Earth Hour 2010 - "Switch off"
वर्ल्ड वाइल्डलाइफ फेडरेशनने (WorldWildlife Federation - विश्व वन्यजीव संगठना) "दिवे विझवा" (switch offlights) नावाची एक मोहीम हाती घेतली आहे. ग्लोबल वॉर्मींगचे पृथ्वीवर होणारया दुष्परीणामांची सामान्य जनतेस जाण व्हावी म्हणुनच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जगभरातील ८५ देशांमधल्या तब्बल ८०० शहरांमधील नागरीक २७ मार्च २०१० ला रात्री ८.३० ते ९.३० च्या दरम्यान विजेवर चालणारे सर्व दिवे आणि उपकरणे बंद ठेवणार आहेत.
याबाबत अधिक माहीती जाणून घेण्यासाठीwww.earthhour.in या वेब साइट्ला भेट द्या. खाली दिलेला हा व्हीडीओ पण अतिशय रंजक आहे.टिप - हि माहीती देणारी एक ई-मेल सर्वत्र पाठविण्यात येत आहे. कदाचीत तुम्हाला आधीपासूनच याची माहीती असेलही. मात्र तरीही मी हा पोस्ट लिहित आहे कारण हा लेख वाचून जर एका माणसाने देखिल एक तास दिवे बंद ठेवुन पर्यावरणरक्षणाच्या या कार्याला हातभार लावला तरी  मी या पोस्टला यश मिळाले असे समजेन.
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Earth Hour 2010 - "Switch off" Earth Hour 2010 - "Switch off" Reviewed by Salil Chaudhary on 19:13 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.