नेटभेट ई-मासिक मे २०१०


मराठीमध्ये सातत्याने आणि वैविध्यपुर्ण लेखन करणार्‍या मराठी ब्लॉगर्समुळे ऑनलाईन मराठीचं विश्व समृद्ध होत आहे. नेटभेट.कॉम आणि नेटभेट ई-मासिकाद्वारे आम्ही देखिल यात खारीचा वाटा उचलतो आहे ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. नेटभेट ई-मासिकाला ब्लॉगर्स आणि जगभरातील मराठी वाचकांचे जे प्रेम लाभते आहे त्याचा आनंद तर केवळ अवर्णनीय ! एका वाचकाने "लहानपणी जशी "चांदोबा"ची वाट पहायचो तशीच आता नेटभेटची वाट पाहतो" असा अभिप्राय ईमेलद्वारे दिला तेव्हा आम्ही करत असलेल्या कष्टाचे चीज झाले असे वाटले.

नेटभेट ई-मासिकाचा मे २०१० चा अंक आम्ही आज प्रकाशित करत आहोत. अनेक अर्थांनी यंदाचा अंक आमच्यासाठी "स्पेशल" आहे. या महिन्यातच दादर येथे मराठी ब्लॉगर्सचा स्नेहमेळावा संपन्न झाला. महेंद्र कुलकर्णी, रोहन चौधरी आणि कांचन कराई यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये अर्थाअर्थी एकमेकांशी काहिही संबंध नसलेल्या आणि तरीही एका कुटुंबातील सदस्य वाटावेत इतक्या आपुलकिने वागणार्‍या ब्लॉगर्सनी प्रचंड प्रतीसाद दिला. मराठी ब्लॉगर्स आता संघटीत होऊन नवनिर्माणाच्या दिशेने पाउले टाकत आहेत हे पाहुन अतिशय आनंद झाला. अनेकांनी नेटभेट ई-मासिकाची संकल्पना त्यांना आवडल्याचे सांगुन आम्हाला अधिक प्रोत्साहित केले.

नेटभेट ई-मासिकाच्या या अंकातील आणखी एक स्पेशल गोष्ट म्हणजे प्रथितयश कॉर्पोरेट लॉयर आणि मराठी भाषिक तरुणांमध्ये उद्योजकता वाढीस लागावी यासाठी वर्तमानपत्रात व आपल्या ब्लॉगमध्ये लेखन करणारे श्री. नितीन पोतदार यांच्या ब्लॉगवरील लेख नेटभेटच्या या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच मासिकाच्या जून २०१० च्या अंकामध्ये नितीन सर मराठी तरुणांसाठी आपल्या खास शैलीत मार्गदर्शन करणार आहेत.नेटभेटच्या ईतर अंकांप्रमाणे मे २०१० हा अंक देखिल वाचकांच्या खास पसंतीस उतरेल अशी आम्ही आशा करतो.

धन्यवाद.
सलिल चौधरी व प्रणव जोशी

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

नेटभेट ई-मासिक मे २०१० नेटभेट ई-मासिक मे २०१० Reviewed by Salil Chaudhary on 09:50 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.