Blog Templates @ Netbhet.com


मित्रहो, मराठी ब्लॉगर्सच्या सहाय्यासाठी आम्ही सुरु केलेल्या ब्लॉगकट्टा या संकेतस्थळास दिलेल्या प्रतीसादाबद्द्ल अनेक धन्यवाद.

ब्लॉगकट्ट्यावर आतापर्यंत १५०० हुन अधिक मराठी व मराठी-इंग्लिश मिश्रीत ब्लॉग्जचे RSS feeds दाखविले जात आहेत. आतापर्यंत ६० विविध ब्लॉग्जची आणि ब्लॉगरसंबंधीची माहिती ब्लॉगकट्ट्यावर उपलब्ध करण्यात आल्रेली आहे.


"मराठी भाषा दिवसा"चे औचित्य साधुन आम्ही मराठी ब्लॉगर्ससाठी एक बक्षीस योजना देखील जाहीर केली आहे. यामध्ये प्रथम भाघ्यवान विजेत्या ब्लॉगरला स्वतःचे डोमेन आणि द्वीतीय क्रमांकास मराठी सुलेखन (Calligraphy) असलेला टीशर्ट नेटभेटतर्फे देण्यात येणार आहे. या योजनेसदेखिल ब्लॉगर्सकडून खुप चांगला प्रतीसाद मिळाला आहे.

ब्लॉगकट्ट्यावर लवकरच भरपुर टेम्प्लेट्सचा खजाना घेउन आम्ही येऊ असे आश्वासन आम्ही वाचकांना दीले होते. आज याच आश्वासनाची पुर्तता करत आम्ही Blogger Templates या विषयाला वाहिलेली एक संकेतस्थळ आपल्या सेवेत रुजु करत आहोत. Http://templates.netbhet.com या पत्त्यावर हे संकेतस्थळ वाचकांना पाहता येईल तसेच ब्लॉगकट्ट्यावरुन "ब्लॉग बनवायचाय? >> ब्लॉग टेम्प्लेट्स" या मार्गाने देखिल वाचकांना टेम्प्लेट्सच्या संकेतस्थळावर पोहोचता येईल.

वर्डप्रेस्.कॉम मध्ये टेम्प्लेट निवडण्याची मर्यादीत सोय उपलब्ध असल्याने सध्या या संकेतस्थळावर फक्त ब्लॉगर.कॉमच्याच टेम्प्लेट्स दीसणार आहेत. ब्लॉगची रचना, रंग, विविध प्रकारचे उपयोग यांना अनुसरुन टेम्प्लेट्सचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत ५१ टेम्प्लेट्सची प्रात्यक्षीकासह (demo) माहिती आणि डाउनलोड करण्याची सोय येथे  देण्यात आलेली आहे. दर आठवड्याला किमान २५ टेम्प्लेट्स या संकेतस्थळावर समाविष्ट  करण्यात येतील. तसेच टेम्प्लेटमध्ये गरजेनुसार बदल करण्यासंबंधी (Customisation) अधिक माहिती मराठीतुन देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

वाचकांनी व ब्लॉगर्सनी याचा अवश्य फायदा घ्यावा तसेच टेम्प्लेट्स संबंधी काही प्रश्न असल्यास प्रतीक्रीयांद्वारे आम्हाला जरुर कळवावेत. विचारलेल्या सर्व प्रश्नांना यथाशक्ति उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करु.
टेम्प्लेट्स@नेटभेट बद्दल सुचना, प्रतीक्रीयांचे स्वागत आहे.


http://templates.netbhet.com


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Blog Templates @ Netbhet.com Blog Templates @ Netbhet.com Reviewed by Salil Chaudhary on 05:55 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.