ऑनलाईन शिक्षणाचा राजमार्ग - भाग १/३


ज्ञानार्जनाला सुरुवातीपासून अनन्यसाधारण महत्त्व लाभले आहे. सतत शिकत राहण्याच्या वृत्तीमुळेच माणसाची प्रगती झालेली आहे. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला आणि ज्ञानाला सर्वोत्तम संपत्ती म्हणून ओळखलं जातं.

बदलत्या काळाबरोबर ज्ञानाचं महत्त्व अबाधित राहिलं तरी ज्ञानार्जनाच्या पद्धतींमध्ये मात्र अमुलाग्र बदल झालाय. कॉलेज आणि विद्यापीठांच्या चार भिंतींमध्येच बंदिस्त असलेलं ज्ञान आता संगणकाच्या मदतीने मुक्त झालं आहे. Online Education ने मोठी मजल मारलेली आहे. सर्वच मुख्य विद्यापीठांनी ऑनलाईन शिक्षणाकडे मोर्चा वळविला आहे. वेब २.० च्या क्रांतीमध्ये अनेक असे Online courses उपलब्ध झाले आहेत. आणि यापैकी बरेच courses मोफत उपलब्ध आहेत. आपल्याला जमेल तसा वेळ देऊन आपल्या गतीने हे courses पूर्ण करता येतात.

आज मी तुम्हाला अशा काही वेबसाईट्सची माहिती देणार आहे ज्यांद्वारे ज्ञानाची असंख्य कवाडं आपल्यासमोर उघडी होतील. या वेबसाईट्स वर असलेले courses हे जगभरातील नामांकीत वियापीठांनी / प्राध्यापकांनी बनविलेले आहेत. विविध देशांतील शिक्षकांचा सहभाग असल्याने एकंदरीत या courses ची गुणवत्ता देखिल वाखाणण्याजोगी आहे. (मी स्वतः आतापर्यंत असे चार online courses याच साइट्सच्या माध्यमातून पूर्ण केले आहेत.)

Khan Academy (खान अ‍ॅकेडमी) -

खान अ‍ॅकेडेमी हे नाव आपल्यापर्यंत कधीतरी पोहोचले असेलंच. २००४ साली सलमान खान ("दबंग" खान नव्हे !) या बोस्टन स्थित तरुणाने विविध विषयांवरील माहिती देणारे व्हीडीओ youtube या साईटवर अपलोड करायला सुरुवात केली. सुरुवातीचे काही व्हीडीओ त्याने आपल्या भाच्यांना मदत म्हणून youtube वर अपलोड केले होते. त्या व्हीडीओजना इतरांकडूनही खुप प्रतीसाद मिळाला आणि तेव्हाच सलमानने सर्वांना मोफत ज्ञान देण्याच्या उद्देशाने खान अ‍ॅकेडमीची सुरुवात केली. आज खान अ‍ॅकेडमीने विविध विषयांवरील ४००० हून अधिक व्हीडीओज सर्वांना मोफत उपलब्ध करुन दिले आहेत. गणित, संख्याशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र, भाषा, संगणक, खगोल, समाजशास्त्र, भूगोल, जैव, वैद्यक अशा अनेक विषयांवरील ज्ञान या व्हीडीओज मुळे आता सर्वांसाठी खुले झाले आहे.

केवळ विद्यार्थीच नव्हे तर अनेक शिक्षकही khan Academy चे व्हीडीओ शाळेत्/कॉलेज मध्ये शिकवण्यासाठी वापरतात. आता  khan Academy मध्ये त्या त्या विषयांबद्दल लगेचच प्रश्नोत्तरे विचारण्याची सोयही केलेली आहे. त्यामुळे विषय आपणांस किती समजला आहे हे लगेचच कळते. शिक्षकांनाही वर्गात मुलांना कितपत विषय समजला आहे हे लगेचच पडताळून पाहता येते. प्रत्येक विद्यार्थ्याचा एक आलेखच शिक्षकांसमोर मांडण्याची सोय khan Academy ने केली आहे.

गेल्या वर्षी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरीबद्दल khan Academy ला गुगलने १० लाख डॉलर्सचे पारितोषिक दिले.

EdX (एडएक्स) -


EdX ही खान अ‍ॅकेडमी पेक्षा वेगळी साइट आहे. यामध्ये प्रत्येक Course ची नीट मांडणी केलेली असते. आणि प्रत्येक Course सुरु करण्याचा आणि पुर्ण करण्याचा कालावधी ठरलेला असतो. Massachusetts Institute of Technology (MIT), Harvard university, University of Toronto, Austrelian National University अशा नामांकीत युनिव्हर्सीटीजने बनविलेले courses यामध्ये समाविष्ट केलेले असतात. विषयांची संख्या खुपच कमी असली तरी गुणवत्ता मात्र अत्युच्च पातळीची असते.

Coursera (कोर्सेरा) -


Coursera ही साईट म्हणजे खान अ‍ॅकेडमी आणि एडएक्स यांचा सुवर्णमध्य साधणारी आहे. जगभरातील ४० हून अधिक युनिव्हर्सीटीजतर्फे दिले जाणारे ऑनलाईन कोर्सेस या साईटवर उपल्ब्ध करुन देण्यात आलेले आहेत. ऑनलाईन कोर्सेस साठी ही माझी सर्वात आवडती साईट आहे. सुमारे १० लाखाहुन अधिक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत coursera चा फायदा घेतला आहे.


Canvas Network (कॅनव्हास नेटवर्क) -


Canvas Network ही साईट या क्षेत्रात काहीशी नविन आहे. पण तरीदेखिल coursera च्या खालोखाल Canvas Network ही माझी आवडती साईट आहे. विविध विषयांवरील कोर्सेस या साईटवर मांडण्यात आलेले आहेत. Canvas Network मध्ये विषयांची मांडणी आणि एकुणच शिकण्या-शिकवण्याची पद्धती आकर्षक आहे. जगभरातील वेगवेगळ्या देशांचे लोक एकत्र एका वर्गात शिकत आहेत ही भावना Canvas Network मध्ये शिकत असताना अनुभवायला मिळते. कोर्सचं पुर्ण मटेरीयल एकत्र उपलब्ध करुन न देता, टप्प्या टप्प्याने दिले जाते. asaaignments, case studies, peer evaluation, group work यामुळे खरोखरीच कॉलेजची आठवण होते.

Udacity (युडॅसीटी ) -


 Udacity ही साईट मुख्यत्वेकरुन संगणक विज्ञान (Computer science)  मधील कोर्सेस उपलब्ध करुन देते. काठीण्यपातळीनूसार beginner, intermidiate आणि Advanced अशी कोर्सेसची वर्गवारी येथे केलेली आहे.

युडॅसीटी चे forum देखिल खुप चांगले आहे. येथे विद्यार्थी त्यांच्या सहपाठींसोठींचर्चा करु शकतात.


Academic Earth (अ‍ॅकेडेमीक अर्थ) -


Academic Earth या वेबसाईटवर तुम्हाला अनेक व्हीडीओ लेक्चर्स मिळतील. हे सर्व लेक्चर्स pre-recorded आहेत.

मित्रांनो ऑनलाईन शिक्षण उप्लब्ध करुन देणार्‍या या काही प्रमुख साईट मी येथे नमूद केल्या. या व्यतीरीक्त ऑनलाईन शिक्षणाचे आणखीही अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यांच्याबद्दल माहिती आपण पाहुया पुढील लेखात. तोपर्यंत वर दिलेल्या साईट्सपैकी एका तरी कोर्सला तुम्ही सुरुवात केलेली असेलच !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

ऑनलाईन शिक्षणाचा राजमार्ग - भाग १/३ ऑनलाईन शिक्षणाचा राजमार्ग - भाग १/३ Reviewed by Salil Chaudhary on 11:06 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.