यांनी घडवलं ईंटरनेट जगत.... People who changed the world with Internet.ईंटरनेट शिवाय जगाची कल्पना करणे देखिल कठीण आहे. ईंटरनेटने केव्हाच आपल्या जगाचा ताबा घेतला आहे. 
ईंटरनेटच्या या ताकदीचा जगाला परीचय होण्याआधी स्वतःच्या असामान्य कल्पनाशक्तीने आणि चिकाटीने ईंटरनेटचे विश्व उभारणार्‍या सर्व महान व्यक्तींची आज मी आपल्याला ओळख करून देणार आहे. 
या सर्वांनी ईंटरनेटच्या माध्यमातून पुर्ण जगच बदलवून टाकले आहे.


विंट सर्फ आणि बॉब कान (Vint Cerf and Bob Kahn) - ईंटरनेटचे जन्मदाता

विंट सर्फ Vint Cerf आणि बॉब कान Bob Kahn यांना ईंटरनेटचे जन्मदाते म्हंटले जाते. या दोघांनी मिळून TCP/IP या प्रोटोकॉलची निर्मीती केली. नेटवर्कमधील संगणक आपापसात संवाद साधण्यासाठी TCP/IP च्या भाषेचा वापर करतात. विंट सर्फ एकदा म्हणाला होता की "एक दिवस ईंटरनेट संपुर्ण जगाचा आरसा बनेल."
टीम बर्नर्स - ली (Tim Berners-Lee) - WWW चा शोधकर्ता

टीम बर्नर्स - ली (Tim Berners-Lee ) ने World Wide Web चा शोध लावला. जगातील पहिल्या वेब क्लायेंट आणि सर्वर, हायपर टेक्स्ट, लिंक्स या सर्वांचे श्रेय टीम बर्नर्स - ली याला जाते. सध्या तो  World Wide Web Consortium (W3C) या संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. 

रे टॉमलिंसन (Ray Tomlinson) - ईमेलचा शोधकर्ता

प्रोग्रामर रे टोमलिंसन ला ईमेलचा जन्मदाता म्हणून ओळखले जाते. अगदी सातासमुद्रापार असलेल्या संगणकांशी निरोपांची देवाणघेवाण करणे शक्य झाले ते या अवलियामुळेच. ईमेल मध्ये वापरल्या जाणार्‍या @ या चिन्ह देखिल त्यानेच पहिल्यांदा वापरले. आज जगातील करोडो लोक @ चा वापर दररोज करतात. ईमेल्सचे आपल्या रोजच्या जीवनातील स्थान काय आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाहीच.जार्को ओयकारीने (Jarkko Oikarinen) - Internet Relay Chat (wikipedia)

जार्को ओयकारीने Jarkko Oikarinen या फिनलँड वासियाने पहिल्या real-time online chat tool म्हणजे ऑनलाईन चॅटींगचा शोध लावला. यालाच ईंटरनेट रीले चॅट असेही म्हणतात. १९९१ साली ईंटरनेट रीले चॅट पहिल्यांदा प्रकाशझोतात आली. इराकने कुवैत वर केलेल्या हल्ल्यामध्ये जेव्हा टीव्ही आणि रेडीओ सिग्नल्स बंद करण्यात आले होते तेव्हा तेथील माहिती ईंटरनेट रीले चॅट  मुळेच जगापुढे येत होती.


वार्ड कनिंगहॅम (Ward Cunningham ) - जगातील पहिली विकी (Wiki) 

अमेरीकन प्रोग्रामर वार्ड कनिंगहॅम पहिल्यांदा Online collaboration या संकल्पनेवर आधारीत विकी Wiki) विकसीत केली. संगणक वापरणार्‍या कोणाही व्यक्तीला वेबपेज बनवता व बदलता (create and edit) यावे ही कल्पना त्याने विकी च्या माध्यमातून पुढे आणली. हवाईन भाषेमध्ये "विकी"चा अर्थ जलद quick असा होतो.

सबीर भाटीया Sabeer Bhatia - Hotmail. (wikipedia)

सबीर भाटीयाने Sabeer Bhatia  हॉटमेल या ऑनलाईन ई-मेल क्लायेंटची सुरुवात केली. मायक्रोसॉफ्टने ४०० मिलियन डॉलर्सला हॉटमेल विकत घेतल्यानंतर सबीर भाटीया खर्‍या अर्थाने प्रकाशझोतात आला.  २००९ मध्ये  सबीर भाटीयाने Jaxtyr ही कंपनी विकत घेतली. ईंटरनेट टेलीफोनीच्या क्षेत्रातील ही कंपनी लवकरच Skype वर मात करेल असा त्याला विश्वास आहे.


लॅरी पेज आणि सर्जी ब्रीन (Larry Page and Sergey Brin) - Google. (wikipedia)
लॅरी पेज Larry Page आणि सर्जी ब्रीन  Sergey Brin या जोडीने गुगल हे सर्च इंजिन सुरु केले. त्यांनी जगातील सर्व माहिती एकत्रीत करुन, तिचे नियोजन करुन सर्वांना मोफत उपलब्ध करुन देण्याच्म महत्त्वाचे काम केले आहे. आजच्या घडीला गुगल ही जगातील सर्वात यशस्वी ईंटरनेट कंपनी आहे. गुगल वापरली नाही असा एकही संगणक वापरकर्ता शोधुनही सापडणार नाही.


डेव्हीड फिलो आणि जेरी यांग (David Filo and Jerry Yang) - Yahoo. (wikipedia)

डेव्हीड फिलो  David Filo आणि जेरी यांग  Jerry Yang  यांनी याहू (Yahoo!) या वेब पोर्टलची स्थापना केली. केवळ गंम्मत आणि मनोरंजनाचा भाग म्हणून सुरु झालेली ही वेबसाईट पुढे जगातील सर्वात मोठ्या वेब-प्रॉपर्टीज पैकी एक झाली. जिमी वेल्स (Jimmy Wales) - Wikipedia. (wikipedia)
जिमी वेल्स Jimmy Wales याने २००१ साली विकीपेडीया Wikipedia या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन संदर्भकोषाची सुरुवात केली. जगातील कोणीही व्यक्ती विकीपेडीयामधील माहितीमध्ये भर घालू शकते. जगाचा ज्ञानकोष म्हणून विकीपेडीयाला ऑनलाईन जगतात फार मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विकीपेडीयावरील सर्व ज्ञान मोफत उपलब्ध आहे आणि विकीपेडीयावर एकही जाहिरात दाखविली जात नाही. जगातील हा सर्वात मोठा ज्ञानयज्ञ वाचकांनी दिलेल्या देणगीवर (Donation) चालू आहे. जेफ बेझॉस Jeff Bezos - Amazon. (wikipedia)

जेफ बेझॉस Jeff Bezos याने जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन दुकानाची म्हणजे अ‍ॅमेझॉनची सुरुवात केली. जेफ बेझॉसने ऑनलाईन शॉपींगला जलद आणि एक सुखद अनुभव बनवले. अ‍ॅमेझॉनने नुकताच बाजारात आणलेल्या किंडल (Kindle) या उपकरणामुळे ऑनलाईन पुस्तके वाचण्याच्या पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. मार्क झुकरबर्ग Mark Zuckerberg - Facebook. (wikipedia)

मार्क झुकरबर्ग Mark Zuckerberg   या तरुणाने युनिव्हर्सीटी मधील विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेली फेसबुक ही सोशल साईट आज जगातील सोशल मेडीया नेटवर्कींगची अनभिषीक्त सम्राट म्हणून ओळ्खली जाते. फेसबुकचे ५०० मिलियन्सपेक्षाही जास्त सभासद आहेत. सभासदांची संख्या या मापदंडाने फेसबुक जगातील तिसरा मोठा देश आहे.जॅक डॉर्सी Jack Dorsey  - Twitter. (wikipedia)
जॅक डॉर्सी Jack Dorsey  ने ट्वीटर ही मायक्रो ब्लॉगींग साईट सुरु केली. माहितीचा ज्वालामुखी म्हणता येईल इतक्या प्रचंड प्रमाणात ट्वीटर वर विचारांची आणि माहितीची देवाण घेवाण होते. केवळ १४० अक्षरांच्या माध्यमातून ट्वीटरने जगातील संवाद साधण्याची पद्धती बदलवून टाकली. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या या सोशल साईटने नुकताच सुरुवात केली आहे आणि भविष्यात काही कमाल करुन दाखविण्याची ताकद ट्वीटर मध्ये नक्कीच आहे. मित्रांनो ईंटरनेटचे हे प्रमुख शिल्पकार असले तरी ही यादी इथे संपत नाही. आणखी शिल्पकारांची (दुसर्‍या फळीतील) माहिती घेण्यासाठी आपण पुन्हा या लेखाच्या दुसर्‍या भागात भेटूच !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

यांनी घडवलं ईंटरनेट जगत.... People who changed the world with Internet. यांनी घडवलं ईंटरनेट जगत.... People who changed the world with Internet. Reviewed by Salil Chaudhary on 09:52 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.