नविन सोशल नेटवर्क - Tsu.co - भाग १

नमस्कार वाचकहो, आपण वर्क फ्रोम होम किंवा इंटरनेटवर कॉपी-पेस्ट द्वारे उत्पन्न अशा आशयाच्या जाहिराती नक्कीच कुठे न कुठे वाचतो, पण प्रत्यक्ष भेट घेतल्यावर मामला वेगळा आहे हे लक्षात येतं. असो, तुम्ही जर नेटभेटचे नियमित वाचक असाल तर फेब्रुवारी २०१२ मध्ये प्रसिध्द झालेला “फेसबुकचे उत्पादन – आपण” हा लेख वाचला असेल. यात “फेसबुकने आपली ही संपत्ती वापरकर्त्यांसोबत वाटून घ्यावी अशी एक विचारधारा निर्माण होऊ लागली आहे.” ह्याबाबत उल्लेख झाला होता आणी “जनमानसात अशी लाट उसळली तर फेसबुकचे होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही” असेही नमूद केले गेले होते. नेमकी हीच संकल्पना आता वास्तवात अवतरलीय, आणी या संकल्पनेचा पहिला प्रकल्प सुरु झालाय, Tsu (उच्चार सु किंवा त्सु असा होतो) ह्या नावाने सुरु झालेला हा प्रकल्प फेसबुकचा नसून Sebastian Sobczak, Drew Ginsburg, Thibault Boullenger, आणी Jonathan Lewin या मंडळींनी एकत्र येऊन ह्याची सुरुवात केलीय. आज आपण याबाबतच माहिती घेणार आहोत.
नेमकी संकल्पना काय आहे?
आपण आपला बहुमुल्य वेळ फेसबुक वर घालवतो, त्याबदल्यात झुकरबर्ग आणी कंपनी अब्जावधी डॉलर्स कमावते. केवळ २०१३ या वर्षात फेसबुकने ७.८७ बिलियन अमेरिकन डॉलर्सचे (म्हणजे जवळपास ८०० करोड रुपये) उत्पन्न मिळवले आणी २०१४ मध्ये देखील फेसबुकच्या उत्पन्नाचा आलेख चढताच आहे. थोडक्यात काय तर आपण रोज फेसबुक वापरतो आणी फेसबुकच्या आर्थिक संपदेत भर घालतो. याबदल्यात आपल्याला लाईक, कमेंट्स आणी इंटरनेट व वीज बिलाशिवाय काही मिळत नाही पण आता हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली आहे. Tsu हे नवीन संकेतस्थळ ते वापरणाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा ९०% भाग देते. Tsu वापरण्यासाठी जवळपास फेसबुक सारखेच आहे पण Tsu  ह्या संकेस्थळावर अशी प्रणाली कार्यान्वीत केली गेली आहे की प्रत्येक  जाहिरातीद्वारे आलेले ९०% उत्पन्न थेट वापरकर्त्यांला दिले जाते. होय, जाहिरातींमधून मिळवलेल्या उत्पन्नापैकी १० टक्के रक्कम संकेस्थळाच्या खर्चासाठी आणी देखभालीसाठी बाजूला काढतात आणी ९०% उत्पन्न वापरकर्त्यांमध्ये वाटले जाते म्हणजे जी रक्कम फेसबुक स्वतःकडेच ठेवून घेते ती रक्कम Tsu  आपल्याला देते.
सध्या जगभरातून सु ला मिळणारा प्रतिसाद

सध्या जगभरातून सु ला मिळणारा प्रतिसाद काहीसा असाच आहे


Tsu ह्या संकेतस्थळाने अल्पावधीतच लोकप्रियता कमवायला सुरुवात केली आहे, १४ ऑक्टोबरला सुरु झालेल्या संकेतस्थळाने पहिल्या ५ आठवड्यातच १० लाख वापरकर्त्यांचा टप्पा गाठला आहे (फेसबुकला यासाठी १० महिने लागले होते). दिवसेंदिवस यात झपाट्याने वाढ होत आहे  आणी जगातील करोडो संकेतस्थळांपैकी सर्वाधिक लोकप्रिय ३,७०० हजार संकेतस्थळांमध्ये जागा मिळवली आहे, आपल्या भारतात देखील लाखो संकेतस्थळांमध्ये सु चा क्रमांक पहिल्या हजारात म्हणजे ९९७ वा लागतो आणी दिवसेंदिवस सु अव्वलस्थानी सरकत आहे. आंतरराष्ट्रीय वापरकर्त्यांमध्ये १८.७% अमेरिकन, १५.६% भारतीय आणी ८.९% जपानी लोकं आहेत शिवाय ब्राझील ऑस्ट्रेलिया या देशातही सु चांगलेच लोकप्रिय झाले आहे. पहिल्या दोन महिन्यातली हि प्रगती लक्षणीय म्हणावी लागेल.

तात्विक माहिती पुरे, आता आपण सु द्वारे म्हणजेच ऑनलाईन उत्पन्न कसे मिळवता येईल हे बघुयात.
समजा तुम्ही फेसबुकवर जसा फोटो, व्हिडियो किंवा स्टेट्स टाकता तसे सु वर टाकलेत तर सु तुमच्या मित्र परिवाराला साईडबार मध्ये जाहिराती दाखवेल (फेसबुकवर बाजूला दिसतात तशा) आणी जाहिरातींमधून समजा १०० डॉलर्स जमा झाले तर सु त्यांचा १०% वाटा काढून घेईल आणी उरलेले ९० डॉलर्स तुमच्या नेटवर्क मध्ये वाटले जातील.

चित्र मोठं करण्यासाठी चित्रावर टिचकी द्या

ऑनलाईन उत्पन्न कसे मिळवालं? | भाग १


म्हणजे तुम्हाला ९० डॉलरच्या अर्धी रक्कम म्हणजे ४५ डॉलर्स मिळतील आणी उर्वरित ४५ डॉलर्स तुमच्या नेटवर्क मध्ये वाटले जातील.

तुम्ही कंटेंट निर्माते आहात म्हणून तुम्हाला .
५०% रक्कम = ४५ डॉलर्स

समजा क या व्यक्तीने तुम्हाला बोलावलेले आहे म्हणून त्यांना 
३३% रक्कम = ३० डॉलर्स

समजा ब या व्यक्तीने क ला बोलावलेले आहे म्हणून त्यांना 
११% रक्कम = १० डॉलर्स

समजा अ या व्यक्तीने ब ला बोलावलेले आहे म्हणून त्यांना 
५% रक्कम = ३ डॉलर्स 


आणी रक्कम संपेपर्यंत ती वाटली जाईल..

तुमच्या खात्यामध्ये १०० डॉलर्स (६००० रुपये) जमा झाले की ते चेक द्वारे मागवता येतात.

नुकताच सु वापरकर्ता केविन हिंकल या व्यक्तीला मिळालेला चेक.. दिनांक - १४-११-१४

केविन हिंकल या व्यक्तीला मिळालेला चेक
सु वर खाते कसे उघडाल?
सु वर थेट खाते उघडता येत नाही त्यासाठी कोणाचेतरी आमंत्रण लागते. सु वर खाते उघडण्यासाठी इथे टिचकी द्या..किंवा Tsu.co या दुव्यावर जाऊन Marathi हा शॉर्टकोड वापरून खाते उघडा. फेसबुक खाते उघडण्यासाठी जसा फॉर्म आहे तसाच फॉर्म भरून खाते तयार करता येते. अधिक माहितीसाठी खालील चित्रफीत पहा.सु वापरण्यासाठी अगदी फेसबुक सारखेच आहे पण तरीही त्यात कमी अधिक सुविधा आहेत, त्या सुविधा कोणत्या, सु वर उत्पन्न कसे वाढवता येते, सु वापरताना लक्षात घ्यायच्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या,  याशिवाय सु सामाजिक उप्रकमाला देखील कशा प्रकारे हातभार लावत आहे हे आपण पाहुयात पुढील भागात.

+ यशोधन वाळिंबे

(नेटभेट वरील हा आणि इतर अनेक माहितीपूर्ण लेख आपल्याला आवडले असल्यास कृपया हा ज्ञानयज्ञ सुरु ठेवण्यासाठी आम्हास मदत करा. धन्यवाद


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

नविन सोशल नेटवर्क - Tsu.co - भाग १ नविन सोशल नेटवर्क - Tsu.co - भाग १ Reviewed by Salil Chaudhary on 07:50 Rating: 5
Powered by Blogger.