अबरा का डबरा ! गायब झालेल्या (Deleted) फाईल्स जादुने परत मिळवा.


आपण Delete केलेल्या पुन्हा कशा Restore करायच्या हे तुम्हाला माहीत आहे का ? तुम्ही म्हणाल ह्यात काय नविन सोपे Desktop वरील Recycle Bin मध्ये जाऊन , Delete केलेल्या फाईल्सपैकी जी फाईल हवी आहे त्या फाईलवर केलेल्या Right  क्लिक करायचे आणि restore हा पर्याय निवडायचा की झाले आमची Delete केलेली फाईल आम्हाला परत मिळेल...बरोबर ना मंडळी !!!

तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण समजा तुम्ही ती फाईल Recycle Bin मधून सुद्धा Delete केली असेल किंवा मुळ फाईल Shift + Delete बटण दाबून कायमची Delete केली असेल तर ती फाईल कशी Recover कराल ??? करा करा विचार करा...!!! सापडलं का उत्तर ? राहू द्या मला याचं उत्तर सापडलं आहे. म्हणजेच एक भन्नाट सोफ्टवेअर हाती लागलं आहे ....

या सोफ्टवेअर द्वारे तुम्ही फक्त काँप्युटरच नव्हे तर मोबाईल, आय पॉड किंवा डीजीकॅम मधून कायम स्वरुपी Delete झालेल्या काही फाईल्स Recover करु शकता. विश्वास नाही बसत ना ! पण ही खरी गोष्ट आहे.
या अद्भूत चकटफू सोफ्टवेअरचे नाव आहे Recuva. आपल्या माहीती साठी मी या सोफ्टवेअरची Installatin प्रक्रिया क्रमा क्रमाने दाखवणार आहे.
हे सोफ्टवेअर डाऊनलोड  केल्यावर तुम्हाला rcsetup135 ही फाईल डाऊनलोड स्थळी दिसेल. त्यावर डबल क्लिक करा. Installation ची प्रक्रिया सुरु होईल. ती अनुक्रमे खालील प्रमाणे असेल.तुम्ही Finish या बटणावर क्लिक केल्यावर Recuva सोफ्टवेअर काँप्युटरवर install होईल आणि आपोआपच सुरु होईल.सर्वप्रथम तुम्हाला खालीलप्रमाणे एक विंडो दिसेल.


तुम्हाला हवे असल्यास फक्त विशिष्ट प्रकारच्या फाईल्सच निवडून काढण्याची सोय या सोफ्टवेअर मध्ये आहे आणि खरच सांगतो मंडळी हिच पद्धत योग्य आहे कारण तुम्हाला हव्या असलेल्या ठराविक फाईल्स उदा. Documanet फाईल्स म्हणजे Word, Excel, Powerpoin, PDF, Html, इत्यादि किंवा Image फाईल .Jpg, .gif, .tif इत्यादि तसेच Music किंवा Video फाईल्स शोधून काढता येतात. मला सगळ्या प्रकारच्या कायम Delete झालेल्या फाईल्स बघायच्या आहेत म्हणून मी Other हा पर्याय निवडून Next या बटणावर क्लिक केले.


यानंतर तुमच्या मुळ फाईल्स (कायमस्वरुपी Delete झालेल्या फाईल्स) ज्या ठिकाणि (म्हणजेच File Locatoin) होत्या त्या ठिकाणाचा पर्याय निवडण्यासाठी आणखी विंडो समोर दिसेल. त्यातून योग्य तो पर्याय निवडा आणि जर तुम्हाला काहीच माहीती नसेल त्या फाईलच्या ठिकाणाबद्दल तर मग मी निवडलेल्या पर्यायाप्रमाणे I'm Not sure हा पर्याय निवडा आणि Next हे बटणावर निवडा.


यानंतर समोर आलेल्या पुढील विंडोतून सखोल शोध (Deep Scanning ) हा पर्याय निवडा आणि Start या बटणावर क्लिक करा.


Start या बटणावर क्लिक केल्यावर तुमच्या काँप्युटर महाशयांची शोध मोहीम (scanning) सुरु होईल. तुमच्या कॉम्प्युटर चे Configuration आणि Deep scanning चा पर्याय निवडण्या बाबतचा निर्णय या दोन गोष्टींवर एकूणच scanning चा वेळ ठरेल. तसेच तुम्ही Scaning साठी कुठले ड्राईव्हस निवडले आहे यावर देखील Scanning चा एकूण वेळ ठरेल.


 हे scanning झाल्यावर तुम्हाला भरपूर फाईल्स दिसतील ज्यासमोर लाल, हिरचे आणि पिवळे गोळे असतील. त्यातील ज्या फाईल्ससमोर ला गोळे आहेत त्या फाईल्स संपूर्णपणे Irrecoverable आहेत म्हणजे त्या परत मिळू शकणार नाहीत. पिवळ्या रंगाचे गोळे दर्शवणार्‍या फाईल्स बर्‍यापै़इ recover होतील पण नक्की कितपत दिसतील हे ती फाईल कितपत recover झाल्या आहेत यावर निर्धारित असेल आणि हिरव्या गोळ्यांनी दर्शवलेल्या फाईल्स १०० %  recover होण्याजोग्या असतात. तुम्हाला हव्या असलेल्या recovered फाईल्स शोधणे अधिक सोपे जावे यासाठी switch to advnaced mode या बटणावर क्लिक करा


switch to advnaced mode या बटणावर क्लिक केल्यावर तुम्हाला आणखी Advanced Mode ची विंडो दिसेल.
ज्या द्वारे तुम्हाला हव्या Documents, pictures, Music, Videos, Compressed, Emails प्रकारच्या फाईल्स निवडून Customize search करता येईल.


तुम्हाला हव्या असलेल्या फाईल्सच्या समोर असलेल्या चौकोनात क्लिक करा (म्हणजे तिकडे टिकमार्क दिसेल तुम्हाला) आणि खाली उजव्या हाताला दिलेल्या Recover या बटणावर क्लिक करा.

Recover बटणावर क्लिक केल्यावर तुम्हाला हव्या असलेल्या फाईल्स कुठे ठेवायच्या यासाठी तुम्हाला पर्याय विचाराला जाईल, त्यातून तुम्हाला हव असलेला पर्याय तुम्ही निवडा आणि Ok या बटणावर क्लिक करा.


तुम्हाला हव्या असलेल्या हार्ड डिस्कमधून Delete झालेल्या फाईल तुम्हाला परत मिळतील. हे सोफ्टवेअर Delete झालेल्या सर्व फाईल्स Recover करण्याचा प्रयत्न करते पण जर ती फाईलच Corrupt / Damagae झाली असेल तर माग काही होऊ शकत नाही. पण तरीही ज्या फाइल्स recover होणे शक्य आहे त्या तरी आपण recover करू शकतो कि नाही...!
असे हे अनोखे Recovery Tool तुम्हाला कसे वाटले  ते मला जरूर कळवा तसेच तुमच्या प्रतिक्रिया आणि सुचनादेखील कळवा.


प्रथमेश शिरसाट prathmesh.shirsat@gmail.comGet NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

अबरा का डबरा ! गायब झालेल्या (Deleted) फाईल्स जादुने परत मिळवा. अबरा का डबरा ! गायब झालेल्या (Deleted) फाईल्स जादुने परत मिळवा. Reviewed by Salil Chaudhary on 17:32 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.