"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग चौथा.)अ‍ॅडसेन्समधील अ‍ॅड्सचे प्रकार (search, content, feeds, parked domains, Mobile content etc) ,


मित्रहो, आतापर्यंत आपण अ‍ॅडसेन्स काय आहे? कसे काम करते? अ‍ॅडसेन्स अकाउंट मिळविण्यासाठी काय उपाय करावे लागतात याबद्द्ल माहिती मिळविली. ही सर्व माहिती अ‍ॅडसेन्सच्या बाह्यरंगांबद्दल (External) होती.


आज या लेखापासून आपण गुगल अ‍ॅडसेन्सचे अंतरंग पाहणार आहोत. आपल्या ब्लॉगवर किती प्रकारे, किती जाहिराती , कशा व कुठे दाखवाव्यात? अ‍ॅडसेन्स मध्ये जाहिरातींचे किती प्रकार आहेत? ते कसे व कुठे वापरायचे ? जाहिरातींचा कोड कसा तयार करायचा व ब्लॉगवर कोड कसा चिकटवायचा ? अ‍ॅड कोडचे कस्टमायझेशन का व कसे करावे? 
ब्लॉगची मिळकत कुठे पहायची ? रीपोर्टस कसे वाचायचे व वापरायचे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण पुढील लेखांमध्ये पाहणार आहोत.


आजच्या लेखामध्ये आपण अ‍ॅडसेन्स मधील जाहिरातींचे प्रकार पाहणार आहोत.
गुगल अ‍ॅडसेन्स आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईटवर विविध प्रकारे वापरता येते. या प्रकारांचे प्रामुख्याने 
खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येते.


1. Adsense for search -
गुगल हे प्रामुख्याने एक सर्च इंजिन आहे. जगातील सर्व माहिती सुसंगतरीत्या एकत्रीत ठेवून वाचकांना ती माहिती सहज  शोधता येण्याजोगी असावी हे गुगलचे मुख्य उद्दीष्ट आहे. म्हणूनच सर्व ब्लॉगर्स आणि वेबसाईट्सना गुगलने आपली सर्च टेक्नॉलॉजी वापरु दिली. यालाच गुगल कस्टम सर्च असे म्हणतात.
गुगल कस्टम सर्चचा वापर करुन आपल्या ब्लॉगवर, आपल्या ब्लॉगवरील माहितीचा शोध वाचकांना घेता यावा यासाठी एक सर्च बॉक्स देता येतो. या सर्च बॉक्सचा वापर करुन वाचकाने शोध घेतला तर आलेल्या रीझल्ट पेजवर गुगलने दाखविलेल्या जाहिराती दिसतात. या जाहिरातींवर वाचकांनी क्लिक केल्यास याचे चांगले पैसे मिळतात असा माझा अनुभव आहे.
उदाहरणार्थ - नेटभेट.कॉमच्या उजव्या बाजुला जो सर्च बॉक्स दिसतो तो गुगल कस्टम सर्चचे एक उदाहरण आहे. तेथे शोध घेउन पाहिल्यास जाहिराती कशा व कोठे दिसतात याची तुम्हाला कल्पना येईल. (आणि मला काही पैसे मिळतील :-)
2. Adsense for Content -
अ‍ॅडसेन्स जाहिरातींचा हा प्रकार आपणा सर्वांना ठाउक आहेच. तुमच्या ब्लॉग / साईटवरील मजकुराच्या (Content) अनुशंगाने ब्लॉगवर जाहिराती दाखविल्या जातात. ब्लॉगच्या पानावरील मजकुरामधुन काही निवडक Keywords च्या सहाय्याने गुगलतर्फे जाहिराती दाखविल्या जातात. हा गुगल अ‍ॅडसेन्सचा सर्वाधिक लोकप्रीय प्रकार आहे.


3. Adsense for feeds -


RSS Feeds च्या सहाय्याने ब्लॉगवरील नविन पोस्ट त्वरीत वाचकांपर्यंत पोहोचवता येते. ब्लॉगवर नविन काही लिखाण झाले आहे का हे पाहण्यासाठी वाचकांना ब्लॉगला नियमितपणे भेट द्यावी लागते. मात्र प्रत्येक वेळेस वाचकांना आपल्या ब्लॉगला भेट देणे शक्य होईलच असे नाही. अशा वेळेस वाचकांना नविन पोस्टसची माहिती ईमेल द्वारे किंवा RSS reader ( उदाहरणार्थ - गुगल रीडर ) द्वारे कळवण्यासाठी Feeds चा वापर केला जातो.
ब्लॉग्जच्या नियमीत वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी RSS चा वापर अतिशय उपयुक्त ठरतो आहे आणि म्हणुनच बहुतांशी ब्लॉग्ज आपल्या पोस्ट्सच्या फीड्स वाचकांपर्यंत पोहोचविण्यास उत्सुक असतात.
गुगलने फीड्स मध्ये देखिल जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गुगल तर्फे दाखविल्या जाणार्‍या जाहिराती फीड्स बरोबर चक्क वाचकांच्या ईनबॉक्स मध्ये जाउन थडकल्या आहेत.
उदाहरण - नेटभेटला सबस्क्राईब करणार्‍या वाचकांना नविन लेखांची माहिती खालील स्वरुपात ईमेल द्वारे पाठविली जाते. खालील चित्रात गुगलच्या जाहिराती देखिल पाहता येतील.
4. Adsense for Parked domains -


ईंटरनेट विश्वात डोमेन नाव विक्री (Domain name selling and reselling) हा एक मोठा व्यवसाय आहे. चांगली विकली जाऊ शकणारी डोमेन नावे  आधिच बुक करुन ठेवली जातात आणि त्यानंतर जास्त किमतीला विकली जातात. एकदा विकत घेतलेले डोमेन नाव पुन्हा विकले जात नाही तोपर्यंत त्यास Parked domain असे म्हणतात. अशा parked domains वर जर कोणी चुकुन किंवा डोमेन खरेदीच्या उद्देशाने भेट दीली तर त्यांना जाहिराती दाखवूनही पैसे कमावता येतात.
हा पर्याय ब्लॉगर्ससाठी नसल्याने आपण याकडे दुर्लक्ष करुया.


5. Adsense for mobile content -


स्मार्टफोन्स मुळे इंटरनेटचा मोबाईलवरुन होणारा वापर वाढला आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन गुगल काकांनी मोबाईल साईट्स मध्ये जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे. मोबाईलच्या छोट्याश्या स्क्रीनसाठी सोयीस्कर तसेच कमीत कमी नेव्हीगेशन असलेल्या साईट्स बनवण्याकडे वेबमास्टर्सचा कल वाढत चालला आहे. अशा खास मोबाईल साईट्ससाठी गुगलने Adsense for mobile content ही सेवा चालू केली आहे.अ‍ॅडसेन्सवरील लेखमालिकेच्या तिसर्‍या भागामध्ये आपण गुगल अ‍ॅडसेन्स खात्यासाठी नोंदणी करण्यासाठीची आवश्यक ती माहिती घेतली. मला खात्री आहे की माझ्या ब्लॉगरमित्रांनी यासाठी तयारी चालू केली असेलच. मित्रांनो तुमच्या या ब्लॉगची लिंक खाली कमेंट्स मध्ये लिहा. म्हणजे मी अधुन मधुन या ब्लॉग्जना भेट देऊन काही अ‍ॅडसेन्सबद्दल काही सुचना तुम्हाला देऊ शकेन.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग चौथा.) "गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग चौथा.) Reviewed by Salil Chaudhary on 19:21 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.