Customise mouse for left hand in Windows XP

संगणकाचा माऊस वापरण्यासाठी सर्वात योग्य बोट म्हणजे तर्जनी (Index finger) आणि माउसचे सर्वाधिक वापरले जाणारे बटण म्हणजे Left Click. म्हणुनच संगणकाचे माऊस असे डीझाईन केलेले असतात की आपल्या उजव्या हाताची तर्जनी Left Click साठी वापरता येईल. परंतु डावखुर्‍यांसाठी (Left Handed People) मात्र माउस वापरणे खुप कठीण जाते. अशा व्यक्तींना एकतर उजव्या हाताने माउस वापरणे शिकावे लागते (फार क्लेशदायक आहे ते.) किंवा मग डाव्या हाताने माउस वापरुन तर्जनी लेफ्ट क्लिक साठी वापरता येईल अशा प्रकारे धरावा लागतो (त्यामुळे Right Click सहजगत्या करता येत नाही.)

आज मी माझ्या डावखुर्‍या मित्रांना माऊस डाव्या हाताने वापरण्यासाठीची एक युक्ती सांगणार आहे. ती अशी -
१. विंडोज की दाबुन किंवा ctrl+Esc दाबुन स्टार्ट मेनु मध्ये जा.

२. स्टार्ट मेनु मध्ये अनुक्रमे Settings व त्यानंतर Control Panel मध्ये जा.

३. येथे माउसचा आयकॉन दीसेल किंवा "Printers and Other Hardware" असे दीसेल. त्यावर क्लिक करा.

४. खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे Mouse properties ची विंडो उघडेल.


५. यामध्ये Buttons या पहिल्याच टॅबमध्ये Switch primary and secondary buttons असा एक पर्याय दीसेल. त्यासमोरील चेकबॉक्स (Checkbox) सीलेक्ट करा.

६. अनुक्रमे  OK आणि Apply वर क्लिक करा.

ही पद्धत मायक्रोसॉफ्ट विंडोज XP आणि Vista मध्ये काम करते. जर तुम्ही Windows 98 किंवा Windows 2000 वापरत असाल तर Checkbox ऐवजी Right hand आणि Left hand असे पर्याय दीसतील त्यापैकी योग्य तो पर्याय निवडावा.

( डावखुर्‍यांना) डाव्या हाताने माउस वापरणे कसे वाटते ते सांगायला विसरु नका.

Image Credit

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Customise mouse for left hand in Windows XP Customise mouse for left hand in Windows XP Reviewed by Salil Chaudhary on 09:04 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.