नेटभेट ई-मासिक जून २०१०


नेटभेट ई-मासिक जून २०१० चा अंक आपल्या हाती सोपविताना आम्हाला अतीशय आनंद होत आहे. इतक्या उशिरा अंक प्रकाशित करत आहोत त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. अनेक वाचकांनी फोन तसेच ईमेल करून मासिकाबद्द्ल विचारणा केली तेव्हा ओशाळल्यासारखे झाले होते मात्र "नेटभेट ई-मासिकाची" वाचक प्रतीक्षा करत असतात ही भावना मनोमन सुखावणारी होती.
जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी अगदी बारा वाजता हा अंक प्रकाशित करताना आमची अवस्था अगदी शेवटच्या षटकापर्यंत ताणल्या गेलेल्या सामन्यातील खेळाडूंप्रमाणे झाली आहे. ( Month end ला बेफाम काम करण्याची सवय अशी उपयोगी पडेल असे कधी वाटले नव्हते !)

मित्रहो, नेटभेटच्या या अंकास वेळेअभावी पुरेसा न्याय देता आला नाही मात्र तरी देखिल ब्लॉगर्सच्या विश्वातील विविधांगी विषयांना या मासिकाद्वारे आम्ही स्पर्श करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. नेटभेटच्या इतर अंकांप्रमाणेच हा अंकही आपल्या निश्चीतच पसंतीस उतरेल याची आम्हांला खात्री आहे. मासिकामध्ये ज्यांचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत अशा सर्व ब्लॉगर्सचे अभिनंदन आणि अनेक धन्यवाद.
नेटभेट ई-मासिक व संकेतस्थळाबद्दलच्या आपल्या सूचना, प्रतीक्रीया व प्रतीसादांचा ओघ असाच चालू असुद्यात ही नम्र विनंती.


आपली "टीम नेटभेट"


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

नेटभेट ई-मासिक जून २०१० नेटभेट ई-मासिक जून २०१० Reviewed by Salil Chaudhary on 11:49 Rating: 5

No comments:
http://learn.netbhet.com

Powered by Blogger.