Text Animation in Microsoft word. Yeh, it's possible !

मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये अगदी छोटे शब्दिक अ‍ॅनिमेशन करता येते असे जर तुम्हाला कोणी विचारले तर काय म्हणाल हो की नाही ??
मला वाटतं ते उत्तर कदाचित नाही अस असेल. उलट तुम्ही मला वेड्यात काढाल की  मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये अ‍ॅनिमेशन कसं काय शक्य अहे आहे म्हणून ! पण हे शक्य आहे.हल्ली आपण प्रिंटर चा वापर फरच कमी करत असतो. जास्तीत जास्तं कामं मेल ने केली जातात आणि वर्ड फाईल्स तर आपण हमखास वापरतो. बरोबर की नाही ? आणि Highlight करण्यासाठी शब्दांचा रंग बदलणे, साईज वाढवणे, आकार बदलणे किंवा तो एखादा शब्द अधोरेखीत करणे अशा युक्त्या वापरतो. पण या व्यतिरिक्त एक भन्नाट युक्ति आहे. आधी तुम्हाला ज्या शब्दांना अ‍ॅनिमेशन ईफेक्ट द्यायचा आहे तो सिलेक्ट करा आणि वरील टूलबारमधून Format -----> Font हा पर्याय निवडा.


Font ची एक नवीन विंडो उघडेल तुमच्यासमोर. त्यातून Text effects या टॅग वर क्लिक करून हवा तो Text effect निवडा आणि Ok  या बटणावर क्लिक करा.


तुम्ही निवडलेली अक्षरे blink होताना दिसतील (अर्थात जर तुम्ही मी निवडल्याप्रमाणेच जर इफेक्ट निवडला असेल तर)
आता तुम्ही तुमची कल्पकता वापरून हवे तसे Text Effects देऊ शकता. ही वर्ड मधील एक अनोखी , सोपी आणि खुशखुशीत युक्ती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा.

प्रथमेश शिरसाट


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Text Animation in Microsoft word. Yeh, it's possible ! Text Animation in Microsoft word. Yeh, it's possible ! Reviewed by Salil Chaudhary on 19:05 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.