Accept Credit Card payments with your Mobile phone.


ट्वीटर.कॉम या २००९ मधील सर्वाधीक लोकप्रीय सोशल नेटवर्कींग साईटचा संस्थापक (Founder) जॅक डॉर्सी याने आता एक नविन उपक्रम हाती घेतला आहे. ट्वीटरच्या यशानंतर वेब बेस्ड किंवा सोशल नेटवर्कींगशी संबंधीत काही करण्यापेक्षा जॅकने एक वेगळच काम केले आहे.

जॅकने एक अशी पेमेंट सीस्टम बनवीली आहे ज्याद्वारे कोणत्याही क्रेडीट कार्डचे व्यवहार मोबाईलवर करता येतील. थोडक्यात क्रेडीट कार्ड स्वाइप करण्यासाठी दुकानांमध्ये जे स्कॅनर वापरले जातात त्याच्याऐवजी फक्त मोबाइलद्वारे क्रेडीट कार्ड स्कॅन करुन त्यातुन रक्कम वजा करण्याची सोय जॅकच्या या नव्या सीस्टम मध्ये आहे.

Square या नावाने ओळखल्या जाणार्‍या या सेवेमध्ये जॅक आणि त्याच्या टीमने एक छोटेसे इलेक्ट्रॉनिक उपकरण (USB च्या आकाराचे) बनवले आहे. हे उपकरण मोबाईलला जोडले आणि मोबाइलमधील सोफ्टवेअर अप्लिकेशन चालु केले की मोबाइलला क्रेडीट कार्ड स्कॅनर म्हणुन वापरता येते. यामध्ये फोटो आयडींटीफीकेशनची सुविधा आहे त्यामुळे क्रेडीट कार्डच्या खर्‍या मालकाचा फोटो लगेचच मोबाइल स्क्रीनवर दीसु लागतो. क्रेडीट कार्ड वापरल्यानंतर लगेचच SMS आणि ई-मेलद्वारे पोचपावती पाठवीली जाते. यामुळे कागदी पावत्यांचा वापर कमी होइल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्क्वेअर वापरुन होणार्‍या प्रत्येक व्यवहारातील १ penny समाजकार्यासाठी वापरली जाणार आहे.

जॅक डॉर्सीच्या मते स्क्वेअरमुळे क्रेडीट कार्ड वापरण्याच्या पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होइल. सर्व व्यवहार त्वरीत आणि अतीशय पारदर्शकरीत्या होतील. आणि लोकांना क्रेडीट कार्ड वापरताना वाटणारी भीती कमी होइल.

जॅक डॉर्सीच्या या नविन उपक्रमाविषयी अधिक माहीती मिळवण्यासाठी Square web site ला भेट द्या.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Accept Credit Card payments with your Mobile phone. Accept Credit Card payments with your Mobile phone. Reviewed by Salil Chaudhary on 08:00 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.