नेक्सस वन - गुगल काकांचा "मोबाईल फोन" !


मागील काही दशके संगणक तंत्रज्ञानाने गाजवीली. अगदी कपाटाईतक्या मोठ्या संगणकाने आधी डेस्कटॉप, नंतर लॅपटॉप आणि आता पाल्मटॉप म्हणजेच मोबाईल असा प्रवास केला. यापुढे मोबाईल फक्त फोन म्हणुन वापरला न जाता संगणक म्हणुनच वापरला जाणार आहे. नेमकी हीच बाब ईंटरनेटचे अनभिषीक्त सम्राट असलेल्या गुगलकाकांनी ओळखली आणि आधी Android या मोबाईल ऑपरेटींग सीस्टम व आता चक्क नेक्सस वन (Nexus one) हा मोबाईल फोन बाजारात आणुन २०१० ला दणक्यात सुरुवात केली आहे.
HTC या कंपनीसोबत डीझाइन केलेल्या Nexus One ला एक  "सुपरफोन" म्हणुन गुगलने बाजारात आणले आहे. अँड्रॉईड या गुगलच्याच ऑपरेटींग सीस्टमवर चालणार्‍या मोबाईल मध्ये खुप अफलातुन सुविधा आहेत. Nexus One फक्त ११.५ मिमि म्हणजे एखाद्या पेन्सीलइतकी असुन वजन फक्त १३० ग्रॅम्स इतके आहे.
Nexus One चे काही फीचर्स -
  1. Touchscreen AMOLED display with a native resolution of 480 x 800 pixels
  2. 5-megapixel camera
  3. 512 MB of RAM and ROM
  4. MicroSD slot that’s expandable up to 32 GB (Default 4GB)
याव्यतीरीक्त नेक्सस वन मध्ये दिशादर्शक कंपास, लाईट आणि प्रॉक्सीमीटी सेन्सर्स आहेत. लाईट सेन्सर्स आपोआप बाहेरचा उजेड ओळ्खतात आणि त्यानुसार मोबाईल डीस्प्लेची लाईट कमी जास्त करतात. प्रॉक्सीमीटी सेन्सर्सचा मोबाईल खिशात टाकल्यास आपोआप ओळ्खतात आणि त्यानुसार मोबाईलची लाईट आणि की पॅनल बंद करतात.१८० डॉलर्स इतक्या किमतीला नेक्सस वन हा मोबाईल फोन T-mobile या कंपनीच्या मोबाईल सर्वीस बरोबर २ वर्षासाठी U.S. मध्ये उपलब्ध होइल. आणि लवकरच वोडाफोन बरोबर युरोपमध्ये उपलब्ध होइल. भारतीय ग्राहकांना मात्र अजुन या मोबाईल साठी वाट पहावी लागेल.
नेक्सस वन unlocked स्वरुपात ५२९ डॉलर्सना उपलब्ध होईल.
गुगलच्या या फोनचा 3D Demo आणि specification पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
गुगलने पहिल्यांदाच हार्डवेअरच्या क्षेत्रात पाउल टाकले आहे. Apple, Motorola आणि Windows यांसारख्या बड्या मोबाईल कंपन्यांबरोबर गुगलची ही स्पर्धा चांगलीच रंगेल. या स्पर्धेचा आणि त्यासोबत अधिकाधिक प्रगत होत जाणार्‍या मोबाईल तंत्रज्ञानाचा आस्वाद घ्यायला तयार रहा आणि नेक्सस वन साठी पैसे साठवायला देखील सुरुवात करा. मी तर केली सुद्धा !

This is what Google says about Nexus one on their official Google Mobile Blog - 

Introducing Nexus One
Tuesday, January 5, 2010 10:29 AM

We're very excited about today's launch of Nexus One, the newest Android-powered phone running the latest Android 2.1 software. Nexus One comes with all your favorite Google Mobile apps pre-installed: find the classics like Search, Maps, Gmail, YouTube and Google Talk, with additional goodies like Maps Navigation and Google Voice. With its 1GHz Qualcomm Snapdragon™ chipset, these apps are speedier than ever before
Additionally, Nexus One has a few cool new features like a voice-enabled keyboard for any text field; this way, you can speak to your phone and it does the text messaging, email writing, or search querying for you. Try adding the new YouTube widget to one of the five customizable home screen panels to quickly access the videos you want with just a few clicks. Explore your Picasa Web Albums with the 3D interface of the new Cooliris Gallery application. With Nexus One's 3.7" AMOLED display, your videos, apps, and photos are larger, clearer, and sharper.
To learn more about Nexus One, visit google.com/phone.

Posted by Amit Sood, Senior Marketing Manager, Google
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


नेक्सस वन - गुगल काकांचा "मोबाईल फोन" ! नेक्सस वन - गुगल काकांचा "मोबाईल फोन" ! Reviewed by Salil Chaudhary on 08:43 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.