Google Buzz is here ! Stop tweeting start Buzzing !

 गुगल बझ्झ !


गुगल काकांनी काल एका नविन सर्वीसची घोषणा केली. गुगल बझ्झ (Google Buzz) . गुगल बझ्झ बद्दल एका वाक्यात सांगायचं म्हणजे " जीमेलमधील सोशल नेटवर्कींग " असे म्हणता येईल. गुगलने ऑर्कुटद्वारे सोशल नेटवर्कींगच्या क्षेत्रात पाउल टाकले होते. भारत आणि ब्राझीलमध्ये ऑर्कुट तुफान लोकप्रीय झाले परंतु इतर देशांमध्ये आणि मुख्यत्वे अमेरीकेत ऑर्कुट फारसे चालले नाही. त्यानंतर गुगल वेव्ह  सोशल नेटवर्कींग क्षेत्रात उतरली मात्र अद्याप ही सेवा सर्वांना उपलब्ध करुन देण्यात गुगल यशस्वी झालेली नाही. आणि म्हणुनच आता गुगल बझ्झ द्वारे गुगलने सोशल नेटवर्कींग क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली आहे.

गुगल बझ्झ म्हणजे नक्की काय आहे?गुगल बझ्झ बर्‍याच उशीरा या क्षेत्रात आलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत अस्तीत्वात असलेल्या सर्व सोशल नेटवर्कींग साईट्सचे सर्व फीचर्स बझ्झ मध्ये सामावलेले आहेत. जीमेल वापरणार्‍या एका मोठ्या वाचकगटापर्यंत गुगल बझ्झला आपोआपच पोचता येत आहे हा दुसरा फायदा. बझ्झ साठी जीमेल व्यतीरीक्त कुठेही लॉग-इन आणि अकाउंट सेट-अप करण्याची आवश्यकता नाही हा तिसरा फायदा. याहीपेक्षा अधिक फायदे/फीचर्स आहेत -  

  • स्वचालित मित्र यादी (Automatic friends lists) (जीमेलवरील आपले सर्व contacts आपोआपच Buzz मध्ये समाविष्ट केले जातात.)
  • पिकासा वरील चित्रे, फोटो तसेच ट्वीटर वरील फीड्स आपोआपच गुगल बझ्झ मध्ये येते. फोटो पाहण्यासाठी ट्वीटपीक सारख्या तीसर्‍याच सेवेकडे न जाता, ब्राउजरमध्येच पुर्ण आकारात फोटो पाहता येतात.
  • Public and private sharing (व्यक्तीगत तसेच सार्वजनीक असे दोन वेगवेगळे भाग Google Buzz मध्ये वापरता येतात. त्यामुळे खाजगी गोष्टी खाजगीच ठेवता येतात.)
  • फेसबुक किंवा ट्वीटर प्रमाणे प्रत्येक अपडेट्स ईमेल द्वारे पोहोचवण्यापेक्षा Buzz मधील अपडेट्स एका ईमेल थ्रेड मध्ये आपोआप अपडेट होतात.
  • "Recommended Buzz" हे गुगल बझ्झचे सर्वात महत्त्वाचे फीचर आहे. बझ्झ मधील तुमच्या मित्रांच्या मित्रांचे अपडेट्स पैकी चांगले अपडेट्स गुगलच्या एका खास अल्गोरीदम द्वारे निवडुन प्रस्तुत केले जातात. एवढेच नव्हे तर एखादे "Recommended Buzz" आवडले नाही तर तसा फीडबॅक देण्याची देखिल सोय आहे. गुगल अल्गोरीदम तुमच्या फीडबॅक अनुसार "Recommended Buzz" मध्ये सुधारणा करत राहील.


Buzz  वर तुम्हाला फोटोज, व्हीडीओज, इतर वेबसाईट्सच्या लिंक्स आणि ईंटरनेटवर शेअर करण्यासारखे जे काही उपलब्ध असेल ते सर्व Buzz followers बरोबर शेअर करता येईल.

गुगल बझ्झचे आणखी एक सुपर फीचर म्हणजे इतर पॉप्युलर सेवांबरोबर एकीकरण (Integration).  Flickr, Twitter, Picasaweb, Youtube, Blogger अशा अनेक सर्वीसेसच्या फीड्स, अपडेट्स Buzz मध्येच पाहता येतात. उदाहरणार्थ ट्वीटरमधील ट्वीट्स वाचण्यासाठी ट्वीटर.कॉम वर जाण्याची आवश्यकता नाही. Buzz मधुनच ट्वीटर अपडेट्स पाहता येतील.

वाचकहो व्हा तयार !
सोशल नेटवर्कींगचं पसरत चाललेलं विश्व आता पुन्हा लहान होत आहे. 
गुगल बझ्झ गुगलच्या इतर सेवांप्रमाणेच वापरावयास अतीशय सोपे आहे, सर्वसमावेशक आहे आणि मोफत आहे.

(थोडक्यात ट्वीटर्.कॉम विकत घेण्याचे सर्व प्रयत्न फसल्यावर आता ट्वीटरला (आणि फेसबुकला देखिल !!) जमीनदोस्त करण्याचे प्रयत्न गुगलने चालु केले आहेत. आणि पुर्ण जगाची माहिती खिशात ठेवण्याचा देखिल गुगलचा डाव आहे. म्हणजेच एका दगडात दोन पक्षी ! )  

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Google Buzz is here ! Stop tweeting start Buzzing ! Google Buzz is here ! Stop tweeting start Buzzing ! Reviewed by Salil Chaudhary on 07:46 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.