Google Pack - Free essential softwares for your PC provided by Google

Google चा झकास पॅक अर्थात Google Pack

आपण सगळेचं विविध प्रकारची Softwares दैनंदिन जीवनात वापरत असतो. तुम्ही जर कधी इंटरनेटवर Software Download करण्यासाठी फेरफटका मारला असेल तर तुमच्या लक्षात येईल की बहुतांश Softwares ही आपल्या निश्चित गरजेप्रमाणे नसतात. ही कसर भरून काढण्यासाठी Google काकांनी Google Pack नावाचे एक भन्नाट Software Pack ची निर्मिती केली आहे. 
हे Software Pack तुम्हाला  कॉम्प्युटर सुरक्षित आणि आधिक सुलभरित्या चालावा यासाठीची मुख्य आणि गरजेची Softwares तर पुरवतेच शिवाय फक्त तुम्हाला हवी असलेलीच Softwares निवडण्याची सोय सुद्धा यात आहे. चला तर मग बघुया Google Pack च्या खजिन्यात काय काय दडलंय ते !!!

Google Pack मध्ये मुख्यत्वे खालील सॉफ्टवेअर्स उपल्ब्ध करुन देण्यात आलेले आहेत.  -
 • Google Chrome Web browser
 • Google Apps (म्हणजेच Google Applications)
 • Google Desktop
 • Adobe Reader
 • Google Talk
 • Real Player
 • Google earth
 • Google Toolbar for Internet Explorer
 • Picasa
 • Spyware doctor with antivirus
 • Mozilla Firefox with Google Toolbar
 • Skype

एक गोष्ट लक्षात असू द्या की Google Pack  साठी तुमच्या कॉम्प्युटरवर XP किंवा Vista कार्यप्रणाली (Operating system) हवी.
आता आपण Google Pack मधील  प्रत्येक Software ची थोडक्यात माहीती बघुया.

१.  Google Chrome Web Browser :  


या ब्राउजर मुळे तुमचे इंटरनेट ब्राउजिंग अधिक सोपे, सुरक्षित आणि जलद होते. हे एकमात्र असे ब्राउजर आहे की ज्याच्या Home Page वर Thumbnails असतात त्यावर क्लिक केले की तुम्ही तुमच्या एखाद्या आधी बघितलेल्या किंवा जास्त वेळा बघितलेल्या Web Sites एका क्लिकसरशी पुन्हा बघु शकता. Gmail , Orkut , Blogger असे गुगलचे सर्व अप्लिकेशन्स क्रोम ब्राउजर मध्ये इतर ब्राउजर्स पेक्षा जलद चालतात. 

तसेच या ब्राउजरला स्वतःच्या विशिष्ट अशा Themes आहेत की ज्याद्वारे तुम्ही तुमच्या ब्राउजरचा Look बदलू शकता.  हे ब्राऊजर Google Pack मधील एक अतिशय उपयोगी Software आहे.


२.Google Applications :  
यात मुख्यत्वे Gmail for business, Google Calender, Google Docs, Google Sites, Google Video यासारखी उपयुक्त Softwares चा समाविष्ट आहेत.

 • Gmail for Business हे Software अगदी आपल्या Normal Gmail सारखे आहे. यात तुम्हाला २५ जीबी इतकी मोठी Online जागा पुरवतं. म्हणजे तुमचे मोठमोठे mails साठवून ठेवण्याची Online च सोय झाली म्हणा ना. तसेच यात Spam mails filtering ची सुविधा असल्यामुळे आल्तू-फाल्तू Mails तुमच्या mailbox मध्ये येणारच नाहीत. तसेच Outlook मध्ये देखील याची setting करू घेता येते करून तुमचे सगळे mails आपोआपच outlook मध्ये साठून राहतील.

 • Google Calender  या सोयीमुळे तुम्हाला तुमचे स्वतःच्या कार्यक्रमाचा आराखडा (Schedule) तयार करता येतो.तुम्हाला हवं त्या प्रमाणे तुम्ही त्यात तुमच्या दिनक्रमांची नोंद करू शकता तसेच तु तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर share देखील करू शकता.

 • Google Docs: Google Docs च्या मध्यमांतून आपण अनेक प्रकारच्या Documents वर ऑनलाईन प्रोसेसिंग करू शकतो. Ms-Office Documents, .rtf (Word pad) documents,  .txt (Notepad), इत्यादि Documents वर ऑनलाईन बदल करू शकता आणि सेवदेखील करू शकता आणि तेही त्याच मुळ स्वरूपात म्हणजेच (Original Format) मध्ये. 

 • Google Groups आपल्याला इतर लोकांशी जोडून ठेवण्यात मदत करते तसेच माहीती वापरण्यास, email व्यतिरिक्त Web वर संपर्कात राहण्यातदेखील या सोयीची खूपच मदत होते. याची नवीन आवृत्ती अतिशय प्रगत आणि वापरण्यास सोपी अशी आहे.

 • Google Sites या online application  द्वारे तुम्ही एखादी team website बनवू शकता ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या Document मध्य बदल करता अगदी त्याप्रमाणेच. Google Sites च्या माध्यमातून तुम्ही videos, calendars, presentations, attachments, and text  यासारखी वेगवेगळी माहीती एकत्रितरित्या आणू शकता. तसेच तुम्ही ही माहीती अनेकांबरोबर Share देखील करु शकता. Google Desktop तुम्ही कॉम्प्युटरच्या Desktop वर अगदी कुठेही ठेवू शकता.

 • Google Video ही एक चकटफू Video Sharing Website तर आहेच शिवाय हे एक अग्रगण्य Video Search Engine सुद्धा अहे बरं का! याद्वारे तुम्ही इतर websites वरील देखील बघू शकता ही महत्त्वाची बाब. 
 Google apps मात्र मोफत नसुन विकत घ्यावे लागते.                                    

३. Google Desktop : 


Google Desktop हे एक Desktop Text Search Application आहे. याद्वारे तुम्हाला हव्या असलेल्या फाईल्स, फोटो, वेब पेजेस, ऑडिओ-व्हिडिओ फाईल्स,ए-मेल्स,वगैरे माहीती एका क्लिकसरशी मिळते.याव्यतिरिक्त तुम्हाला इंटरनेटवरील नवीन माहीतीदेखील आपोआपच मिळते 
तुम्हाला हवा असलेला शब्द Search bar मध्ये टाकला की तुम्हाला त्याबद्दलची सगळी माहीती मिळते त्यामुळे तुमचा कॉम्प्युटरच एक प्रकारचे Search Engine बनतो असे म्हणायला हरकत नाही.


४. Adobe Reader
Adobe Reader ह्या प्रोग्रामद्वारे तुम्ही PDF (Portable Document Format) या प्रकारच्या Files वाचु शकता. Adobe Reader हे एक नावाजलेले PDF Reader सॉफ्टवेअर आहे.

आकाराने जरी हे इतर PDF Reader च्या तुलनेत  थोडे मोठे सॉफ्टवेअर असले तरी एक उत्कृष्ट दर्जाचे सॉफ्टवेअर म्हणून ओळखले जाते.या सॉफ्टवेअरद्वारे तुम्ही PDF Files अधिक सुलभरित्या तर बघु शकताच तसेच हाताळण्यासदेखील खूप सोपे आहे. 


५. Google Talk


Google Talk हा एक Chating Client आहे ज्याच्या साहाय्याने तुम्ही दूरवर बसलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणिंशी, नातेवाईकांशी गप्पा तर मारू शकता आणि संभाषण देखील साधू शकता.
एखादी File देखील Send Files चा पर्याय निवडून तुम्ही हव्या त्या व्यक्तिला पाठवू शकता. अशाच प्रकारे Send Mail या सोयीचा वापर करून परस्पर मेलदेखील पाठवता येतात.

६. RealPlayer :
ह्या Media Player च्या सहाय्याने तुम्ही तुमच्या काँप्युटरवरील सगळ्या ऑडिओ आणि व्हिडीओ फाईल्स वाजवू शकता. तसेच विशिष्ट अशा Real Mediia प्रकारच्या Files फक्त याच Media Player मध्ये तुम्ही वाजवू शकता. 

तुम्ही स्वतंत्र अशी Media Library देखील या Media Player च्या मदतीने बनवू शकता. हा Player तुमच्या Internet Browser मध्ये देखिल आपोआप Install होतो ज्या द्वारे तुम्ही Online ऑडिओ आणि व्हिडीओ फाईल्स वाजवू शकता.  

7. Google Earth :Google Earth द्वारे तुम्ही संपूर्ण जगाची (अर्थात पृथ्वीची) माहीती घर बसल्या बघू शकता आणि तेही अगदी हुबेहुब. गुगलने सॅटेलाईटद्वारे पुर्ण जगाचे फोटोस्कॅनींग केले आहे. संपूर्ण पृथ्वीवरील कोणताही भाग या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला नकाशाच्या स्वरूपात दिसु शकेल. अजून तुम्ही खोलात गेलात तर तुम्हाला मुख्य रस्ते, शाळा, महविद्यालये, रेल्वे स्टेशन्स, शोपिंग मॉल्स आदि माहीती चित्राच्या सहाय्याने जशीच्या तशी दिसेल. 

तुम्ही बघितलेले एखादे स्थळ किंवा ठिकाण तुम्ही save देखील करून ठेवू शकता. विशेष म्हणजे ही सगळी माहीती तुम्ही इतर मंडळींबरोबर Share देखील करू शकता.

8. Google Toolbar for IE( Internet Explorer)


Google Toolbar तुमच्या Internet Explorer मध्ये आधी Install करावा लागतो. त्याची काही मुख्य वैशिष्ट्ये थोडक्यात खालील चित्रात दाखवली आहेत

ह्या Toolbar च्या मदतीने जी कामे तुम्ही Google वर करता तिच कामे अधिक सोप्या आणि सोयिस्कर पद्धतीने करू शकता.  हा Toolbar हाताळण्यास देखील अगदी सहज आणि सोपा आहे.


9. Spyware Doctor With Anti-Virus
कॉम्प्युटरमध्ये व्हायरस आणि स्पाय हे एकतर इंटरनेटच्या माध्यमातून किंवा पेन ड्राईव्स, सीडी, डीव्हीडी या सारख्या Portable Device  मधून येतात हे तुम्हाला माहीत असेलच. याच समस्येवर मात करण्यासाठी Google Pack मध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण  सोफ्टवेअरचा समवेश करण्यात आला आहे आणि ते म्हणजे Spyware Doctor with Antivirus.
PC Tools या कंपनीच्या Spyware Doctor with Anti-virus या Software चा एकत्रित आविष्कार Malware, Spyware आणि Viruses यांना काढून टाकून टाकून तुमचा कॉम्प्युटर सुरक्षित ठेवण्यास मदत करतो.

10. Picasa :  


 Picasa हे एक Google निर्मित फोटो एडिटिंग Software आहे जे तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर्वर Install करून घेऊ शकता. .या सोफ्टवेअर्च्या मदतीने तुम्ही तुमच्या फोटोंचा Online अल्बम बनवुन तो Google वर (Gmail-Id वर) साठवून ठेवू शकता.

Picasa वापरून तुम्ही तुमचे फोटो हवे तसे View करू शकता शिवाय हवे असल्यास तुमच्या फोटोंना तुम्ही काही Special Efeects देखील देऊ शकता.

11. Skype :


Skype या सोफ्टवेअरद्वारे तुम्ही अन्य Skype Users बरोबर संभाषण साधू शकता ते सुद्धा अगदी फुकट. याशिवाय chatting, File transfering. Phoyo sharing सारख्या सोयी सुद्धा यात उपल्ब्ध आहेत.. Skype हे एक Social Networking सोफ्टवेअर आहे.
 तसेच तुम्हाल जर National किंवा International calls ( Mobile किंवा Landline calls) करयचे असतील तर ते सुद्धा तुम्ही अगदी कमी दरात करु शकता पण त्यासठी तुम्हाला www.skype.com या संकेतस्थळावर Register व्हावे लागेल आणि पैसे भरण्यासंबधितच्या अटींचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

12. Firefox With Google Toolbar


Mozilla Firefox हे Web Browser तुम्हाला Google Toolbar चा समावेश असलेल्या स्वरुपात तुम्हाला मिळते.  Firefox हे सुद्धा एक नावाजलेले आणि जास्त वापरले जाणारे Web Browser आहे.

यामुळे तुम्हाला स्वतंत्र असा Google Tollbar install करण्याची गरज पडत नाही. Google Toolbar ची मुख्य वैशिष्ट्ये मी वरील Google Toolbar संबंधितच्या माहितीमध्ये समविष्ट केलेली आहेत. 


Google pack डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
असे हे बहुरंगी आणि बहुढंगी Google Pack नक्कीच वापरुन पहा.
प्रथमेश शिरसाट    prathmeshh.shirsat@gmail.comGet NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Google Pack - Free essential softwares for your PC provided by Google Google Pack - Free essential softwares for your PC provided by Google Reviewed by Salil Chaudhary on 10:30 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.