जीमेल मध्ये ईमेल आपल्याला पाहिजे त्या वेळी पाठवा

जीमेल मध्ये ईमेल आपल्याला पाहिजे त्य वेळी पाठवता येण्यासाठी एक सुविधा नुकताच तयार झाली आहे. Rightinbox असे या सेवेचे नाव आहे.

समजा तुम्हाला परदेशी कोणाला ईमेल पाठवायची असेल तर त्या व्यक्तीला ती ईमेल त्यांच्या वेळेनुसार मिळेल अशाप्रकारे schedule करता येते. Rightinbox हे एक छोटेखानी ब्राउजर एक्स्टेंशन आहे. Google chrome आणि firefox या ब्राउजर्स मध्ये हे एक्स्टेंशन वापरता येते.

१. www.rightinbox.com या साईटवरुन हे एक्स्टेंशन डाउनलोड करुन घ्या.


२. ब्राउजर एक्स्टेंशन डाउनलोड करुन झाल्यानंतर install करण्यासाठी परवानगी द्या.


३. Rightinbox इंस्टॉल करा.

४. इंस्टॉलेशन झाल्यानंतर ब्राउजर बंद करुन पुन्हा सुरु करा
५. आता gmail मध्ये लॉग्-इन करा. येथे सदर एक्स्टेंशन वापरण्यासाठी Gmail ला परवानगी द्या.


६. बस. आता आपल्या जीमेल बॉक्स मधून पाहिजे त्या वेळेला/तारखेला ईमेल पाठवता येईल.


जीमेल मध्ये नविन ईमेल लिहिताना (Compose) send च्या ऐवजी Send now आणि Send Later असे दोन पर्याय दिसतील. यापैकी Send later या बटणावर क्लिक करुन ईमेल कधी पाठवायची ते तुम्ही ठरवु शकता.Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

जीमेल मध्ये ईमेल आपल्याला पाहिजे त्या वेळी पाठवा जीमेल मध्ये ईमेल आपल्याला पाहिजे त्या वेळी पाठवा Reviewed by Salil Chaudhary on 01:58 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.