Start your favourite applications at computer startup.

ऑफीस प्रॉडक्टीव्हीटी म्हणजेच ऑफीसमध्ये काम करताना आपली कार्यक्षमता सुधारणे हे हल्लीच्या स्पर्धात्मक युगात अतिशय महत्त्वाचे आहे. नेटभेटवर याआधी सांगीतलेल्या संगणकावर काम करण्यासंबंधीच्या काही युक्त्या, कीबोर्ड शॉर्टकट्स हे ऑफीस प्रॉडक्टीव्हीटी सुधारण्यासाठी सांगीतलेले काही प्रकार होते. आज मी एक अशिच सोपी परंतु अतिशय उपयुक्त प्रॉडक्टीव्हीटी टिप सांगणार आहे.दररोज संगणकावर आपण काही मोजके प्रोग्राम्स नियमीत वापरत असतो. उदाहरणार्थ संगणक चालु केल्याकेल्या मायक्रोसॉफ्ट आउटलुक, कॅलेंडर, रोजच्या कामाची यादी असलेले ToDo अप्लिकेशन, ERP सीस्टम किंवा नेहमी आवश्यक असणारा एखादा फोल्डर.संगणक सुरु केल्याकेल्या आपोआप हे सर्व प्रोग्राम्स सुरु करता येतील यासाठीची एक युक्ती आज आपण पाहुया.जे प्रोग्राम्स आपोआप सुरु करायचे आहेत त्यांचे शॉर्टकट्स आधी तयार करुन घ्या. Right click करुन send to desktop वर क्लिक केल्यास प्रोग्रामचा शॉर्टकट आपोआप डेस्कटॉपवर दीसु लागेल.आता या डेस्कटॉप वरील शॉर्टकट्सना कॉपी करुन C:\Documents and Settings\User\Start Menu\Programs\Startup येथे चिकटवा.


( कृपया नोंद घ्या की ही जागा विंडोजच्या इंस्टॉलेशन ड्राईव्हनुसार आणि user नुसार बदलतते.)


हे सर्व प्रोग्राम्स start → Programs → Startup येथे दीसु लागतील.आता तुमचा कंप्युटर Restart करा आणि पहा प्रत्येक वेळी windows तुम्ही सांगीतलेले प्रोग्राम्स कसे आपोआप चालु करते ते.


windows ताट वाढुन ठेवेल पण खाण्याचे काम मात्र तुम्हालाच करायचंय, बरं का !


(This article is contributed by guest author - Ms. Rupali Rane )
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे


Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.Start your favourite applications at computer startup. Start your favourite applications at computer startup. Reviewed by Salil Chaudhary on 07:11 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.