फेसबुक, ट्विटर आणी गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा

फेसबुक, ट्विटर आणी गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा

फेसबुक, ट्विटर, गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा

तुम्हाला युट्युब माहिती आहे का? नक्कीच बहुतेक वाचकांचे उत्तर हो असेच असणार आहे, गुगलचे व्हिडीओ होस्ट करण्याची सुविधा देणारे सर्वाधिक लोकप्रिय असलेले संकेतस्थळ म्हणजे युट्युब होय. तुम्ही अनेक संकेतस्थळांवर किंवा ब्लॉगवर युट्युबवर अपलोड केलेले व्हिडीयोज पाहू शकता, पण तुम्हाला कदाचित जाणून आश्चर्य वाटेल कि युट्युबवरील व्हिडीओ कोणत्याही संकेतस्थळावर दाखवता येतात म्हणजेच एखादा व्हिडियो पाहण्यासाठी युट्युबच्या संकेतस्थळावर जाण्याची काहीच आवश्यकता नसते, एम्बेड (Embed) सुविधा वापरून आपण अशा प्रकारे व्हिडीओ कोणत्याही संकेतस्थळावर दाखवू शकतो त्यासाठी दुवा देण्याचीही गरज पडत नाही.

आजचा विषय हा  युट्युब बद्दल नसून फेसबुक आणी ट्विटर वरील पोस्ट (म्हणजे स्टेट्स, फोटो, ट्वीट) इत्यादी गोष्टी कशा पद्धतीने एम्बेड करता येतात ते जाणून घेण्याबद्दल आहे.

सर्वात आधी आपण एम्बेड सुविधेचे फायदे पाहुयात :

 1. एम्बेड मुळे वाचकांचा वेळ वाचतो, जी पोस्ट एम्बेड केली आहे ती वेगळ्या संकेतस्थळावर जाऊन पाहण्याऐवजी तुमच्याच संकेतस्थळावर किंवा ब्लॉग पोस्टमध्ये मिळाली कि वेगळ्या संकेतस्थळावर जाण्याची आवश्यकता नसते.
 2. तुम्ही तुम्हाला आवडलेली इतरांच्या पोस्ट्स कॉपीराईट कायद्याचा भंग न करता तुमच्या ब्लॉगवर एम्बेड करू शकता म्हणजेच एखादी पोस्ट दुसऱ्याच्या मालकीची असली तरीही तुमच्या ब्लॉगवर दिसू शकते अर्थात संबंधित व्यक्तीचे नावही त्या पोस्टमध्ये एम्बेड होते.

महत्वाचे :

 • तुम्ही तुम्हाला आवडलेली इतरांच्या पोस्ट्स जरी एम्बेड करू शकत असला तरीही संबंधित पोस्टची प्रायवसी सेटिंग पब्लिक असायला हवी, म्हणजेच तुमच्या एखाद्या फेसबुक मित्राने फेसबुक पोस्टची सेटिंग फक्त मित्रांना पाहता येईल अशी ठेवली तर ती पोस्ट फक्त तुम्हालाच दिसेल कारण तुम्ही त्या व्यक्तीच्या फ्रेंड लिस्ट मध्ये आहात पण जर तुम्ही तीच पोस्ट एम्बेड करून तुमच्या किंवा इतर संकेतस्थळावर जोडलीत तर ती इतर लोकांना दिसणार नाही कारण ते लोक पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीच्या फ्रेंड लिस्ट मध्ये जोडलेले नाहीत. 
 • तुमच्या पोस्ट्स ह्या एम्बेड करता याव्यात कि नाही यासाठी तुम्हीदेखील प्रायवसी सेटींग्स ठरवून तुमच्या पोस्ट्स ह्या फक्त मित्रांपुरत्या मर्यादित ठेऊ शकता.. 

फेसबुकवर पोस्टसाठी एम्बेड सुविधा कशी वापराल : 1. तुमच्या फेसबुक खात्यावर लॉग इन व्हा.
 2. आता तुम्हाला जी पोस्ट एम्बेड करायची आहे त्या पोस्ट समोरील बाणावर क्लिक करा.
 3. Report/mark as spam च्या खालील Embed post वर क्लिक करा.


फेसबुक, ट्विटर, गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा


फेसबुक, ट्विटर, गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा

जर एखादा फोटो एम्बेड करायचा असेल तर :

१) तुम्हाला जो फोटो एम्बेड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करा,

फेसबुक, ट्विटर, गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा

२) आता त्याच्या ऑप्शन्स वर क्लिक करा.. त्यानंतर एम्बेड पोस्ट (embed post) वर क्लिक करा..

फेसबुक, ट्विटर, गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा

फेसबुक, ट्विटर, गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा


४) आता तुम्हाला एक एच.टी.एम.एल कोड दिसेल तो कॉपी करून तुम्हाला पोस्ट जिथे एम्बेड करायची आहे तिथे पेस्ट करा. अभिनंदन.. तुमची पोस्ट यशस्वीपणे एम्बेड झाली आहे पण सेव्ह करायला विसरू नका.

एम्बेड केलेली पोस्ट

एम्बेड केलेला फोटो
तुमच्या पोस्ट्स ह्या फक्त मित्रांपुरत्या मर्यादित ठेवण्यासाठी म्हणजेच तुमच्या पोस्ट एम्बेड करता येऊ नयेत यासाठी सर्वप्रथम तुमची पोस्ट लिहून झाली कि फोटोत दिसत असल्याप्रमाणे पब्लिक वर क्लिक करून फ्रेंड्स सिलेक्ट करा आणी त्यानंतर पोस्ट करा.

फेसबुक, ट्विटर, गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा


गुगल प्लसवरील पोस्टसाठी एम्बेड सुविधा कशी वापराल :


१) तुमच्या गुगल प्लस खात्यावर लॉग इन व्हा.
२) आता तुम्हाला जी पोस्ट एम्बेड करायची आहे त्याच्या ऑप्शन्स मध्ये एम्बेड वर क्लिक करा.

फेसबुक, ट्विटर, गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा

३) आता तुम्हाला एक एच.टी.एम.एल कोड दिसेल तो कॉपी करून तुम्हाला पोस्ट जिथे एम्बेड करायची आहे तिथे पेस्ट करा. अभिनंदन.. तुमची पोस्ट यशस्वीपणे एम्बेड झाली आहे पण सेव्ह करायला विसरू नका.

फेसबुक, ट्विटर, गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा

एम्बेड केलेली पोस्ट
ट्विटरवरील पोस्टसाठी म्हणजेच ट्वीट एम्बेड सुविधा कशी वापराल :


१) तुमच्या ट्विटर खात्यावर लॉग इन व्हा.
२) आता तुम्हाला जी पोस्ट म्हणजेच ट्वीट एम्बेड करायची आहे त्याच्या खाली More वर क्लिक करा आणी आता Embed Tweet वर क्लिक करा.

फेसबुक, ट्विटर, गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा

३) आता तुम्हाला एक एच.टी.एम.एल कोड दिसेल तो कॉपी करून तुम्हाला ट्वीट जिथे एम्बेड करायची आहे तिथे पेस्ट करा. अभिनंदन.. तुमची ट्वीट यशस्वीपणे एम्बेड झाली आहे पण सेव्ह करायला विसरू नका.

फेसबुक, ट्विटर, गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा

एम्बेड केलेली पोस्टतुम्ही एम्बेड केलेल्या पोस्ट जर दुसऱ्या व्यक्तींनी लिहिलेल्या असतील आणी त्यांनी जर त्या काढून टाकल्या तर लगोलग तुम्ही जिथे पोस्ट एम्बेड केल्या असतील तिथून दिसेनाश्या होतील मग आता एम्बेड जरूर वापरा आणि इतरांचा वेळ वाचवा. .

+ यशोधन वाळिंबे
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

फेसबुक, ट्विटर आणी गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा फेसबुक, ट्विटर आणी गुगल प्लसवर वापरा एम्बेड (Embed) सुविधा Reviewed by Salil Chaudhary on 01:00 Rating: 5
Powered by Blogger.