Format Factory - All in One Converter


Format Factory हे शब्द ऐकल्यावर काय विचार मनात येतो तुमच्या ? घाबरु नका मी कोणत्याही फॅ़क्टरीमध्ये नाही पाठवणार तुम्हाला !!! आपल्यापैकी बर्‍याच जणांवर Audio, Video किंवा Pictures चे फॉरमॅट बदलण्याची वेळ कधी ना कधी तरी नक्कीच येत असेल. ज्यांचे काम Audio, Video converting किंवा Editing अशा स्वरुपाचे आहे त्यांच्या साठी Format Factory नावचे सोफ्टवेअर म्हणजे एक देणगीच आहे. ज्यांना दररोज Audio/ Video/ Image editing, Converting करावे लागते त्या मंडळींना हे सोफ्टवेअर नक्कीच आवडेल आणि इतरांनाही..
आता आधी बघुया या Foramat Factory ची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत ती...
  • कोणत्याही  प्रकारच्या Video फाईल्सचे AVI / MP4 / 3GP / RMVB / WMV / MKV / MPG / VOB / MOV / FLV / SWF  अशा विविध फॉरमेट मध्ये सहज रुपांतर करणे शक्य. 
  • कोणत्याहीप्रकारच्या Audio फाईल्सचे MP3 / WMA / FLAC / AAC / MMF / AMR / M4A / M4R / OGG / MP2 / WAV / WAV Pack अशा विविध फॉरमेट मध्ये सहज रुपांतर करणे शक्य.
  • सगळ्या Picture फाईल्सचे JPG/PNG/ICO/BMP/GIF/TIF/PCX/ TGA अशा विविध फॉरमेट मध्ये सहज रुपांतर करणे शक्य.
  • DVD मधील Video फाईल्सचे Ripping (Ripping म्हणजे DVD मधील अवाढव्य Video फाईल्सचे हार्ड डिस्कवरील compressed म्हणजेच कमी साईझमध्ये रुपांतर).
  • Format Factory मध्ये काही Damaged Audio किंवा Video फाईल्स दुरुस्त करण्याचीदेखील सोय आहे.
  • तसेच या सर्व Multimedia फाईल्सची साईज कमी करण्याचे कम देखील फॉरमॅट फॅक्टरी करते.
हे सोफ्टवेअर Install कसे करायचे ते आपण बघुया. 
सर्वात आधी तुम्हाला Format Factory ची २.२० आवृत्ती डाऊनलोड करावी लागेल.
या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक Zipped फाईल मिळेल FFSetup220 या नावाची. 


त्या फाईलवर Right क्लिक करून Open with  >> Compressed (Zipped) Folder हा पर्याय निवडून ती फाईल उघडा.

त्या उघडलेल्या Zipped फाईल मध्ये तुम्हाला FFSetup220 नावाची .exe ( म्हणजेच executable) फाईल दिसेल्.त्यावर डबल क्लिक केले की खालीलप्रमाणे Format Factory ची Installation प्रक्रिया सुरु होईल. ती   अनुक्रमे पुढील प्रमाणे असेल.

तुम्ही Finish या बटणावर क्लिक केले तुम्हाच्यासमोर Format Factory 2.20 ची विंडो उघडेल.  त्यात सर्वप्रथम कोणती Functions आहेत याची थोडक्यात माहिती बघुया.
Video या Tag वर तुम्ही क्लिक केले तुम्हाला एखादी Video फाईल किती Format मध्ये Convert करता येईल ते समजेल. 

Audio या tag वर क्लिक करून तुम्हाला एक Audio फाईल किती Format मध्ये Convert करता येईल ते लक्षात येईल.

तशाच पद्धतीने एखाद्या image फाईलचे किती प्रकारांमध्ये Conversion करता येईल हे तुम्हाला picture या Tag वर क्लिक केल्यावर दिसून येईल.

 ROM Device\ DVD\ CD\ ISO या Tag वर क्लिक केल्यावर तुम्हाला ४ पर्याय दिसतील याचा अनुक्रमे उपयोग आपण बघुया.
  • DVD to Video File या पर्यायाद्वारे तुम्हाला कोणत्याही DVD (फक्त Video DVD बरं का  data DVD नाही) चे हव्या असलेल्या फॉरमॅट च्या Video फाईलमध्ये रुपांतर करता येते.
  • Music Cd to Audio File ह पर्याय निवडून तुम्हाला music CD वरील गाणी हव्या त्या प्रकारच्या audio फाईलमध्ये रुपांतर करता येईल.    
  •  DVD/ CD to ISO/ CSO हा पर्याय निवडून तुम्हाला एखाद्या CD किंवा DVD ISO ( हा एक प्रकारचा CD किंवा DVD ची Image बनवण्याचा फोरमॅट आहे ) किंवा CSO (CSO हे ISO चेच compressed स्वरुप आहे) मध्ये convert करता येते.
  • ISO to CSO / CSO to ISO ह्या पर्यायाद्वारे तुम्ही ISO फॉरमॅटमधील एखादी CD/ DVD ची image CSO या फॉरमॅटमध्ये तसेच CSO या image प्रकाराचे ISO मध्ये converT करू शकता.

Advanced या Tag अंतर्गत तुम्हा  Video Joiner, Audio Joiner, MUX (MUltieXplor), Media File Info सारखे पर्याय मिळतील.

तुम्ही Convert केलेल्या फाईल्स आपोआपच FFOutput या फोल्डर मध्ये स्टोअर होतात. या फोल्डरची Default म्हणजेच मुळ Location ही तुमच्या My documents या फोल्डर मध्ये असते. तिकडे तुम्हाला FFOutput नावाचे फोल्डर सापडेल.तसेच तुम्ही Output Folder वर क्लिक करुनही आपल्या तयार झालेल्या फाईल्स बघू शकता.
ही तर झाली Format Factory ची माहीती. आपण आता प्रत्येकाचे प्रात्यक्षिक बघुया.सर्वप्रथम Video फाईल्सचे Conversion (आपल्याला हव्या असलेल्या फॉरमॅटमध्ये रुपांतर) कसे करायचे ते बघुया. समजा तुम्हाला एक Video फाईल 3GP या फॉरमॅट मध्ये Convert करायची आहे. त्यासाठी तुम्हाला Video या tag वर क्लिक करून त्यातून All to 3gp हा पर्याय निवडा.

तुम्हाला तुमचा मुळ Video निवडण्यासाठी एक All to 3gp विंडो दिसेल. त्यातून तुम्हाला हवा असलेला Video तुम्ही Add File या बटणावर क्लिक करून निवडा. तसेच जर तुम्ही Video Editor असाल आणि काही settings बदलायाच्या असतील जसे की, Video Size, Bitrate वगैरे तर तुम्हाला Output या बटणावर क्लिक करावे लागेल. आणखीन मजा माहीत आहे Video Cutting करण्यासाठी देखील तुम्हाला पर्याय Options या बटणावर क्लिक केल्यावर सापडेल. म्हणजे तुम्हाला Video ची काटछाटदेखील करता येईल.


तुम्हाला हवी असलेली फाईल निवडून झाल्यावर तुम्ही OK या बटणावर क्लिक करा. तुम्हाला तुम्ही निवडलेली फाईल Format Factory च्या मुळ विंडो मध्ये दिसेल.


तुमच्या तयार झालेल्या converted फाईल्स तुम्हाला वर नमूद केल्या प्रमाणेच FFoutput या फोल्डरमध्ये सापडतील.तुम्ही अशाच प्रकारे तुम्हाला हव्या त्या प्रमाणे काही Audio आणि Picture (Image) फाईल्स निवडू शकता. निवडीचे पर्याय देखील तसेच राहतील मात्र हो तुम्हाला हवा असलेला फॉरमॅट मात्र बदलेल.तसेच प्रत्येक प्रकारच्या Audio, Video आणि picture फाईलच्या Conversion सेटींग्स या वेगवेगळ्या असतील आणि तुम्ही त्यात तुम्हाला हवे तसे फेरबदल करु शकता..
अशाच प्रकारे तुम्हाला जर Audio किंवा Video Joining करायचे झाल्यास Advanced या tag मध्ये जाऊन तुम्हाला Audio किंवा Video Joiner हा पर्याय तुमच्या गरजेप्रमाणे
आपरू शकत.
या सोफ्टवेअरमध्ये खुप काही आहे आणखी दडलेली गुपिते बघुया तुम्ही कितपत शोधताय ते.

Format Factory या All in One Converter चा उपयोग नक्की करा आणि तुम्हालाही जर अशा कही युक्त्या माहीत असतील तर त्या नेटभेटच्या रसिकांपर्यंत जरुर पोहोचवा.

प्रथमेश शिरसाट prathmesh.shirsat@gmail.comGet NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Format Factory - All in One Converter Format Factory - All in One Converter Reviewed by Salil Chaudhary on 06:48 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.