सुस्वागतम ! मराठी ब्लॉग कट्ट्यावर आपले स्वागत आहे.


नमस्कार,


ईंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सर्व मराठी ब्लॉग्जना, ब्लॉगर्सना आणि मराठी वाचकांना एकत्र आणण्यासाठी मराठी ब्लॉगकट्टा हे एक व्यासपीठ आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. "नेटभेट.कॉम" आणि नेटभेट ई-मासिकाच्या यशानंतर आम्ही आता मराठी ब्लॉग कट्टा मायमराठीच्या सेवेत अतिशय अभिमानाने आणि आनंदाने रुजु करत आहोत.
" मराठी ब्लॉगींग"ने गेल्या काही वर्षात चांगलेच बाळसे धरले आहे. मराठी भाषेतील ब्लॉग्ज आता फक्त "अनुदिनी" किंवा "रोजनिशी" पुरता मर्यादीत राहिलेले नसुन कथा, कविता, साहित्य, विज्ञान, ललित, तंत्रज्ञान, मनोरंजन अशा अनेकविध विषयांवर सकस साहित्य निर्मीती ब्लॉग या माध्यमाद्वारे होताना दिसत आहे. अशा सर्व मराठी ब्लॉग्जना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या हेतुने आम्ही " मराठी ब्लॉग कट्टा" या संस्थळाची निर्मीती केली आहे.
नेटभेट ईमासिक दरमहा एक लाख मराठी बांधवांपर्यंत पोहोचते आहे  तसेच नेटभेट.कॉमची वाचकसंख्या दरमहा ३५ हजार इतकी झालेली आहे. नेटभेटला मिळणार्‍या आणि दिवसागणिक वाढणार्‍या या वाचकसंख्येचा लाभ इतर मराठी ब्लॉग्जना देखिल घेता यावा यासाठी मराठी ब्लॉग कट्टा नक्कीच उपयुक्त ठरेल याची आम्हाला खात्री आहे.

मराठी ब्लॉगकट्टा  ब्लॉगर्सना आणि मराठी वाचकांना कसा उपयोगी ठरेल ते पाहुया -
१.   सर्व मराठी ब्लॉग्जची विषयांनुसार वर्गीकृत यादी या संस्थळावर उपल्ब्ध होईल.
२.  नेटभेटच्या वाढत्या वाचकसंख्येचा फायदा मराठीतील ईतर ब्लॉग्जना मिळु शकेल.
३.  ब्लॉगकट्ट्यावर नोंदणीकृत ब्लॉग्जमध्ये प्रकाशित लेखांची माहिती एका तासाच्या आत ब्लॉगकट्ट्यावर RSS फीडच्या स्वरुपात उपलब्ध होईल. यामुळे वाचकांना सतत नवनविन लेख त्वरीत वाचता येतील.
४.  ब्लॉगकट्ट्यावर नोंदणीकृत प्रत्येक ब्लॉगसाठी एक स्वतंत्र पान या संस्थळावर असेल. ही माहीती ब्लॉगर्स येथे क्लिक करुन आम्हाला देऊ शकतात.
५.  स्वतःचा ब्लॉग चालु करु इच्छीणार्‍या प्रत्येक मराठी व्यक्तीस सर्व तांत्रीक माहिती आणि आवश्यक मदत येथे पुर्णपणे मराठीतुन उपलब्ध करुन देण्यात येईल.
६.  ब्लॉगींग या विषयावरील माहिती, ब्लॉगमध्ये सुधारणा करण्यासाठी टीप्स आणि टेम्प्लेट्सची माहीती या संस्थळावर मिळवता येईल.
७.  नेटभेटच्या भविष्यातील अनेक प्रकल्पांमध्ये सर्व नोंदणीकृत ब्लॉग्जना प्राधान्य देण्यात येईल.
८.  संगणक, ईंटरनेट , ब्लॉगींग, विविध सॉफ्टवेअर्स यांबद्दल वाचकांच्या आणि ब्लॉगर्सच्या शंकांचे निरसन नेटभेट फोरम द्वारे करण्यात येईल.

मायमराठीची सेवा आमच्या हातुन घडावी या उद्देशाने आम्ही ब्लॉग कट्टा सुरु करत आहोत. "मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा | "  यासाठीचा हा आमचा प्रमाणिक वाचकांना आणि ब्लॉगर्सना आवडेल अशी अपेक्षा.
ब्लॉगकट्ट्यावर विविध सोयी आणि सुविधा जोडण्याचा आमचा प्रयत्न राहील. यांसाठी वाचकांच्या आणि ब्लॉगर्सच्या प्रतीक्रीया आणि सुचनांचे स्वागत आहे.
आपली,Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

सुस्वागतम ! मराठी ब्लॉग कट्ट्यावर आपले स्वागत आहे. सुस्वागतम  ! मराठी ब्लॉग कट्ट्यावर आपले स्वागत आहे. Reviewed by Salil Chaudhary on 08:52 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.