300 Articlesनुकताच आम्ही नेटभेटच्या पुस्तक भेट योजनेतील जानेवारी २०१० च्या विजेत्यांची नावे जाहीर करणारा लेख प्रकाशित केला. वाचकहो, हा लेख नेटभेटवर प्रकाशित झालेला ३०० वा लेख होता.

तुमच्याकडुन मिळणारे प्रतीसाद, ईमेल्स, सुचना, प्रोत्साहनपर प्रतीक्रीया यांमुळेच नेटभेटवर आम्ही वर्षभर सतत काहीतरी माहितीपर, उपयुक्त लेख लिहु शकलो. आपण जे लिहितो आहोत ते वाचकांना आवडतंय आणि उपयुक्त वाटतंय हा विचारच आमच्या लेखणीला (की-बोर्डला !) जागृत ठेवत राहीला. म्हणुनच आज या ३०१ व्या लेखाच्या निमित्ताने आम्ही वाचकांचे आभार मानु इच्छीतो.
३०० भाग पुर्ण झाल्याचा आनंद वाचकांबरोबर वाटण्यासाठी आम्ही पुस्तकभेट योजना यावेळेस फक्त सभासद वाचकांपर्यंतच मर्यादीत न ठेवता सर्व वाचकांसाठी खुली करत आहोत.

नेटभेट.कॉम, नेटभेट फोरम आणि नेटभेट ई-मासिकाबद्द्ल तुमच्या कमेंट्स, सुचना, प्रतीक्रीया या लेखाच्या कमेंट्स मध्ये आपल्या ई-मेल पत्त्यासोबत लिहा. या लेखाला मिळालेल्या कमेंट्सपैकी एक भाग्यवान विजेता आणखी सात दिवसांनंतर निवडला जाईल व विजेत्यास Stay Hungry stay foolish या पुस्तकाची एक प्रत (मराठी आवृत्ती) देण्यात येईल.

नेटभेटला दीलेल्या पाठींब्यासाठी पुन्हा एकवार धन्यवाद !Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


300 Articles 300 Articles Reviewed by Salil Chaudhary on 10:57 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.