Attitude is Everything


"Positive Attitude" म्हणजेच सकारात्मक दृष्टीकोन हा सर्व यशस्वी माणसांमध्ये आढळाणार्‍या गुणांपैकी एक महत्त्वाचा गुण आहे. खरंतर या एका गुणामुळेच यश आणि अपयश यांतील फरक ठरत असतो.

जीवनातील अनेक कठीण प्रसंगांमध्येच नव्हे तर अगदी दैनंदीन लहानमोठ्या घडामोडींमध्येसुद्धा "Positive Attitude" उपयोगी ठरतो. सकारात्मक दृष्टीकोन आत्मसात करणार्‍यांच्या आयुष्यात प्रचंड बदल घडुन येतो. अशी माणसे आशावादी होतात, जीवनातील चांगल्या गोष्टी पाहु लागतात. ते खुश, आनंदी राहु लागतात आणि मुख्य म्हणजे छोट्या-मोठ्या संकटांनी ते अविचल होत नाहीत, होउ शकत नाहीत.

असं म्हणतात की खरी युद्ध ही रणांगणावर नव्हे तर लढणार्‍यांच्या मनामध्ये लढली व जिंकली जातात. मानसिक दृष्ट्या जो कमजोर असतो तोच हरतो. सकारात्मक विचार करण्याची सवय ही अशी मनातुन लढली जाणारी युद्धे जिंकण्यासाठी आवश्यक असणारे शस्त्र आहे.

काही वर्षांपुर्वी सकारात्मक दृष्टीकोनाचे महात्म्य सांगणारी एक गोष्ट वाचनात आली होती. ती सांगतो.
एक राजा आणि त्याच्या मित्राची ही गोष्ट आहे. राजाच्या मित्राला काहीही झालं तरी "हे चांगलं झाले" असे बोलायची सवय होती.

एकदा राजा आणि त्याचा मित्र दोघे शिकारीसाठी जंगलात गेलेले असले असतात. शिकारीसाठी राजाची बंदुक तयार करत असताना त्याच्या मित्राकडुन चुकुन गोळी सुटली आणि राजाच्या अंगठ्याला लागली.

राजाच्या मित्राने सवयीप्रमाणे म्हंटले, "हे चांगलं झालं". मित्राचे हे बोलणं ऐकुन राजा रागावला आणि ओरडुन म्हणाला "नाही, हे चांगले नाही झालं" आणि रागातच राजाने त्याच्या मित्राला कारावासात टाकायचे आदेश दीले.

या घटनेला साधारण एक वर्ष उलटले. राजा पुन्हा जंगलात शिकारीला गेला. मात्र चुकुन राजा जंगलात फारच आतमध्ये गेला आणि वाट चुकला. तेथे जंगली आदिवासी जमातीतील लोकांनी त्याला पकडले. राजाला त्यांनी एका जाडजुड लाकडी खांबाला बांधुन ठेवले. आणि भोवतालीच आग पेटवली.

ते राजाला खाण्याच्या तयारीत होते, तेव्हा त्यांच्यापैकी एकाची नजर राजाच्या तुटलेल्या अंगठ्याकडे गेली. कोणतेही पुर्णांग नसलेले भक्ष्य खायचे नाही अशी अंधश्रद्धा असलेल्या त्या जमातीतील लोकांनी राजाला सोडुन दीले.

जंगलातुन परत आल्यावर राजाने पहिल्यांदा तुरुंगात जाउन त्याच्या मित्राची भेट घेतली. जंगलात घडलेला सर्व वृत्तांत सांगुन राजाने त्याच्या मित्राची माफी मागीतली आणि राजा म्हणाला, " मी खरंच तुझ्याबरोबर खुप खुप वाईट वागलो".

यावर मित्र म्हणाला, " नाही, जे झाले ते चांगलेच झाले".

राजा आश्चर्यचकीत होउन म्हणाला, " हे चांगले कसे झाले? मी तुला एक वर्ष कोठडीत डांबुन ठेवले, ते चांगले
कसे?

मित्र राजाला समजावत म्हणाला, " जर मी तुरुंगात नसतो तर तुझ्याबरोबर शिकारीला गेलो असतो आणि आदिवासींचे भक्ष्य बनलो असतो."

पाहीलंत. आपण ज्या कठीण प्रसंगातुन जात असतो, ज्या प्रसंगांना तोंड देत असतो ते बदलता येत नसतात मात्र आपण या प्रसंगांकडे कोणत्या दृष्टीने पहायचे हे मात्र आपल्यालाच ठरवायचे असते.

सध्या गाजत असलेल्या ३ इडीयट्स या चित्रपटात आमिर खान "All is well" म्हणत असतो ते दुसरे तीसरे काही नसुन सकारात्मक दृष्टीकोनाचेच उदाहरण आहे.

तुमचा All is well मित्र,

सलिल चौधरी

--------------------------------------------------------------------------------------------------------

“Positive attitude” is one of the important qualities possessed by all the successful people in world. In fact I will say it is the only important factor which makes the difference in a winner and a loser.

It is our attitude which decides the way we fight daily battles of life. It helps us to withstand all critical and difficult stages in life.

 
One ancient saying says, “ all the battles are fought and won or lost in mind and not on battle ground”. Your attitude is one thing which makes you win battles of minds. The weaker attitude makes one loose the battle.

I would like a share a story I heard an year before with you.The story is told of a king in Africa who had a close friend with whom he grew up. The friend had a habit of looking at every situation that ever occurred in his life (positive or negative) and remarking, "This is good!"


One day the king and his friend were out on a hunting expedition. The friend would load and prepare the guns for the king. The friend had apparently done something wrong in preparing one of the guns, for after taking the gun from his friend, the king fired it and his thumb was blown off.

Examining the situation, the friend remarked as usual, "This is good!" To which the king replied, "No, this is NOT good!" and proceeded to send his friend to jail. About a year later, the king was hunting in an area that he should have known to stay clear of. Cannibals captured him and took them to their village. They tied his hands, stacked some wood, set up a stake and bound him to the stake.

As they came near to set fire to the wood, they noticed that the king was missing a thumb. Being superstitious, they never ate anyone that was less than whole. So untying the king, they sent him on his way.As he returned home, he was reminded of the event that had taken his thumb and felt remorse for his treatment of his friend. He went immediately to the jail to speak with his end."You were right," he said, "it was good that my thumb was blown off." And he proceeded to tell the friend all that had just happened. "And so I am very sorry for sending you to jail for so long. It was bad for me to do this."

"No," his friend replied, "This is good!"

"What do you mean, 'This is good'? How could it be good that I sent my friend to jail for a year?"

"If I had NOT been in jail, I would have been with you."

Situations may not always seem pleasant while we experience them, but it depends the way you see them... the choice is yours!
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


Attitude is Everything Attitude is Everything Reviewed by Salil Chaudhary on 01:30 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.