विल्मा रुडॉल्फ Wilma Rudolph - A truly inspirational story


जेव्हा विल्मा रुडॉल्फ चार वर्षांची होती तेव्हा ति पोलिओमुळे अधू झाली आणि तिला चालणे देखिल अशक्यप्राय झाले. आणि दुर्दैवाने तिच्या घरच्या गरीबीमु़ळे या आजारावर उपचार करणे देखिल तिच्या कुटुंबाला कठीण होते. विल्माचा जन्म एका मोठ्या कुटुंबात झाला होता. तीला १९ मोठी आणि २ लहान भावंडे होती. वडील रेल्वेमध्ये हमाल होते आणि आई घरघुती कामे करत असे.

एवढ्या कठीण परीस्थितीतही विल्माच्या आईने हार मानली नाही. काही करुन विल्माला पुन्हा चालता आलंच पाहिजे अशी तिची मनोमन इच्छा होती. डॉक्टरांनी मात्र तिला पुन्हा चालता येण्याची शक्यता फेटाळून लावली होती. तरी देखिल विल्माची आई तिला दररोज एका दूरच्या इस्पीतळात उपचारासाठी घेऊन जात असे. अर्थात त्याचा काहीच फायदा झाला नाही. मात्र डॉक्टरांनी विल्माच्या पायाला मसाज करण्याचा सल्ला दिला. विल्माच्या आईने मसाज करण्याची पद्धती स्वतः शिकून घेतली आणि विल्माच्या भावंडांनाही शिकविली. ते सर्वजण विल्माची काळजी घेत आणि दररोज चार वेळा तिच्या पायांना मसाज करत असत.

विल्माच्या आई आणि भावंडांच्या प्रयत्नांना यश येत होते. विल्मा आठ वर्षांची होईपर्यंत तिला लाकडी कुबड्यांच्या सहाय्याने चालता येऊ लागले होते. पुढे अपंगांसाठी असलेले खास बूट वापरुन चालणे देखिल विल्माला जमू लागले होते. तिच्या भावंडांबरोबर आता विल्मा बास्केटबॉल खेळू लागली होती.

आणखी तीन वर्षांनंतर, एकदा विल्माची आई संध्याकाळी घरी आली असता तिच्या लक्षात आले की विल्मा चक्क कोणत्याही आधाराशिवाय किंवा तिच्या खास बूटाशिवाय भावंडांबरोबर खेळत होती. विल्माची ही प्रगती पाहून एका ओळखीच्या क्रीडाप्रशिक्षकाने तिला धावण्याचा सराव करण्यास प्रवृत्त केले. विल्माला मोठ्या प्रयत्नाने धावता येणे शक्य झाले. एवढेच नव्हे तर विल्माला धावणे खुप आवडूही लागले. इतके की तीने शाळेमधील सर्व धावण्याच्या स्पर्धा जिंकून दाखवल्या. त्यानंतर मात्र विल्माने कधीच मागे वळून पाहिले नाही. १९५६ साली मेलबोर्न येथे होणार्‍या ऑलींपीक स्पर्धांसाठी विल्माची निवड झाली. तिथे विल्माने महिलांच्या ४०० मीटर  धावण्याच्या शर्यतीत ब्राँझ पदक पटकावले.१९५९ मध्ये विल्माने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत विश्वविक्रमाची नोंद केली आणि या तिच्या कामगीरीमुळे १९६० साली रोम होणार्‍या ऑलिंपीक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी ती पात्र ठरली. या संधीचे सोने करत विल्माने १०० मीटर आणि २०० मीटर या दोनही प्रकारांत सुवर्णपदक पटकावले. याच स्पर्धांमध्ये ४०० मीटर रीले धावताना अचानक विल्माचा पाय मुरगळला मात्र तरीही मोठ्या त्वेषाने धावुन विल्माने तीही शर्यत पुर्ण केली आणि संघाला ४०० मीटर रीलेमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. वर दिलेल्या तिच्या फोटोमध्ये ती रोममधील  जिंकलेल्या तीन पदकांसोबत दिसत आहे.   
वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी विल्माने खेळातून सन्यास घेतला मात्र तीने महिलांच्या धावपटू चमूची प्रशिक्षक बनून आपली क्रीडासेवा चालू ठेवली. केवळ पदके जिंकण्यासाठीच आपला जन्म झाला नसून आपल्या हातून काहीतरी समाजोपयोगी घडायला पाहिजे या विचाराने प्रेरीत होउन विल्माने लहान मुलांना शिस्त,मेहनत शिकता यावी आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करता यावेत म्हणून "विल्मा रुडॉल्फ फाउंडेशन"ची स्थापना केली.

अशा या महान खेळाडूचे १९९४ मध्ये ब्रेन कॅन्सरने निधन झाले. आज जरी विल्मा रुडॉल्फ आपल्यात नसली तरी तिच्या कर्तुत्वाने ती जगातील सर्व तरुणांना प्रेरणादायी ठरत आहे.  


Selected Wilma Rudolph Quotations
• Never underestimate the power of dreams and the influence of the human spirit. We are all the same in this notion. The potential for greatness lives within each of us.
• My doctors told me I would never walk again. My mother told me I would. I believed my mother.
• The triumph can't be had without the struggle. And I know what struggle is. I have spent a lifetime trying to share what it has meant to be a woman first in the world of sports so that other young women have a chance to reach their dreams.
• I don't consciously try to be a role model, so I don't know if I am or not. That's for other people to decide.
• I tell them that the most important aspect is to be yourself and have confidence in yourself. I remind them the triumph can't be had without the struggle.
• No matter what accomplishments you make, somebody helps you.
• I thought I'd never get to see that. Florence Griffith Joyner -- every time she ran, I ran.
• about her leg braces: I spent most of my time trying to figure out how to get them off. But when you come from a large, wonderful family, there's always a way to achieve your goals.
• I walked with braces until I was at least nine years old. My life wasn't like the average person who grew up and decided to enter the world of sports.
• My mother taught me very early to believe I could achieve any accomplishment I wanted to. The first was to walk without braces.
• I ran and ran and ran every day, and I acquired this sense of determination, this sense of spirit that I would never, never give up, no matter what else happened.
• By the time I was 12 I was challenging every boy in our neighborhood at running, jumping, everything.
• The feeling of accomplishment welled up inside of me, three Olympic gold medals. I knew that was something nobody could ever take away from me, ever.
• When I was going through my transition of being famous, I tried to ask God why was I here? what was my purpose? Surely, it wasn't just to win three gold medals. There has to be more to this life than that.
• What do you do after you are world famous and nineteen or twenty and you have sat with prime ministers, kings and queens, the Pope? Do you go back home and take a job? What do you do to keep your sanity? You come back to the real world.
• When the sun is shining I can do anything; no mountain is too high, no trouble too difficult.
• I believe in me more than anything in this world.

Credits - http://womenshistory.about.com/Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

विल्मा रुडॉल्फ Wilma Rudolph - A truly inspirational story विल्मा रुडॉल्फ Wilma Rudolph - A truly inspirational story Reviewed by Salil Chaudhary on 08:21 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.