How to write in Marathi with Baraha software

संगणकावर मराठी टंकलेखन (Typing) करण्यासाठीचे चार सर्वोत्तम उपाय आपण याआधी नेटभेटवर पाहिले आहेत.त्यामध्येच Baraha(बरहा) नावाच्या एका सॉफ्टवेअरचा उल्लेख होता. आज मी तुम्हाला याच बरहा सॉफ्टवेअरबद्दल अधिक माहिती देणार आहे.
या लेखात आपण खालील गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत - 
  1. बरहा सॉफ्टवेअर इंस्टॉल कसे करावे ?
  2. बरहा मध्ये मराठीत लिहिण्यासंबंधीच्या सेटींग्ज
  3. बरहा डॉक्युमेंट वेगवेगळ्या प्रकारे संपादीत (Edit) कसे करावे? 
बरह ८ ही आवृत्ती  डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
 या सोफ्टवेअरची insatllation process खालीलप्रमाणे आहे. डाऊनलोड केलेल्या फाईलवर डबल क्लिक केल्यावर तुम्हाला खालील विंडो सर्वप्रथम दिसेल.बरहा install झाल्यानंतर (म्हणजेच वरील finish या बटणावर क्लिक केल्यावर) जेव्हा तुम्ही सर्वप्रथम बरह वापरण्यासाठी उघडाल तेव्हा तुम्हाला आधी setting ची विंडो दिसेल, त्यामध्ये तुम्हाला हवी असलेली भाषा तसेच लेखना चा आकार, रंग, वगैरे निश्चित करून घ्या. मराठीसाठी खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे सेटींग्ज करा.


आता यामध्ये लेखन कसे करावे ते पाहुया. बरहा ची विंडो ३ भागात विभगलेली दिसेल. तुम्हाला तिसर्‍या भागात इंग्रजी मधून लिहीण्यास सुरूवात करायची आहे . वर म्हणजे दुसर्‍या विंडोमध्ये मराठी मध्ये लिहीलेले दिसेल.

जर यात कोणतीही image(फोटो) फाईल टाकायची असल्यास वरील मेन्युबार मधील Edit मध्ये जाऊन Insert Picture हा पर्याय निवडावा.(मात्र ही image फाईल .bmp , .gif किंवा .jpg याच फॉरमॅट मध्ये हवी याची नोंद घ्या).अशाच प्रकारे तुम्ही एखादे चिन्ह (Symbol) किंवा एखादी लिंकसुद्धा टाकू शकता. ही फाइल आता सेव्ह करा, सेव्ह केलेली फाईल तुम्ही ओपन करून पहिल्या विंडोमध्ये बघू शकता. त्यासाठी File > Open हा पर्याय निवडावा.

फक्त बरहाचा मुख्य तोटा म्हणजे तुम्ही तयार केलेली फाईल बरहा (.brh) या फॉरमॅट मध्येच सेव्ह होत असल्याकारणाने ज्या कॉम्प्युटरवर बरहा हे सॉफ्टवेअर install असेल त्याच कॉम्प्युटरवर तुम्हाला ही फाईल बघता येईल. 
पण याला दुसरी युक्ती अशी आहे की तुम्ही हिच फाईल  HTML (Unicode) म्हणजेच वेबपेजच्या फॉरमॅटमध्ये किंवा फोटो फॉरमॅटमध्ये  (.jpg, .bmp किंवा .gif फॉरमॅट मध्ये)  सेव्ह करता येते. यासाठी तुम्हाला File > Export हा पर्याय निवडावा लागेल.

 हा पर्याय निवडल्यावर एक विंडो दिसेल त्यातून तुम्हाला ज्या फॉरमॅट (म्हणजेच html किंवा image फॉरमॅट) मध्ये तयार Documnet सेव्ह करायचे आहे तो पर्याय निवडा. आधी Apply आणि OK वर क्लिक करा.आता मी तयार केले document इमेज फॉरमेट मध्ये सेव्ह केले आहे 
मी documnet केले खरे पण माझ्या मनात विचार आला की नुसतेच प्लेन डॉक्युमेन्ट काय कामाचे? हेच डोक्युमेन्ट मला हव्या त्या फोटो किंवा इमेज फाईलवर घेता आले तर? हे सुद्धा बरह मध्ये शक्य आहे. यासाठी तुम्हाला File ----> Export हा पर्याय निवडावा लागेल. आता तुम्हाला Export ची विंडो दिसेल त्यातून Picture setting निवडा आणि तुम्हाला हवे तसे पर्याय आणि इमेज फाईल निवडा.

आता आपले वरील मूळ डोक्युमेंट कसे दिसते ते बघुया.

खाली दिसणारा  'बरह - उचित भारतीय भाषा तंत्रांश'  वगैरे जे काही शेवटी (footnote) लिहीले आहे त्या ठिकाणि तुमचे नाव हवे आहे आणि तारिख सुद्धा मायबोली मराठीतून टाकायची आहे तर  यासाठी File -----> Page Setup हा पर्याय निवडावा. आता एक छोटी विंडो दिसेल, Page setup या नावाची. तेथे Header and Footer हा पर्याय निवडा


आता मी माझे नविन document कसे केले आहे ते पहा.


आता तुमचे मराठी टंकलेखन करणे अतिशय सहज, सोपे आणि रंगीबेरंगी होईल असे मला वाटते. अशाच प्रकारे तुम्ही शुभेच्छापत्रे (Greeting cards) बनवू शकता आहे की भन्नाट सोफ्टवेअर !!! त्यामुळे बरहा install करा आणि मराठी टंकलेखनाचा आस्वाद घ्या.
मराठी टंलेखनाचा वर लिहीलेला हा माझा लेख तुम्हाला कसा वाटला ते मला जरुर कळवा तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असल्यास त्या देखील मला कळवा.

प्रथमेश शिरसाट  prathmesh.shirsat@gmail.com


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

How to write in Marathi with Baraha software How to write in Marathi with Baraha software Reviewed by Salil Chaudhary on 18:44 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.