“Pocket App” म्हणजे काय आणि ते कसे वापरावे ?


वाचकहो, आज आपण एका "अल्पमोली बहुगुणी" अशा अप्लीकेशनची (Application) माहिती घेणार आहोत. अप्लिकेशन एकदा वापरल्यानंतर आपण याआधीच हे app का वापरले नाही याची तुम्हाला खंत वाटेल. या app चे नाव आहे "पॉकेट (Pocket)". जरा विचित्र नाव वाटेल पण हे नाव अतिशय समर्पक आहे. खरेतर पॉकेटचे आधीचे नाव होते "Read it later". पण वर्षभरापुर्वी त्यांनी जुने नाव टाकून हे नवे नाव धारण केलं. असो, नामपुराण पुरे झाले आता आपण पाहुया "पॉकेट" हे app काय आहे आणि ते कसे वापरावे.

नेटवर भ्रमंती करत असताना आपल्याला अनेकदा काही रोचक/ माहितीपूर्ण लेख किंवा वेबपाने दिसतात परंतु वेळेअभावी तेव्हा ते वाचता येणे आपल्याला शक्य नसते. अशा वेळेस आपण त्या पानाची लिंक बुकमार्क (Bookmark) करून ठेवतो किंवा ती लिंक स्वत:ला इमेल करतो किंवा जुन्या पद्धतीनुसार कागद पेन घेऊन लिहून ठेवतो. खरेतर हे सर्व प्रकार वेळखाऊ आहेत. आणि आपण जमा केलेल्या या लिंक इतस्तत: विखुरलेल्या असतात. पॉकेट app या अडचणी पासून मुक्तता करते.

केवळ एक बटण दाबून आपल्याला हवी ती पाने आपण पॉकेटमध्ये साठवू शकतो. हे क्लाऊड app आहे त्यामुळे आपण साठवून ठेवलेल्या लिंक इंटरनेट वरून कधीही कोठेही पाहू शकतो. म्हणजे Mobile, Laptop, Desktop, Tablet कुठेही आपण या लिंक्स पाहू शकतो. प्रत्येक लिंक साठवून ठेवताना (सेव्ह करताना) विशिष्ट नाव (tag) देऊन साठवून ठेवू शकतो त्यामुळे नंतर आपल्याला हवी असलेली लिंक शोधणे फार सोपे जाते. थोडक्यात पॉकेट हे app आपला दुसरा मेंदूच आहे म्हणाना !

आणि एवढे सगळे करणारे हे अप्लिकेशन पूर्णपणे मोफत आहे. हे अप्लिकेशन वापरण्यासाठी गुगल क्रोम, फायरफॉक्स आणि सफारी या वेबब्राउजर्ससाठी एक्स्टेंशन उपलब्ध आहे. तसेच Android आणि Apple या मोबाईलसाठी app देखील उपलब्ध आहे.

पॉकेट app वापण्यासाठी सर्वप्रथम www.getpocket.com येथे जाऊन आपले मोफत खाते उघडा.त्यानंतर खालील व्हीडीओ मध्ये दाखविल्याप्रमाणे क्रोम एक्स्टेंशन install करा आणि पॉकेट वापरायला सुरुवात करा.मराठीतून संगणक, Microsoft excel आणि इंटरनेट बद्दल टिप्स देणारे अनेक व्हीडीओ आम्ही Youtube वर अपलोड केले आहेत. ते पाहण्यासाठी आणि Subscribe करण्यासाठी Netbhet TV या Youtube Channel ला अवश्य भेट द्या.


(नेटभेट वरील हा आणि इतर अनेक माहितीपूर्ण लेख आपल्याला आवडले असल्यास कृपया हा ज्ञानयज्ञ सुरु ठेवण्यासाठी आम्हास मदत करा. धन्यवाद


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


“Pocket App” म्हणजे काय आणि ते कसे वापरावे ? “Pocket App”  म्हणजे काय आणि ते कसे वापरावे ? Reviewed by Salil Chaudhary on 10:14 Rating: 5
Powered by Blogger.