Start new year with an empty Gmail inbox !

[ MARATHI ]......


जीमेलने unlimited इनबॉक्सची सोय उपलब्ध करुन दीली आणि सर्वांनी जीमेलवर अकाउंट उघडण्यासाठी उड्या घेतल्या. बघताबघता इतर सर्व ईमेल अकाउंट्स मागे पडत गेले आणि आपण फक्त जीमेल वापरु लागलो. ईनबॉक्स भरत गेला आणि आता अशी अवस्था आहे की आपला जीमेल ईनबॉक्स म्हणजे जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. हजारो इमेल्सने भरुन गेलेल्या आपल्या इनबॉक्सवरील सर्व ईमेल्स अचानक गायब झाल्या आणि Inbox(0) असे चित्र दिसले तर?


काय ! धक्काच बसेल ना तुम्हाला. अहो पण मला (किंवा कोणत्याही पॉवर युझरला) मात्र असे काही झाले तर बरेच वाटेल. आणि या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारी २०१० ला मी असे करणार देखील आहे. २०१० ची सुरुवात मी पुर्णपणे मोकळ्या इनबॉक्सने करणार आहे. मागच्या वर्षाचं कोणतेही ओझं मला पुढे न्यायचं नाही आहे.


पण, मित्रांनो मी काही माझ्या ईमेल्स डीलीट करणार नाही आहे. मी फक्त सर्व ईमेल्सना नजरेआड करणार आहे. ईनबॉक्समधुन नाहीश्या झाल्या तरी जीमेल सर्च ,Todo list आणि कॅलेंडर या सर्वांमध्ये मात्र माझ्या जुन्या ईमेल्स दीसणार आहेतच त्यामुळे मला चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पण या छोट्याश्या युक्तीमुळे नविन वर्षाची सुरुवात माझ्यासारखीच नव्या उत्साहात नविन ईनबॉक्सने करु शकता.इनबॉक्स रिकामा कसा करावा?आपल्या जीमेल ईनबॉक्स मध्ये लॉग-ईन करुन सर्व इमेल मेसेजेस सीलेक्ट करा. त्यासाठी खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे अनुक्रमे All आणि Select all XXX conversation in inbox वर क्लिक करा.


सर्व ईमेल्स सीलेक्ट केल्यानंतर labels वर क्लिक करुन Create New चा पर्याय निवडा.


येथे आपल्या जुन्या ई-मेल्ससाठी एक नाव द्या. मी उदाहरणादाखल inbox 2009 असे नाव दीले आहे. आता तुमच्या इनबॉक्समधील सर्व ईमेल्सना नविन लेबल लागु होइल.

ईनबॉक्सच्या डाव्या बाजुला सर्व लेबल्सच्या यादीमध्ये inbox 2009 हे लेबल दीसेल त्यावर क्लिक करा आणि पुन्हा (स्टेप १) अनुक्रमे All आणि Select all XXX conversation in inbox 2009 वर क्लिक करा.

सर्व ईमेल्स सीलेक्ट झाल्यावर more actions मध्ये जाउन Archives वर क्लिक करा.

खात्री करुन घेण्यासाठी एक डायलॉग बॉक्स उघडेल तेथे Yes हा पर्याय निवडा.

आता inbox वर क्लिक केल्यास जादु केल्याप्रमाणे सर्व ईमेल्स गायब होउन इन्बॉक्स एकदम मोकळा झालेला दीसेल.सर्च केल्यास किंवा inbox 2009 या लेबलवर क्लिक केल्यास या ईमेल्स पुन्हा दीसु शकतील.

अशा रीतीने गायब झालेल्या ईमेल्स परत आणायच्या असतील तर -ईनबॉक्सच्या डाव्या बाजुला सर्व लेबल्सच्या यादीमध्ये inbox 2009 हे लेबल दीसेल त्यावर क्लिक करा आणि पुन्हा (स्टेप १) अनुक्रमे All आणि Select all XXX conversation in inbox 2009 वर क्लिक करा.

आणि Move to मध्ये जाउन Inbox वर क्लिक करा. तुमच्या हरवलेल्या सर्व ईमेल्स इनबॉक्समध्ये परत येतील.


जीमेल इनबॉक्स अगदी नव्यासारखा करण्यासाठीची ही टीप कशी वाटली ते सांगायला विसरु नका.


Thanks - http://www.mattcutts.com

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Start new year with an empty Gmail inbox ! Start new year with an empty Gmail inbox ! Reviewed by Salil Chaudhary on 08:41 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.