Positivesaathi.com.....Beginning of a planned life for HIV+

१ डिसेंबर २००९

सध्या आमच्या ऑफिसमध्ये क्रिकेटचे सामने चालु असल्यामुळे, अलिकडे मला घरी जायला उशीरच होतो तसा. प्रॅक्टिस झाल्यावर माझ्या मित्रांनी मला स्टेशनवर सोडले. नेहमी चढतो त्या डब्याजवळ येऊन ऊभा राहिलो. ट्रेन आज फक्त ५ मिनिटे उशिरा धावत होती. ट्रेन येताच चालू ट्रेनमध्ये चढलो. आज ट्रेनला गर्दी तशी कमिच होती (म्हणजे व्यवस्थित उभे राहाता येईल इतकी जागा होती. माझ्या मागोमाग २ मुले चढली, वयाने असतील २७ ते २८ वर्षाची. हे माझ्याबरोबर स्टेशनवरही उभे होते. खरतर त्यांचा मोठा ग्रुप होता ७ ते ८ मुलामुलींचा.....असो. सवईप्रमाणे पेपर काढला आणि वाचायला लागलो. जसजसे स्टेशन्स येत गेले तसतशी गर्दी कमी होऊ लागली. पेपरही वाचुन झाला. दाराजवळ उभा राहून गार हवेचा आस्वाद घेत होतो. ही मुले अजुनही माझ्या बाजुला उभी होती. त्यांचा पोशाख, त्यांनी लावलेला परफ्युम, बोलायची पद्धत ह्या वरून ते चांगल्या घरातले वाटत होते. डोळे बंद करुन उभा होतो आणि आता त्यांची बडबड कानावर पडू लागली होती. त्यांच्या गप्पांवरून हे स्पष्ट झाले होते कि एकाचे नाव जॉन आणि दुसर्‍याचे अ‍ॅलेक्स होते.

दोघांनी आपआपल्या शर्टच्या बाहीवर एड्सचा बिल्ला लावला होता. तो बघुन आज दिवसभर एड्स व
एच्.आय.व्हीवर माहिती देणार्‍या बर्‍याच मेल्सची आठवण झाली व मी त्या माहितीची उजळ्णी करू लागलो.....१ डिसेंबर १९८८ पासुन 'वर्ल्ड एड्स डे' पाळ्ला जात आहे. UNAIDS प्रमाणे सध्या ३३.४ अब्ज लोकांना एड्स झाला असुन त्यापैकी २.१ अब्ज शिशू आहेत. १९७० पर्यंत लोक ह्या भयानक आजाराबद्दल अज्ञात होते. पण गेल्या ४० वर्षात ह्या आजारावर भरपुर संशोधन झाले असुन आता ह्या आजाराला कसे टाळावे, काय काळजी घ्यावी, ह्यावर होण्यासारखे उपचार, ह्या सगळ्यावर भरपुर माहिती उपलब्ध आहे. सर्व देशाचे सरकार हा आजार कमी होण्यासाठी विविध मोहिमा हाताळत आहे. एड्स न होण्यासाठी घ्यावी लागणारी सावधानी, काही विषेश टिपण्या.....वगैरेवगैरे.' इतक्यात कोणाचातरी धक्का लागला आणि माझ्या विचारांचे इंजिन थांबले. परत ह्या दोघांच्या गप्पा कानावर पडू लागल्या.

Alex: Did you observe how Mary was looking at you dude? You never introduced me to her before. How did you both meet?

दोन पुरूषांमधील आवडता विषय...ह्या विषयाला वय अपवाद नाही.

John: stop it man!!! any ways today was a nice day. our initiative to educate those children was a good experience.

हे ऐकुन मी असे गृहित धरले कि ही मुले एखाद्या संस्थेचे कार्यकर्ते आहेत व त्यांनी आज कुठल्यातरी शाळेच्या मुलांना शिकवायची मोहिम हातात घेतली होती.

Alex: Specially when you know that we are only going to get this chance for only God knows how many years.

मी थोडा गोंधळलो. काही क्षण ती मुलेही शांत. कुठेतरी शुन्यात बघुन आपले ओठ चावत होते. एलेक्सनी परत विषय काढला.......

Alex: Dude don't deviate the topic. Mary haan.....

जॉनच्या पोटात अलगद गुद्दा मारुन एलेक्स हसत होता. जॉन पण गालातल्या गालात हसत होता.

John: Actually Alex, I wanted to tell this to all friends but somehow I was not able to gather the courage...Ahhh...how should i tell u man..Ok!!!! Actually we are getting married!!!

मला उगाच ह्या गोषटीचा आनंद झाला. वास्तविक मी जॉन आणि एलेक्सला पहिल्यांदाच पाहिले होते. आणि कदाचित शेवटचेच....ट्रेन मध्ये आपण असे कित्येक नविन चेहरे रोज पाहतो. मेरी कशी दिसते हे माहिती पण नाही मला. तितक्यात एलेक्सचा आवाज वाढला आणि अतिशय चिंताग्रस्त भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसले.

Alex: WHAT??? But John we are HIV +

John: and so is Mary!!!!!

हे ऐकुन माझ्या तोंडचे पाणी पळाले. तिघांची नजर एक झाली.

John: Alex, just go home and see positivesaathi.com. That will answer all your questions about how we met and how we were able to take this decision.

तितक्यात पुढचे स्टेशन आले आणि ते दोघेही उतरले. ट्रेन सुटेपर्यंत माझी नजर त्या दोघांवरून हलली नाही. एकमेकांच्या खांद्यावर हात टाकुन दोघे रमत गमत जात होती. ट्रेन सुटली. माझ्या डोक्यात एकच शब्द फिरत होता.
positivesaathi. घरी पोचुन जेवणे ही फक्त एक औपचारिक्ता होती कारण मला ही साईट बघायची खुप उत्सुकता लागली होती. जेवण करतांना घरच्यांचा बोलण्याकडे लक्ष नव्हते. जेवण आटोपताच लॉग-ईन केले. नविन विंडो उघडून टाईप केले.....www.positivesaathi.com आणि ही साईट बघता बघता कधी आ वासला हे माझे मलाच कळले नाही.
www.positivesaathi.com ही वेबसाईट श्री अनिलकुमार श्यामराव वाळिव ह्यांनी २००७ मध्ये सुरू केली. लग्न करू ईच्छिणार्‍या लाखो एच्.आय.व्ही + व्यक्ती www.positivesaathi.com द्वरे एकमेकांना भेटू शकतात. लग्न जमवणार्‍या अनेक वेबसाईट्स असल्या तरी www.positivesaathi.com ही वेबसाईट अद्वीतिय आहे कारण एच्.आय.व्ही + व्यक्तिंना भेटवणारी ही एकमेव वेबसाईट आहे. भारतात ५५ लाखाहुन आधिक लोक एच्.आय.व्ही + आहेत. ह्या मध्ये असे कित्येक मुलं मुली आहेत ज्यांना लग्न करुन आनंदाचा संसार करायचा आहे. पण आपण एच्.आय.व्ही + आहोत हे सांगितल्यावर समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दॄष्टिकोन बदलेल ह्या भीतीने कित्येक लोक हे सांगतच नाही आणि त्यांचे स्वप्न हे स्वप्नचं राहते. ह्या लोकांना बोलके करण्यासाठी श्रीयुत वाळीव यांनी घेतलेला हा पुढाकार अतिशय कौतुकास्पद आहे.

एड्सग्रस्त असलेले व्यक्ति ह्या साईटवर आपली पुर्ण माहिती देऊन ह्या साईट्चे मेम्बर होऊ शकतात. एकदा मेंबर झाल्यावर पाहिजे तशा साथीची निवड करू शकता. ह्या साईटवर एच्.आय.व्ही व एड्सवर भरपुर माहिती पुरवली आहे. एच्.आय.व्ही व एड्समधला फरक, एच्.आय.व्हीचे विविध प्रकार, एड्स होण्याची कारणे, एड्सची चाचणी, वेगवेगळे कॉंडम्स, औषधे आणि उपचार अशा अनेक विषयांवर सविस्तर माहिती पुरवली गेली आहे. एड्स ग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारने चालवलेल्या अनेक उपक्रमांबद्दल माहिती तुम्हाला इथे मिळेल. आरोग्य विभाग, सरकारी दवाखाने,विनामुल्य वाटली जाणारी औषधे ह्या गोष्टींवरही पुरेशी माहिती इथे मिळेल. लवकरच ध्यान / चिंतन ह्या विषयावर वाळीव साहेब माहिती देणार आहेत. ही माहिती एच्.आय.व्ही व्यक्तिंसहित सामान्य माणसालाही उपयोगी पडेल.रत्नागिरीतील श्री अनिलकुमार श्यामराव वाळीव ह्यांनी वयाच्या सुमारे पस्तिसाव्या वर्षी हा उपक्रम हाती घेतला. बी. ई. सिवील असलेले वाळीव साहेब सध्या महाराष्ट्राच्या मोटर व्हेईकल विभागात डेप्युटी आर्.टी.ओ म्हणुन काम करतात. त्यांचे काही मित्र एड्समुळे लग्न न करताच स्वर्गवासी झाले. या वेळी वाळीव साहेबांना आपल्या एड्स ग्रस्त बंधू भगिनींसाठी काहीतरी करण्याची तिव्र इछा झाली व ह्या गोष्टीवर विचार करत असतांना त्यांना ह्या वेबसाईट्ची कल्पना आली. त्यांच्यामते एड्सपिडीत बंधू भगिनींची जिवनसाथी शोधण्यात मदत करणे हे एका अर्थाने देवाची सेवा करण्यासारखेच आहे. महाराष्ट् सरकारमधील एक उच्च पदवीधर असल्यामुळे त्यांना इतरही बर्‍याच जवाबदार्‍या आहेत. वेळेच्या अभावी या साईटच्या परिवर्तनाचे काम थोडे हळुवारपणे चालू आहे. आतापर्यंत सुमारे ४०० (भारतीय आणि परदेशी) लोकांनी आपली नोंदणी ह्या साईटवर केली आहे. ह्या सामाजिक उन्नतिच्या कामात बरेच नविन मित्र वाळीव साहेबांना साथ देत आहेत.

या प्रकल्पाचे एकमेव ध्येय म्हणजे देशाची सेवा. या कामासाठी आत्तापर्यंत कुठलाही द्रव्यनिधी घेतला गेला नाही आणि ह्या पुढेही घेतली जाणार नाही असे वाळीव साहेबांनी ठामपणे सांगितले आहे. ह्या साईटवर नोंदणी विनामुल्य होते. सर्व सदस्यांशी संवाद अतिशय प्रेमळ व आपुलकीने केला जातो. वाळीव साहेब म्हणतात, एड्स ग्रस्त लोकांना होणार्‍या वेदना, त्यांच्या भावना, त्यांचे एकलकोंडे झालेले जिवन, ह्या रोगावर पुरेशी माहिती नसल्यामुळे रोज हजारो लोकांची ह्यात पडणारी भर, एड्स साठी सरकारतर्फे उपलब्ध होणार्‍या निधीमध्ये लोकांनी केलेले स्वतःचे केलेले फायदे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला हे चांगले काम करण्यासाठी उत्तेजीत करतात.

सहज स्क्रिनच्या कोपर्‍यातल्या घड्याळाकडे लक्ष गेले. रात्रीचे १:०० वाजले होते. जवळजवळ एक-दीड तास मी ही साईट बघत होतो. खूप उशिर झाल्याची जाणीव झाल्यावर पी.सी. बंद केला आणि बिछान्यावर जाऊन पडलो.

डोळे मिटतांना एकच विचार डोक्यात आला................वाळीव साहेबांच्या उपक्रमाला सलाम!!!!!!!!!.....आणि.....Wish John and Mary a very happy married life!!!!!

वाचकहो, या लेखाद्वारे "प्रणव जोशी" प्रथमच आपल्या भेटीला येत आहे. नेटभेट ई-मासिकाच्या कामात सतत कार्यमग्न असलेल्या प्रणवने "नेटभेट"साठी लेखन करायला या लेखाद्वारे सुरुवात केली आहे. मित्रांनो संपुर्ण शिक्षण ईंग्रजी माध्यमातुन झालेल्या प्रणवने मराठीत लिखाण करणे (आणि ते देखिल कीबोर्डच्या सहाय्याने :-P) ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. मायबोली मराठीची ओढच प्रणवला मराठी लिखाणाकडे घेउन आली आहे. यापुढेही आपल्याला प्रणवचे विविध विषयांवरचे लिखाण वाचावयास मिळेल.प्रणवला माझ्यातर्फे आणि नेटभेटच्या सर्व वाचकांतर्फे खुप खुप शुभेच्छा !
प्रणव जोशीचे पुर्ण प्रोफाईल पहाGet NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


Positivesaathi.com.....Beginning of a planned life for HIV+ Positivesaathi.com.....Beginning of a planned life for HIV+ Reviewed by Salil Chaudhary on 09:33 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.