"मराठी भाषा दिवस" स्पर्धेचे निकालवाचक आणि ब्लॉगर मित्रहो,

२७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा दिवस" साजरा करण्यासाठी नेटभेट आणि नचिकेत प्रकाशनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या "मराठी भाषा दिवस" स्पर्धेचे निकाल आम्ही जाहीर करत आहोत.

तत्पुर्वी या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व वाचकांचे आणि ब्लॉगर्सचे आम्ही आभार मानतो. मायमराठीसाठी राबविलेल्या या उपक्रमात आपण देऊ केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. त्याचप्रमाणे "मराठी भाषा दिवस" स्पर्धेचे विजेट आपल्या ब्लॉगवर चिकटवून तसेच या स्पर्धेबद्दल ईमेलद्वारे आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना कळवून या उपक्रमास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणार्‍या आमच्या सर्व ब्लॉगर मित्रांचे आम्ही विशेष आभारी आहोत.

नचिकेत प्रकाशनाचे सर्वेसर्वा श्री. अनिल सांबरे (नागपूर) यांनी स्पर्धेसाठी परीक्षण केले आणि बक्षिसांसाठी पुस्तके प्रायोजित केली याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत.


वाचकांसाठीची स्पर्धा - "मला भावलेले मराठी व्यक्तीमत्व"

प्रथम क्रमांक - सुपर्णा कुल्रकर्णी, मुंबई 

द्वितीय क्रमांक - नीला सहस्रबुद्धे, पुणे 

तृतीय क्रमांक -  आनंद घारे, नवी मुंबई


ब्लॉगर्ससाठीची स्पर्धा -

प्रथम क्रमांक - हेरंब ओक    ( http://harkatnay.blogspot.com/ )

द्वितीय क्रमांक -  आल्हाद महाबळ   ( http://alhadmahabal.wordpress.com )

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.


विजेते लेख निवडण्यामागील परीक्षकांची भूमिका लवकरच नेटभेटवर प्रकाशित करण्यात येईल. त्याचसोबत स्पर्धेसाठी आमच्यापर्यंत पोहोचलेले सर्व लेख नेटभेट वर प्रकाशित करण्यात येतील. (टपालाद्वारे मिळालेले काही लेख संगणकावर लिहिण्यासाठी थोडासा अवधी लागेल याची कृपया नोंद घ्यावी)


नेटभेट तर्फे यापुढेही नवनविन उपक्रम सादर करण्यात येतीलच. त्यासाठी आपले शुभाशिर्वाद आमच्या पाठीशी असुद्यात एवढीच अपेक्षा.

धन्यवाद,


टीम नेटभेट

 

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

"मराठी भाषा दिवस" स्पर्धेचे निकाल "मराठी भाषा दिवस" स्पर्धेचे निकाल Reviewed by Salil Chaudhary on 11:03 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.