Happy holidays from Gmail !

पुर्वी सणासुदीला शुभेच्छापत्रे पाठवीली जात असत. नंतर ई-मेल्स/SMS या सुविधा आल्या आणि शुभेच्छा कार्डांची मात्र गच्छंती झाली. मात्र आता दस्तुरखुद्द गुगल काकांनी शुभेच्छा कार्डांना पुनर्जीवीत करायला घेतले आहे. गुगलने डीसेंबर महीन्यात नाताळासाठी शुभेच्छा कार्डे वाटण्याचे ठरवले आहे आणि ते देखील हार्ड कॉपी म्हणजेच कागदी शुभेच्छा पत्रे.

तुमचे कोणी मित्र किंवा नातेवाईक युएस मध्ये वास्तव्य करुन असतील तर ही तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे कारण गुगलच्या या नविन सुविधेचा फायदा घेउन तुम्ही देखील आपल्या कोणत्त्याही एका मित्राला किंवा नातेवाईकाला नाताळासाठी शुभेच्छापत्र पाठवु शकता. गुगलच्या सर्व सेवांप्रमाणेच ही देखील मोफत सेवा आहे.

गुगलच्या माध्यमातुन मोफत शुभेच्छापत्र पाठवण्यासाठी येथे क्लिक करुन एक फॉर्म भरा. यामध्ये ज्या व्यक्तीला शुभेच्छापत्र पाठवायचे आहे त्याचे/तिचे नाव, पुर्ण पत्ता (ई-मेल नाही!) आणि मेसेज टाइप करा. गुगलने उपलब्ध करुन दीलेल्या सहा डीझाइन्सपैकी तुमचे आवडते डीझाइन निवडा आणि "Send your card" वर क्लिक करा.

त्वरा करा ! ही ऑफर फक्त शुभेच्छापत्रांचा स्टॉक असेपर्यंतच आहे ! Merry X'mas !


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Happy holidays from Gmail ! Happy holidays from Gmail ! Reviewed by Salil Chaudhary on 04:41 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.