Devise doctor - ड्राईवर upgradation च्या डोकेदुखीला आत करा बाय बाय !!


आपल्यापैकी बर्‍याच जणांना ड्राईवर्स हा प्रकार माहीत नसेल कदाचित. कारण आपला तसा थेट कधी संबंधच येत नसेल हो त्या गोष्टीशी ! जेव्हा तुमचा काँप्युटर तुमचा इंजिनियर फॉरमॅट करतो तेव्हा तो तुम्हाला विचारत असेल की काँप्युटरबरोबर काही CD/ DVD मिळाल्या आहेत का वगैरे ? आणि आपण हो म्हणून त्याच्या हातात काही CD/ DVD देतो. ज्या आपल्याला आपण काँप्युटर विकत घेताना मिळालेल्या असतात. पण आपण तो त्या CD किंवा DVD आपल्याकडेच का मगतो तो येताना स्वतः का नाही आणू शकत जर तो इंजिनियर आहे तर याचा विचार केला आहेत का तुम्ही कधी ? नाही ना !

आपला काँप्युटर हा मुख्यत्वे ३ प्रकारच्या ड्राईवर्स वर चालतो.ते म्हणजे साऊंड, डिस्प्ले (ग्राफिक्स एसिलरेटर) आणि लॅन यानंतर इतरही काही ड्राइवर्स आहेत जसे कि प्रिंटर, स्कॅनर, यु. एस. बी पोर्टचे ड्राईवर, टि व्ही ट्युनर कार्ड ड्राईवर, फॅक्स मशिनचे ड्राईव्हर्स, LCD स्क्रीन्चे ड्राईव्हर्स वगैरे; थोडक्यात म्हणजे जे जे भाग संगणकाला जोडण्यात येतात त्या सर्वांचे ड्राईवर्स असणे गरजेचे आहे. आपल्या कार्यप्रणाली मध्ये ( Operating System ) CD Rom/ writer, hard disk, USB वगैरेंचे काही महत्त्वाचे ड्राईवर्स मुलतःच असतात. पण हे मदरबोर्ड वेगवेगळे असल्या कारणाने आणि प्रत्येक मदरबोर्डची जोडणी आणि त्यातील लहान लहान भाग यांती विविधते साऊंड, डिस्प्ले (ग्राफिक्स एसिलरेटर) आणि लॅन ड्राइवर्स वेगवेगळे असतात. हे तर झाले ड्राईवर्सपुराण (म्हणजे त्याबद्दलचा आढावा).

आपल्या पैकी बर्‍याच जणांचा हा गैरसमज असतो Automatic updates हा Control Panel मधील पर्याय On ठेवला म्हणजे आपला काँप्युटर हा Update असतो. ते साफ चुकीचे आहे. Automatic Updates फक्त कार्यप्रणालीशी (Operating system) संबंधितच्या फाईल्सच Update करत असतो ही बाब लक्षात ठेवा म्हणून तर आपल्याला प्रत्येक सोफ्टवेअर Install करताना Automatic Updates हा पर्याय दिसतो नाहीतर कशाला दिसला असता बरे ?  जशी आपली कार्यप्रणाली प्रगत असते तसेच ड्राईवर्स देखील प्रगत (Updated) असणे गरजेचे असते. पण ड्राईवर्स एकदा Install झाले आणि आपला काँप्युटर सुरळीत सुरु झाला तर  आपण काय त्या गोष्टीकडे पुन्हा मागे वलुन बघत नाही. पण इतर सोफ्टवेअर प्रमाणेच ड्राईवर्स देखील update होणे गरजेचे आहे पण आता ते कसे करायचे हा प्रश्न तुम्हाला पडेल. अहो मी आहे ना मदत करायला काही घाबरायचे कारण नाही !

तुमचे सर्व ड्राईवर्सपण update होतील आणि तुम्हाला यासाठी नेट वर भटकावे पण नाही लागणार ! कस शक्य आहे हे सगळं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ना ?

हे सगळं शक्य आहे ते Device Doctor या एका सोफ्टवेअरमुळे. !!! हे सोफ्टवेअर हाताळण्यास अतिशय सोपे असून एकाच क्लिक मध्ये आपल्या कॉम्प्युटरसाठी गरजेच्या अशा सर्व ड्राईवर्सचे Updates दाखवते आणि ते डाऊनलोड करण्यासाठी मोफत डाऊनलोड लिंक सुद्धा पुरवते. चला बघुया हे सोफ्टवेअर Install कसे करायचे ते ?
आपल्या माहीतीसाठी मी नेहमी प्रमाणे या सोफ्टवेअरची Instalaation प्रक्रिया सविस्तर दाखवत आहे.
वरील लिंकवर क्लिक केल्यावर DeviceDoctor_Setup या नावाची एक set up फाईल डाऊनलोड होईल.


तुम्हाला त्या फाईलवर डबल क्लिक करावे लागेल की लगेचच खालीलप्रमाणे Installation प्रक्रिया सुरु होईल.
१.

२.

३.

४.

५.

६.

Installation आपोआप पूर्ण होईल आणी तुमच्या काँप्युटरवर Device doctor install होईल.
तुम्हाल हे सोफ्टवेअर Install झाल्यावर एक नविन विंडो आपोआपच उघडी झालेली दिसेल.


तुम्हाला Begin scan या बटणावर क्लिक करावे लागेल. तुमच्या काँप्युटरसाठी गरजेच्या अशा सर्व उपलब्ध updated drivers ची माहिती तुमच्यासमोर चटकन दिसेल. तुम्हाला हवे असलेले drivers डाऊनलोड करण्यासाठी बटण्स दिसतील त्यावर क्लिक करा.

त्या बटणांवर क्रमाक्रमाने तुम्ही क्लिक करा. मी सर्वप्रथम अनुक्रमे ग्राफिक ड्राईवर्स डाऊनलोड करणार आहे म्हणून मी पहिला पर्याय निवडला आणि Download Update या बटणावर क्लिक केले की थेट  त्या ड्राईवर अप्डेट डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पेज वर जाऊन आपण पोहोचतो आणि ते पेज सुद्धा device Doctor चेच आहे बरं का !


तुम्हाला हवे असलेले ड्राईवर अपडेट तुमच्यासमओर उपलब्ध दिसेल तुम्हाला आणि डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक सुद्धा सापडेल बस आता तुम्हाला त्या लिंकवर फक्त क्लिक करायचे आहे की तुम्हाला ते ड्राईवर अपडेट डाऊनलोड करता येईल (डाऊनलोड केले अपडेट हे फक्त zip फॉरमेट मध्ये असतील याची नोंद असु द्या).


डाऊनलोड केलेल्या फोल्डर मधून ड्राईवर अगदी सहज पणे install करु शकता. एकदा प्रयत्न तरी करून पहा काही अडचण आलीच तर मी आहे की..होऊन जाऊ द्या.
ड्राईवर अपडेशन ची समस्या सोपा करणार हा लेख तुम्हाला कसा वाटला ते मल जरूर कळवा. तसेच काही सुचना आणि प्रतिक्रिया असल्यास त्यादेखील आमच्यापर्यंत पोहोचू द्या.


प्रथमेश शिरसाट prathmesh.shirsat@gmail.com


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Devise doctor - ड्राईवर upgradation च्या डोकेदुखीला आत करा बाय बाय !! Devise doctor - ड्राईवर upgradation च्या डोकेदुखीला आत करा बाय बाय !! Reviewed by Salil Chaudhary on 11:00 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.