"Google Goggles" Visual Search

गुगल काकांनी नुकताच एक नविन अप्लिकेशन लाँच केले आहे. या अप्लिकेशनचे नाव आहे "गुगल गॉगल्स" . गुगल गॉगल्स ही अफलातुन सेवा म्हणजे गुगलने ईंटरनेट क्षेत्रात केलेली क्रांती आहे.

गुगल गॉगल्स म्हणजे इमेज सर्चचाच एक प्रकार आहे. पण नेहमीप्रमाणे संगणकावरुन नव्हे तर मोबाईल फोन वरुन. सध्या हे अप्लिकेशन फक्त गुगलच्या Android ( अँड्रोईड) या ऑपरेटींग सीस्टमवर चालणार्‍या मोबाईल फोन्सवरच काम करते मात्र लवकरच iPhone व इतर स्मार्ट फोन्सवर देखील ही सुविधा उपलब्ध होइल.

गुगल गॉगल्स म्हणजे नक्की काय आहे?

गुगल गॉगल्स म्हणजे मोबाईल कॅमेर्‍याच्या सहाय्याने केले जाणारे विज्युअल सर्च (Visual Search). गुगल गॉगल हे अप्लिकेशन मोबाईलमध्ये चालु करुन ज्या गोष्टीची माहीती हवी आहे तीचा फोटो काढला की गुगल आपल्या करोडो ईमेजेसच्या डेटाबेसमधुन मिळत्याजुळत्या ईमेजेस शोधुन काढते. एवढेच नव्हे तर त्या गोष्टीशी संबंधीत इंटरनेटवरील माहीती लगेच मोबाईलवर उपलब्ध करुन देते.

समजा तुम्ही एका मॉलमध्ये काही सामान विकत घेत आहात. समोर असलेल्या एकाच उत्पादनाच्या दोन ब्रॅंड्सपैकी कोणता निवडावा याबाबत संभ्रमीत झाला असाल तर फक्त खिशातुन मोबाईल बाहेर काढुन दोनही ब्रँड्सच्या पाकीटांचा फोटो काढा. काही क्षणांतच त्या दोनही ब्रॅंड्सची पुर्ण माहीती लगेचच मोबाइलवर उपलब्ध होइल.

गुगलने याआधी गुगल मॅप्स आणि स्ट्रीट व्ह्यु या अपल्या उपक्रमाअंतर्गत पुर्ण जगाचे स्कॅनींग करुन ठेवलं आहे. एखाद्या रस्त्यावर कोठे चुकला असाल तर तेथील काही लँडमार्क्सचा फोटो काढला तर गुगल गॉगल लगेचच ती जागा, तेथील वैशीष्ट्ये, आसपासची माहीती सर्व मोबाईलवर दाखवेल.

पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा फोटो काढा, लगेचच त्या पुस्तकाची माहीती, किंमत, समीक्षा सर्व सर्व माहीती होइल. व्हीजीटींग कार्डचा फोटो काढलात तर त्या व्यक्तीची ईंटरनेटवरील सर्व माहीती काही क्षणांतच तुमच्यासमोर येइल. असे अनेकविध उपयोग आहेत या अप्लिकेशनचे.
अजुनही हे अप्लिकेशन बाल्यावस्थेतच आहे त्यामुळे सर्वच ईमेजेसवर हे काम करत नाही. मात्र येत्या एक दोन वर्षात मोबाईलद्वारे ईमेज सर्च ही एक अत्यावश्यक गरज होउन जाईल यात शंका नाही.
गुगल काकांनी नेहमीप्रमाणे काळाची पावले लवकरच ओळखली आहेत. आगे आगे देखो होता है क्या !Visit - Google Goggles.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

"Google Goggles" Visual Search "Google Goggles" Visual Search Reviewed by Salil Chaudhary on 10:59 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.