Top Word of 2009: Twitter

ट्वीटर्.कॉम ने इंटरनेट जगतात काय धुमाकुळ घातला आहे हे सर्व "नेटीझन्स"ना माहीत असेलच. ट्वीटर.कॉम ने सर्व जगाचे लक्ष आपल्याकडे वेधुन घेतले आहेच आणि आता तर २००९ सालातील इंग्रजी भाषेतील सर्वात अधिक चर्चीला गेलेला सर्वोत्तम शब्द (top word in the English language for 2009) हा मान देखील पटकावला आहे.

ग्लोबल लँगवेज मॉनीटर ही संस्था जगभरातील भाषा वापरावर लक्ष ठेवुन असते आणि भाषेतील विविध बदल आणि नवनविन शब्दांची नोंद ठेवत असते. या संस्थेने नुकताच जाहीर केलेल्या Top words of 2009 या यादीत Twitter ने पहीला क्रमांक पटकावला आहे. आणि असे करताना ट्वीटरने ओबामा, H1N1, Stimulas या २००९ च्या सुप्रसिद्ध शब्दांना मागे टाकले.

ग्लोबल लँगवेज मॉनीटर या संस्थेचे अध्यक्ष पॉल जे जे पेयॉक यांनी सांगीतले की, ट्वीटर हा शब्द इंटरनेटवरील संवादाचा परवलीचा शब्द ठरला आहे. त्यांच्या मते ट्वीटरच्या यशाचे रहस्य हे फक्त १४० अक्षरांच्या मदतीने प्रभावी संवाद साधण्याची ट्वीटरची कल्पना हे आहे. ट्वीटरने एकुणच मानवाच्या संवाद्कलेचे वेगळे परीमाण घडवले आहे.

ग्लोबल लँगवेज मॉनीटर ही संस्था आपल्या एका खास सॉफ्टवेअर (Predictive Quantities Indicator) द्वारे जगभरातील सर्व माध्यमांमध्ये होणार्‍या भाषेच्या वापराचे निरीक्षण करत असते. यामध्ये इंटरनेट, वर्तमानपत्रे, टीव्ही इत्यादींचा समावेश असतो. शब्दाचा वापर, वारंवारता (Frequency) , संदर्भ आणि जागतीक पातळीवर माध्यमांमध्ये होणारी चर्चा अशा अनेक परीमाणांच्या सहाय्याने शब्दांची लोकप्रीयता ठरवली जाते.

२००९ सालचे सर्वाधिक लोकप्रीय शब्द, शब्दसमुह आणि नावांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Top Word of 2009: Twitter Top Word of 2009: Twitter Reviewed by Salil Chaudhary on 06:17 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.