गुगलच्या सहाय्याने आपल्या हरवलेल्या Android फोनचा ठावठिकाणा शोधा !

"फोन हरवणे" हे आपल्या सर्वांसोबत कधी ना कधी होतच. कधी ऑफिसमध्ये कधी घरी, रेस्टॉरंट मध्ये आपण फोन विसरतो आणि नंतर लक्षात आल्यावर शोधाशोध सुरु करतो. सोफा, कपाट, टेबलवर शोधाशोध सुरु होते आणि कुठे कुठे फोन घेऊन गेलो होतो त्याची मनात जंत्री सुरु होते.

गुगलने Android फोन वापरणाऱ्या सर्वांसाठी यावर एक उपाय उपलब्ध करून दिला आहे. यासाठी फक्त आपल्या Android मोबाईलवर latest Google search App असणे गरजेचे आहे. 

आपल्या Android फोनचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आता आपण गुगल सर्च वापरू शकतो. गुगल सर्च मध्ये जा आणि गूगलला विचारा "where is my phone?" (माझा फोन कुठे आहे?) किंवा "Find my phone" (माझा फोन शोधा !)". गुगल चक्क नकाशावर आपला मोबाईल सध्या कुठे आहे ते दाखवेल.


वर दाखविल्याप्रमाणे नकाशामध्ये मोबाईल कुठे आहे ते दाखविले जाईल. त्यावर क्लिक केल्यास आणखी काही पर्याय दिसतील. या पर्यायांचा वापर करून आपण मोबाईलवर रिंग वाजवू शकतो. त्यामुळे मोबाईल जिथे असेल तेथून रिंग वाजण्यास सुरुवात होईल आणि मोबाईल शोधता येईल. तसेच हे पर्याय वापरून मोबाईल lock करता येईल किंवा erase (मोबाईल मधील डेटा आपोआप पुसून टाकणे) करता येईल जेणेकरून मोबाईल मधील महत्वाची माहिती इतरांच्या हाती लागणार नाही.


गुगलची ही सुविधा नवीन असली तरी i-os फोन मध्ये ही सुविधा फार पूर्वीपासून उपलब्ध आहे. तेव्हा यापुढे मोबाईल सापडत असल्यास इथेतिथे न शोधता सरळ गुगलला विचारा "Where is my phone?" !

टीप - खाली दाखविल्याप्रमाणे एकदा गुगल अकाऊन्ट मध्ये लॉग-इन करणे आणि लोकेशन डेटा वापरण्यास परवानगी देणे आवश्यक आहे.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

गुगलच्या सहाय्याने आपल्या हरवलेल्या Android फोनचा ठावठिकाणा शोधा ! गुगलच्या सहाय्याने आपल्या हरवलेल्या Android फोनचा ठावठिकाणा शोधा ! Reviewed by Salil Chaudhary on 05:32 Rating: 5
Powered by Blogger.