Access Your Orkut Account from Facebook.


सोशल नेटवर्कींगच्या क्षेत्रात फेसबुक, मायस्पेस, ऑर्कुट, ट्वीटर अशा अनेक वेबसाईट्सची भाउगर्दी झाली आहे. फेसबुक जगभरात सर्वाधिक लोकप्रीय असले तरी भारतामध्ये मात्र गुगलच्या ऑर्कुटनेच बाजी मारली आहे. आणि म्हणुनच भारतातील बर्‍याच ऑफीसेस मध्ये "Orkut" या साईटवर बंदी आणण्यात आली आहे. अजुनही फेसबुक मात्र फार वापरली गेली नसल्याने भारतातील ऑफीसेसमध्ये या साइटवर बंदी नसावी (असा माझा अंदाज आहे!)

नेटभेटच्या बर्‍याच वाचकांनी मला ऑफीसमध्ये बंदी घातलेली असताना ऑर्कुट कसे वापरावे याबद्दल विचारले होते. त्यासाठी मी power.com हा एक पर्याय देखील सुचवला होता. मात्र power.com मध्ये ऑर्कुट अकाउंटवरील फोटो मात्र पाहता येत नाही. आज मी एका अशा फेसबुक अप्लिकेशन बद्दल सांगणार आहे जे वापरुन तुम्हाला फेसबुकमध्येच ऑर्कुट वापरता येइल. (अर्थात यासाठी फेसबुक अकाउंट असणे आवश्यक आहे)

माय ऑर्कुट असे नाव असलेले हे फेसबुक अप्लिकेशन बनवीले आहे "अ‍ॅमेझॉन.कॉम" मध्ये काम करणार्‍या जीतु मीरचंदानी या भारतीय व्यक्तीने. (या अ‍ॅप्लिकेशनने ऑर्कुटची पार वाट लावली आहे !)
आणि या अप्लिकेशनची खास बात म्हणजे येथे तुम्हाला आपले ऑर्कुट युझरनेम आणि पासवर्ड देण्याची अजिबात आवश्यकता नाही. फक्त तुमच्या ऑर्कुट प्रोफाइलची लिंक दीलीत की झाले. एकदा हे फेसबुक अप्लिकेशन तुम्ही यशस्वीरीत्या चालु केले की मग येथे ऑर्कुटवरील सर्व स्क्रॅप वाचता येतील, नविन स्क्रॅप्स लिहिता येतील आणि ऑर्कुटवरील मित्रमैत्रीणींनी अपलोड केलेले फोटोज देखील पाहता येतील.

माय ऑर्कुट अप्लिकेशन कसे वापरावे?

१. पहील्यांदा फेसबुक वर लॉगीन करा. (नसल्यास खाते उघडुन घ्या)
२. माय ऑर्कुट अ‍ॅपसाठी येथे क्लिक करा.
३. आता खाली चित्रात दाखवील्याप्रमाणे "Go to application" वर क्लिक करा.


४. येथे तुमच्या ऑर्कुट अकाउंटची लिंक चिकटवून (Paste) "Add" बटणावर क्लिक करा.

५. आता फेसबुक मध्येच बिनदीक्कत ऑर्कुटींग चालु करा.

माय ऑर्कुट अप्लिकेशन कसे वाटले ते कळवायला विसरु नका.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Access Your Orkut Account from Facebook. Access Your Orkut Account from Facebook. Reviewed by Salil Chaudhary on 08:57 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.