"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग सहावा)


ब्लॉगरमित्रहो, अ‍ॅडसेन्सबद्दलच्या आपल्या लेखमालिकेमधील पाचव्या लेखात आपण अ‍ॅडसेन्समध्ये दाखविल्या जाणार्‍या जाहिरातींचे आकारानुसार आणि चित्र अथवा शाब्दिक जाहिरात या प्रकारानुसार होणारे वर्गीकरण याबद्दल माहिती घेतली. आज या लेखात आपण ब्लॉगर.कॉम वरील ब्लॉग्जमध्ये अ‍ॅडसेन्स जाहिराती कशा दाखवाव्यात हे पाहणार आहोत.

ब्लॉगर.कॉम वरील ब्लॉग्जमध्ये अ‍ॅडसेन्सवरील जाहिराती दाखविण्यासाठी दोन पद्धती आहेत. पहिल्या व सोप्या पद्धतीमध्ये आपण ब्लॉगर.कॉम मध्येच जाहिरात बनवणार आहोत. तर दुसर्‍या पद्धतीत Adsense.com मध्ये जाहिराती तयार करुन त्याचा कोड ब्लॉगवर चिकटवणार आहोत.

१. पहिली पद्धत - पहिल्या पद्धतीमध्ये दोन उपप्रकार आहेत.


A.  ब्लॉगच्या Sidebar मध्ये जाहिराती दाखविण्यासाठी -

1. Blogger.com मध्ये लॉग-इन करा.
2. त्यानंतर ब्लॉगच्या Dashboard मध्ये जाऊन Edit html व Page element मध्ये जा.
3. येथे Add a gadget या लिंकवर क्लिक केल्यावर Gaadgets ची एक यादी दिसु लागेल.


4.  या यादीमध्ये Adsense  चे Gadget देखिल असेल त्यावर क्लिक करा.
5. Configure adsense या नावाची एक विंडो उघडेल यामध्ये जाहिरात ब्लॉगवर दाखविण्यासंबंधी काही पर्याय दिसतील, त्याची माहिती खालीलप्रमाणे -
Format   -  येथे जाहिरातीचा  आकार निवडता येतो तसेच जाहिरात फक्त शब्द किंवा शब्द आणि चित्रे या प्रकारात असावी हे ठरवता येते.
Colors - ब्लॉगच्या थीमला साजेशी जाहिरातीची रंगसंगती येथे ठरवता येते. अ‍ॅडसेन्स जाहिरातींच्या काही ठराविक थीम्सपैकी थीम निवडता येते तसेच आपल्या ब्लॉगच्या रंगसंगतीनुसार जाहिरातींचा रंग बदलता येतो.
Preview - वरील दोन पर्याय निवडल्यानंतर जाहिरात कशी दिसेल याचा preview येथे पाहता येईल.
Advanced - गुगल अ‍ॅडसेन्समध्ये एकापेक्षा अधिक अकाउंट्स वापरायचे असतील तर हा पर्याय वापरता येतो.


6. वर दिलेल्यांपैकी आवश्यक पर्याय निवडुन Save करा.

B.  ब्लॉगपोस्टस्च्या खाली जाहिराती दाखविण्यासाठी -

1. ब्लॉगच्या Dashboard मध्ये जाऊन Edit html व Page element मध्ये जा.
2. Blog post या element मध्ये Edit या लिंकवर क्लिक करा.
3. Configure blog post या नावाची विंडो उघडेल त्यामध्ये Configure inline ads असा उपपर्याय दिसेल.
4. किती पोस्ट्स नंतर जाहिराती दिसाव्यात ते इथे ठरवता येते. प्रत्येक पानावर अ‍ॅडसेन्सच्या जास्तीतजास्त तीन जाहिराती दाखविता येतात.
5. इतर पर्याय वरील क्रमांक ५ नुसारच आहेत. त्यापैकी उचित पर्याय निवडा.
6. Save बटणावर क्लिक करा.

ही झाली ब्लॉगर.कॉमवरील ब्लॉग्जमध्ये जाहिराती दाखविण्याची पहिली व सोपी पद्धत. मात्र या पद्धतीमध्ये काही त्रुटी आहेत. त्रुटी म्हणण्यापेक्षा काही पर्याय कमी असतात. मराठी ब्लॉगर्ससाठी आवश्यक असणारा एक महत्त्वाचा पर्याय यामध्ये नाही आहे. म्हणुनच आपण दुसर्‍या पद्धतीची माहिती घेणार आहोत परंतु पुढील लेखात........


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग सहावा) "गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग सहावा) Reviewed by Salil Chaudhary on 09:09 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.