नेटभेट ई-पुस्तक लायब्ररी मध्ये दोन नविन ई-पुस्तकांचे आगमन !


वाचकहो, नेटभेट ई-पुस्तक लायब्ररीला प्रचंड प्रतीसाद दिल्याबद्दल आम्ही आपले अतिशय आभारी आहोत. वाचकांना मराठी ऑनलाईन साहित्याशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो.
नेटभेट ई-पुस्तक लायब्ररी मध्ये जास्तीत जास्तीत मराठी ई-पुस्तके आणण्याच्या आमच्या प्रयत्नांतर्गत आज आम्ही दोन नविन पुस्तके आपल्या भेटीला आणत आहोत.यापैकी पहिले पुस्तक मला नुकताच scribd.com या वेबसाईटवर मिळाले. या पुस्तकाचे नाव आहे "समग्र केशवसुत" .. कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुतांच्या कवितांचा हा संग्रह आहे. मुलुंड येथील संगणक प्रकाशनाने हे ई-पुस्तक प्रकाशित केले आहे.

कवी केशवसुतांच्या मराठी व इंग्रजी कवितांचा समावेश असलेले हे २६३ पानांचे ई-पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

नेटभेटच्या ई-पुस्तक लायब्ररी मध्ये आलेल्या दुसर्‍या पुस्तकाचे नाव आहे 'शब्दांकीत प्रतीभा".  हा एक दिवाळी अंक आहे.

प्रतीभा सकपाळ (मुंबई) यांनी प्रकाशित केलेल्या या दिवाळी अंकाचा पहिलाच भाग ई-पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध झाला आहे. (Scribd.com). कथा, कविता, माहितीपर आणि उपयुक्त लेखांनी सजलेला हा दिवाळी अंक अतिशय वाचनीय झाला आहे. तेव्हा या ई-पुस्तकाचा लाभ घेणे देखिल वाचकांना नक्कीच आवडेला.

यापुढेही अनेक नवनविन ई-पुस्तके वाचकांच्या भेटीस आणण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहिल, याकामी आपणही शक्य तेवेढे सहाय्य करावे ही नम्र विनंती.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

नेटभेट ई-पुस्तक लायब्ररी मध्ये दोन नविन ई-पुस्तकांचे आगमन ! नेटभेट ई-पुस्तक लायब्ररी मध्ये दोन नविन ई-पुस्तकांचे आगमन ! Reviewed by Salil Chaudhary on 08:30 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.