Netbhet eMagazine December 2010
मित्रहो, नेटभेट ई-मासिकाच्या डिसेंबर अंकाचे म्हणजेच यावर्षीच्या शेवटच्या अंकाचे प्रकाशन आम्ही आज केले आहे. नेटभेट.कॉम वर सातत्याने दर्जेदार लेखन करणारा आपला ब्लॉगर मित्र प्रथमेश शिरसाट याने नेटभेट ईमासिकाच्या या अंकाचे संपादन केले आहे. प्रथमेश पुढील म्हणजेच जानेवारी २०११ या अंकाचे संपादन सुद्धा प्रथमेश करणार आहे. नेटभेट ई-मासिकाच्या निर्मीतीत हातभार लावल्याबद्दल प्रथमेशचे आणि आपले लेख मासिकामध्ये प्रकाशित करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल ब्लॉगरमित्रांचे मनापासून आभार !

प्रथमेशने लिहिलेले संपादकीय मी येथे देत आहे. नेटभेट ई-मासिक (ऑनलाईन किंवा डाउनलोड करुन) वाचा आणि आपल्या मित्रमंडळींना ईमेलद्वारे जरूर पाठवा. मराठी ब्लॉगर्सना आणि त्यांनी केलेल्या दर्जेदार लेखनाला जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा.

संपादकीय -

 " प्रथमेश, तुला यावेळीच्या नेटभेट या ई मासिकाचे संपादन करायचे आहे", असा मला सलील चौधरी यांचा कॉल आला होता आणि मी त्यांना लागलीच होकार कळवला.नेटभेटचे संपादन करायचे म्हणजे काटेकोरपणे लेख वाचणे हे योगायोगाने आलेच. सलील चा फ़ोन येऊन गेल्यावर ब्लोगवरील भ्रमंती चालू केली. नियमित ब्लॉग वाचन होत असल्यामुळे तसा काही त्रास जाणवला नाही.पण लेखांची निवड कशी करायची हा यक्ष प्रश्न उभा राहीला होता माझ्यासमोर ! कारण सगळेच लेख दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण असे होते. कधी कधी तर वाटत होते की सगळेच लेख निवडावे की काय परंतु लेखन मर्यादा असल्याकारणाने काही संयम आणि बंधने पाळुन लेखांचे अध्ययन करणे महत्त्वाचे होते.

नेटभेट ई मासिकासाठी संपादन करताना अनेक ब्लॉग पाहिले काही जुने होते तर काही नवीन हल्ली हल्लीचे होते अगदी नवेकोरे असे ! प्रत्येकाने आपापल्या शैलीतले खास लिखाण, साहित्य, काव्य,छायाचित्रण, पाककला, चित्रण, ध्वनीमुद्रण, चारोळ्या , गझनी माफ़ करा गझली वगैरे खुप काही दिसले, किती ब्लॉग्ज पाहिले आता आठवत पण नाही ! मराठी ब्लॉगविश्व खरोखरच पुढे येत आहे हे दिसुन येते. प्रत्येक जण काही वेगळे विषय घेऊन किंवा वेगळ्या संकल्पना घेऊन उतरतो या ब्लॉग विश्वात आणि या ब्लॉग परिवाराचा एक भागच बनुन राहतो.   

माझी आणी नेटभेटची गाठभेट योगायोगाने झाली असे म्हणायला काहीच हरकत नाही ! एके दिवशी माझ्या इनबॉक्समध्ये एक ४०-५० पानांचे ई बुक आले. त्यात वैविध्यपूर्ण लेख होते ले वाचत असताना सलिल चौधरींच्या कोणत्या एका दैनंदिन डायरी या विषयावर लिहिलेल्या लेखाकडे नजर गेली. मग मी कुतुहलापोटी नेटभेट.कॉम नक्की पाहण्यासाठी नेटभेट.कॉम वर गेलो तर काय ! माझ्यासमोर इंटरनेट अर्थात महाजालावरील विविध तांत्रिक बाबींवरचे लेख आढळले, त्यात ब्लॊगिंग, संगणकाची सु्रक्षितता तसेच अन्य काही तांत्रिक बाबींबद्दल अफ़ाट माहिती होती. मलाही ही ब्लॉगिंग सोडून इतर गोष्टी माहित होत्या ब्लॉगिंग मी नेटभेट. कॉम मुळेच शिकलो आणि त्याबद्दल मी त्यावरील वैविध्यपुर्ण लेख लिहिणार्‍या सलिलचा आभारी आहे की त्यांनी इतका मोठा माहितीचा खजिना आपल्यापुढे मांडला आहे. मी ही तांत्रिक ज्ञानामध्ये रूची आणि आवड असणारा माणुस आहे, संगणकात नवीन काय बदल होतात कोणकोणती नवीन सोफ़्टवेअर्स उपलब्ध आहेत, काय नवीन अपडेट्स आहे, या आणि यांसरख्या अनेक तांत्रिक लहान सहान बाबींवर मला शोध करायला आवडते. 
नवीन तंत्रज्ञानावर लिहुन आपण इतरांना ही माहिती देऊ शकतो जेणेकरुन त्याचा त्यांच्या दैनंदीन आयुष्यात उपयोग होईल.ही नेटभेट ची संकल्पनाच मुळात मला भावली, आणि मग मी ही नेटभेट. कॉम साठी लिखाण करायचे ठरवल, तसे सलिल ना मेल करुन विचारले असता त्यांनी मला नेटभेट साठी लिहायला सांगितले आणि मग एक आगळावेगळा टेक्नोलिखाण प्रकार नकळत माझ्याकडून होत गेला.जवळपास २२-२३ लेख अद्याप मी दिलेले आहेत, ते कितपत वाचकांना भावले / पटले हे मी सांगण्यापेक्षा त्या लेखांना मिळालेल्या किंवा न मिळालेल्या प्रतिक्रियाच सांगुन जातात. संगणकाच्या माहितिबद्दल तुलनात्मक प्रगती पाहता संगणकाविषयी मराठी जगत पाठी नाही असे म्हटले तरी ते फ़ारसे प्रगत आहे असेही ठामपणे नाही म्हणता येणार. 
नेटभेट. कॉम द्वारे सलिल आणि प्रणव यांनी नेमके हेच महत्त्वाचे योगदान दिले आहे. तंत्रज्ञानावरचे लेख शिवाय इतरही काही वैविध्यपुर्ण लेख, ई पुस्तकांचा खजिना, विविध उपक्रम यांतुन नेहमीच नेटभेट. कॉम ने आपला एक वेगळा ठसा या मराठी ब्लॉगविश्वात उमटवला आहे ही माझ्यासाठीच नव्हे तर तमाम मराठी ब्लॉग वाचकांसाठी अतिशय अभिमानाची अशी बाब आहे.
नेटभेटचे संपादन करताना ब्लॉग लेखकांच्या अनेक शैली उलगडत गेल्या. नेटभेटचे संपादन करताना एक आगळा वेगळा आनंद मिळाला. सलिल ने मला ही सुवर्णसंधी दिल्याबद्दल मी त्यांचा मन:पुर्वक आभारी आहे. या अंकात कोणते लेख आहेत ते अंक वाचताना आपल्या लक्षात येईलच !

नेटभेट ई-मासिक ऑनलाईन वाचा -
http://magazine.netbhet.com


नेटभेट ई-मासिक डाउनलोड करा -
http://goo.gl/tadcM


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Netbhet eMagazine December 2010 Netbhet eMagazine December 2010 Reviewed by Salil Chaudhary on 10:29 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.