उपकरणे


नेटभेटचा उद्देश जास्तीत जास्त तंत्रज्ञान विषयक माहिती देणे हा आहे. याच उद्देशानेच प्रेरीत असलेल्या आणखीन एका ब्लॉगची माहिती मी या लेखाद्वारे वाचकांना देऊ इच्छीतो. सध्या पुणे येथे वास्तव्यास असणार्‍या श्री. विनायक रानडे उर्फ VK यांचे दोन ब्लॉग प्रतीमा उरी धरोनी आणि विनायक उवाच यापुर्वी आपण वाचले असतीलच. आता VK नी उपकरणे नामक आणखी एका ब्लॉगची सुरुवात केली आहे.

VK ना भारतात आणि परदेशातील ईलेक्ट्रीकल, ईलेक्ट्रॉनिक, डीजीटल फोटोग्राफी, फोटोशॉप अशा विविध क्षेत्रांतला अनुभव आहे. मध्यंतरी VK सोबत संभाषणाचा योग आला  तेव्हा मराठी मध्ये उपकरणांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही आहे आणि त्यासाठी VK नी पुढाकार घ्यावा असे मी त्यांना सुचविले. त्यातुनच उपकरणे या ब्लॉगची निर्मीती झाली.

नेटभेटच्या वाचकांना संगणक व ईंटरनेटची माहिती नेटभेटवर मिळतेच. त्यासोबत आता ईलेक्ट्रॉनिक वस्तुंची सखोल माहिती उपकरणे या ब्लॉगद्वारे मिळु शकेल. तेव्हा उपकरणे ला भेट आणि प्रतीक्रीया अवश्य द्या.
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

उपकरणे उपकरणे Reviewed by Salil Chaudhary on 18:24 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.