नेटभेट मराठी टीशर्ट्स (Marathi t shirts by Netbhet)

Marathi t shirts

नेटभेटच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!


दिवाळी आपल्या जीवनात नेहमीच खुप आनंद आणि उत्साह घेउन येते. नेटभेटसाठीही ही दिवाळी अत्यंत आनंददायी आणि उत्साहाने भरलेली आहे. टीम नेटभेट यावर्षी एका नविन प्रकल्पाची सुरुवात करत आहे. आणि या साठी दिवाळी पाडव्यापेक्षा आणखी चांगला मुहूर्त कोणता लाभला असता?


मित्रहो, नेटभेटचे ई-कॉमर्स साईटचे स्वप्न या दिवाळीला प्रत्यक्षात उतरले आहे. ऑनलाईन जगात वावरणार्‍या मराठी नेटीझन्सना नक्की आवडतील असे मराठी टीशर्ट्स (Marathi slogan T shirts) आम्ही या साईटद्वारे आपल्या भेटीस आणत आहोत. गेल्या काही वर्षात कॅलीग्राफी आणि स्लोगन टीशर्ट्स हे तरुणाईला व्यक्त होण्यासाठी एक उत्तम माध्यम ठरले आहे. नेटभेट ने प्रस्तुत केलेले टीशर्ट्स जगभरातील मराठी जनांना नक्की आवडतील आणि नेटभेटच्या इतर प्रकल्पांप्रमाणेच नेटभेट स्टोअरला देखिल चांगला प्रतिसाद मिळेल याची आम्हांला खात्री आहे.


नेटभेट स्टोअर ला http://store.netbhet.com या लिंकवरुन भेट देता येईल. या स्टोअर द्वारे आम्ही e-tailing मध्ये प्रवेश केला असला तरी गेल्या एक वर्षभरापासून आम्ही टी-शर्टसच्या व्यवसायात आहोत. नेटभेट ला एक उत्कृष्ट clothing brand बनविण्याचा आमचा मानस आहे. दर महिन्याला आम्ही नविन उत्तमोत्तम डीझाईन्स आपल्याकरीता घेऊन येणार आहोत.


भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स साईट्सपैकी एक असलेल्या infibeam.com बरोबर नेटभेटने टाय-अप केले असून त्यांच्या सहकार्याने आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे आम्ही ग्राहकांना उत्कॄष्ट online shopping experience देऊ शकू असा आम्हाला विश्वास आहे.


सध्या नेटभेट स्टोअर फक्त भारतीय ग्राहकांसाठीच खुले करण्यात आले आहे. परदेशी राहणार्‍या मराठीजनांना खरेदी करावयाची असल्यास आम्हाला admin@netbhet.com या ईमेल पत्त्यावर संपर्क करावा.


मराठी कॅलीग्राफी किंवा कमर्शिअल आर्टीस्टना आम्ही नेटभेटचे टी-शर्ट्स डीझाईन करण्यासाठी आमंत्रीत करत आहोत. सर्व मराठी डीझायनर्ससाठी नेटभेट मराठी टीशर्ट्सचा प्रकल्प उत्पन्नाचे एक चांगले साधन म्हणून पुढे यावा अशी आमची इच्छा आणि प्रयत्न आहे.


तेव्हा नेटभेटच्या सर्व वाचकांना http://store.netbhet.com ला भेट देण्याचे आणि खरेदी करण्याचे आग्रहाचे आमंत्रण !!


नेटभेट स्टोअरचे विजेट  -

store.Netbhet.comआपला प्रतिसाद आणि प्रतीक्रीया खाली कमेंट्स मध्ये अवश्य लिहा किंवा आम्हाला admin@netbhet.com या ईमेल पत्त्यावर कळवा.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

नेटभेट मराठी टीशर्ट्स (Marathi t shirts by Netbhet) नेटभेट मराठी टीशर्ट्स (Marathi t shirts by Netbhet) Reviewed by Salil Chaudhary on 23:46 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.