चित्रांचा एक खजीनाच मला या वेबसाईटवर पहायला मिळाला. या साइटचे नाव आहे moillusions.com (मोईल्युजन्स्.कॉम - Mighty optical Illusions).

या साईटबद्दल काही सांगत नाही कारण ही साइट काही सांगण्यासारखी नसुन पाहण्यासारखी आहे. आताच भेट द्याwww.moillusions.com

इथे मला आवडलेले काही दृष्टीभ्रम देत आहे आणि मुद्दाम त्याची उत्तरे देत नाही आहे. बघा तुम्हाला सुटतात की ही कोडी? उत्तर कळल्यास खाली कमेंट्स मध्ये लिहा. (आणि स्वतःची पाठ थोपटुन घ्या)

या चित्रामध्ये एक वाघ दीसतोय आणि एक वाघ लपलेला आहे. चला तर मग त्या लपलेल्या वाघाला म्हणजेच hidden Tiger ला शोधा बरे. (आणि काही क्ल्यु वैगरे मिळणार नाही, कारण क्ल्यु मी आधीच दीला आहे)


या चित्रामध्ये एक सिंहाचा चेहरा दीसतोय. पण सिंहाच्या चेहर्‍यामध्ये आणखी कोणता चेहरा दीसतो का ते शोधा बरे.

पटकन सुकणार्‍या एका नेलपेंटची ही जाहीरात आहे. कसे जमवले असेल बरे हे?


हा कुत्रा अंगावरच्या माशांमुळे अगदी त्रस्त होउन एका ठीकाणी अंग खाजवत बसला आहे. पण कुठे बसलाय ते बघा कळतंय का?हे मसाई-मारा लोक कोणत्या गाडीने प्रवास करतात? कळले का?


हे पारदर्शक संगणक कसे बनवले असतील काही कल्पना येतेय?
हे एक वाघाचे चित्र आहे. आणि त्याचे डोळे जमीनीवर रंगवण्यात आले आहेत. यात दृष्टीभ्रम कुठे आणि कसा लपलाय ते शोधा बरे.

खरेतर आपला मेंदु हा बराचसा डोळ्यांच्या भरवशावर राहुन काम करत असतो. त्यामुळेच जे दीसतय तेच आपण खरे समजुन चालतो, याला इल्युजन असे म्हणतात. आणि मित्रांनो आपण सारेच जण थोड्याफार फरकाने या इल्युजन्समध्ये अडकलेले असतो. भरपुर पैसा, सुखी जीवन, उद्या आरामात जगण्यासाठी चाललेली आजची धावपळ ही सारी त्या इल्युजन्सचीच उदाहरणे आहेत. देवाने एक इल्युजन बनवले आहे, त्याचे नाव आहे "उद्या".

या "उद्या" मध्ये अडकलेले आपण सर्व "आज" जगणे मात्र विसरुन जातो !

Credits - www.moillusions.com


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

दृष्टीभ्रम दृष्टीभ्रम Reviewed by Salil Chaudhary on 09:56 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.