सुस्वागतम २०११ - आढावा, माफी, आभार, आवाहन, शुभेच्छा !

आढावा -

२०१० मध्ये आम्ही नेटभेट वर जास्त लेख लिहिले नाहीत. खरेतर दररोज एक लेख लिहत असताना त्या विषयाचा अभ्यास करुन लेख लिहिण्यासाठी सुमारे तीन तास खर्च व्हायचे. लेख लिहिता लिहिता माझेही ज्ञान वाढत असले तरी ते लेखाच्या विषयांपर्यंतच मर्यादित होते. एकुणच काय तर "नेटभेट" मार्फत ज्ञान देताना (!) माझं स्वतःच ज्ञानार्जन थोडे मागे पडत चालले होते. यावर्षी मी Part Time MBA ला प्रवेश घेतल्यामुळे नेटभेटच्या कामासाठी मिळणारा वेळही कमी झाला. आणि म्हणूनच २०१० मध्ये मी लेखनाला थोडा आराम देउन माझ्यातील वाचकाला जास्त वाव दिला. लेख लिहिणे कमी केले असले तरी नेटभेटशी संबंधीत इतर बर्‍याच उपक्रमांवर काम चालु होते. यापí6;की काही उपक्रम अमलांत आणता आले नाहीत, मात्र त्यावर मी खुप वेळ खर्च केला होता. काही उपक्रम मात्र आकारास आले. अजुनही त्यावर काम चालु आहे. नविन वर्षात आमचे नविन उपक्रम आपल्यासमोर येतीलच.

२०१० मध्ये सर्च इंजिन ऑप्टीमाë1;झेशनची (SEO) काही कामे मी हाती घेतली. नेटभेट वर जाहिराती दाखविण्यासाठी मी बर्‍याच व्यावसायिकांना संपर्क साधला होता. जाहिराती जास्त मिळाल्या नाहीत मात्र त्यांपैकी काही जणांनी मला सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन आणि वेबसाईट बनविण्याची कामे दिली. सुरुवातील एक प्रयोग म्हणून मी हे काम स्वीकारले आणि पुर्ण केले. त्यानंतर गेल्या १० महिन्यांमध्ये मी २ वेबसाईट्ससाठी सर्च ईंजिन ऑप्टीमयझेशन, एका प्रकल्पासाठी सोशल मिडीया मार्केटींग आणि 4 वेबसाईट्स बनविण्याची कामे पुर्ण केली. तसेच काही प्रतिष्ठीत व्यक्तींसाठी सोशल मिडीया मार्केटींग आणि त्यांचे ब्लॉग सांभाळण्यासाठी चर्चा चालू आहे. या सर्व कामांचा मला बिलकुल अनुभव नव्हता आणि त्यामुळेच कदाचित मला यामध्ये जास्त रस वाटला आणि जास्त शिकताही आले. (पैसेही मिळाले :-))

माफी -

"गुगल अ‍ॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतून" ही लेखमाला वाचक आणि ब्लॉगरमित्रांना खुप आवडली आणि उपयुक्त ठरली. यामध्ये सांगीतलेल्या युक्त्या वापरुन बर्‍याच मराठी ब्लॉगर्सने अ‍ॅडसेन्स अकाउंट मिळवले असल्याचे त्यांनी अवर्जून फोन करुन, ईमेल लिहून कळवले. ही ल 75;ख मालिका अजुनही पुर्ण झालेली नाही आहे. अ‍ॅडसेन्स अकाउंट मिळविण्यासाठी साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागेल असे गृहीत धरुन मी मुद्दामहून दोन महिने ही लेखमालिका लांबविण्याचे ठरवले होते. मात्र वेळेअभावी अ‍ॅडसेन्ससंबंधी लेख लिहिणे नंतर शक्यच झाले नाही. मात्र २०११ च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये अ‍ॅडसेन्स ची लेखमालिका मी पुर्ण  करेन.

आभार -

नविन लेख लिहिले नसले तरी देखिल २०१० मध्ये नेटभेट.कॉम ची (नेटभेट.कॉम आणि नेटभेटच्या इतर साईट्स मिळून) वाचकसंख्या दुपटीने वाढली आहे. यावर्षी २,६६,२४६ वाचकांनी नेटभेट.कॉमला भेट दिली आणि त्यांनी ११,७१,४८२ (Pageviews) पाने वाचली. या २,६६,२४६ वाचकांपैकी ९८,५०१ वाचक नेटभेट वर पहिल्यांदा आले होते. म्हणजेच १.००.००० नविन लोका 06;पर्यंत आम्हाला यावर्षी पोहोचता आले. यामध्ये नेटभेट.कॉम ही मुख्य साईट आणि नेटभेट ई-पुस्तक लायब्ररी यांचा सिंहाचा वाटा आहे.

नेटभेटला दिलेल्या प्रेमासाठी सर्व वाचकांचे मनापासून आभार !


नेटभेट ई-पुस्तक लायब्ररी मध्ये आतापर्यंत ३५० हून अधिक पुस्तके समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तसेच आता पुस्तकांची विषयवार मांडणी करण्याचे काम चालू आहे. नेटभेट ई-पुस्तक लायब्ररीचे नविन रूप पाहण्यासाठी आणि नविन आलेल्या ई-पुस्तकांचा रसास्वाद घेण्यासाठी आजच http://ebooks.netbhet.com ला भेट द्या.

आवाहन -

२०११ मध्ये पुन्हा नेटभेट.कॉम वरील लेखांची संख्या वाढविण्याकडे आमचा भर असेल. नविन वाचकोपयोगी उपक्रमसुद्धा आपल्याला नक्कीच आवडतील. त्याचसोबत नेटभेट , ईपुस्तक लायब्ररी, ब्लॉगकट्टा, प्रश्नमंच आणि नेटभेट ई-मासिके हे उपक्रम चालू राहतीलच. मराठी वाचनाला उत्तेजन देणारी नेटभेटची पुस्तक भेट योजना यावर्षी खंडीत झाली होती. या योजनेसाठी आम्ही स्पॉन्सर्सच्या शोधात आहोत. महिन्याला तीन मराठी पुस्तके स्पॉन्सर्स करण्याची आपली ईच्छा असल्यास आम्हाला salil@netbhet.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

शुभेच 381;छा -टीम नेटभेट तर्फे आपणा सर्वांना नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा ! हे वर्ष आपणा सर्वांना, मायमराठीला आणि मराठीच्या सर्व लेकरांना सुखासमाधानाचे आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा !

धन्यवाद

सलिल चौधरी


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

सुस्वागतम २०११ - आढावा, माफी, आभार, आवाहन, शुभेच्छा ! सुस्वागतम २०११ - आढावा, माफी, आभार, आवाहन, शुभेच्छा ! Reviewed by Salil Chaudhary on 00:35 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.